मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

महान व्यक्ती (special person) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महान व्यक्ती (special person) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

सरोजिनी नायडू...



           *भारतीय कोकिळा*

             *सरोजिनी नायडू*


     *जन्म : 13 फेब्रुवारी 1879*        

          (हैद्राबाद, आंध्रप्रदेश)

     *मृत्यु : 2 मार्च 1949*

         (अलाहाबाद, उत्तरप्रदेश)


पति : डॉ. एम. गोविंदराजलु नायडू

मुलं : जयसूर्य, पद्मजा नायडू, रणधीर आणि लीलामणि

विद्यालय : मद्रास विश्वविद्यालय, किंग्ज़ कॉलेज लंडन, गर्टन कॉलेज कैम्ब्रिज

नागरिकत्व  : भारतीय

पुरस्कार उपाधी : केसर ए हिंद

रचना : द गोल्डन थ्रेशहोल्ड, बर्ड ऑफ टाईम, ब्रोकन विंग


भारताची कोकिळा सरोजीनी नायडु त्या अमर आत्म्याचे नाव आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपले महत्वपुर्ण योगदान दिले. सरोजिनी नायडु त्या क्रांतिकारी महिलांपैकी एक आहेत ज्यांनी गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता प्रचंड संघर्ष केला.


सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. त्यांचे भाषण ऐकुन मोठ मोठे दिग्गज देखील मंत्रमुग्ध होऊन जात. त्या इंडियन नॅशनल कॉंग्रेस च्या पहिल्या प्रेसिडेंट होत्या. त्या उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल म्हणुन नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतिय महिला होत्या.


भारतिय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना भारताची नाइटिंगेल व भारताची कोकिळा देखील म्हंटल्या जात होतं. त्यांच्या कवितांमधे लहान मुलांच्या, निसर्गाच्या, देशभक्तीच्या, प्रेमाच्या आणि मृत्युच्या कविता आहेत विशेषतः लहान मुलांच्या कविता करण्याकरीता त्या प्रसिध्द होत्या. त्यांच्या कविता वाचुन अधिकतर लोक आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रममाण होत असत त्यांच्या कवितांमधे एक खोडकरपणा आढळुन यायचा त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या लहानपणाची झलक सापडायची आणि म्हणुनच त्यांना ’भारताची कोकिळा’ म्हंटले जात होते.


वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच सरोजिनीं मधली प्रतिभा दिसायला लागली या लहान बालिकेच्या कविता वाचुन प्रत्येकजण आश्चर्यचकीत व्हायचा. त्यांनी तेव्हांपासुनच वृत्तपत्रांमधे लेख आणि कविता लिहीण्यास सुरूवात केली होती. देशप्रेमाची भावन देखील त्यांच्यात ओतप्रोत भरली होती आणि म्हणुनच राष्ट्रीय आंदोलना दरम्यान त्या महात्मा गांधीच्या सोबत होत्या, त्यांच्या समवेत त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात हिरीरीने सहभाग घेतला.


सरोजिनी नायडुंची कन्या पद्मजा हिने देखील स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला आणि ती भारत छोडो आंदोलनाचा हिस्सा होती. आज जेव्हां ही भारताच्या महान क्रांतिकारी महिलांची चर्चा होते त्यावेळी सरोजिनी नायडुंचे नाव सर्वात आधी घेण्यात येते. सरोजिनी नायडु सगळया भारतीय महिलांकरीता एक आदर्श होत्या.


💁🏻‍♀ *महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंचे प्रारंभिक जीवन, कुटूंब आणि शिक्षण*

                            भारतिय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला एका बंगाली कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते ते वैज्ञानिक, शिक्षाशास्त्री, डॉक्टर आणि शिक्षक होते हैद्राबाद येथील निज़ाम कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती. पुढे त्यांच्या वडिलांना प्रिंसिपल पदावरून कमी करण्यात आले होते त्यानंतर ते नॅशनल काँग्रेस हैद्राबाद चे पहिले सदस्य बनले. आपली नौकरी सोडुन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती.


स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडु यांच्या आईचे नाव वरद सुंदरी देवी होते त्या बंगाली भाषेत कविता करीत असत. सरोजिनी नायडुंना एकुण 8 बहिण भाऊ होते त्यांच्यात सरोजिनी या सर्वात मोठया होत्या. त्यांचा एक भाऊ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारी होता त्याने बर्लिन कमेटीत आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती. त्याला 1937 साली एका इंग्रजाने मारून टाकले. सरोजिनींचे दुसरे बंधु हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय एक प्रसिध्द कवि, कथाकार, व कलाकार होते या व्यतिरीक्त ते नाटकं सुध्दा लिहीत असत. त्यांची बहिण सुनालिनी देवी या एक उत्तम नृत्यांगना व अभिनेत्री होत्या.


बालपणापासुन सरोजिनी या एक हुशार विद्यार्थिनी होत्या त्यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, बांग्ला आणि फारसी भाषेचे चांगले ज्ञान होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी मॅट्रिक परिक्षा त्यांनी उत्तीर्ण केली मद्रास प्रेसीडेंसीत प्रथम स्थान मिळवीले. देशाकरीता स्वतःला समर्पित करणाऱ्या महान क्रांतिकारी सरोजिनीने गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं अशी त्यांचे वडिल अघोरनाथ चट्टोपाध्याय यांची ईच्छा होती परंतु सरोजिनी यांना लहानपणापासुन कविता लिहीण्याचा छंद होता. कविता लिहीण्याची आवड त्यांच्यात आईकडुन आली होती.


बालपणी त्यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहीली होती. त्यांच्या कविता आणि लिखाण प्रत्येकाला प्रभावित करीत असे त्यांच्या कवितेने हैद्राबाद चे निजाम देखील प्रभावित झाले होते आणि त्यांनी सरोजिनींना विदेशात अध्ययन करण्याकरीता शिष्यवृत्ती देखील दिली होती. वयाच्या 16 व्या वर्षी जेव्हां त्या इंग्लंड येथे गेल्या तेव्हां त्यांनी प्रथम किंग्स काॅलेज लंडन येथे प्रवेश घेतला.


पुढे कैम्ब्रिज च्या ग्रिटन कॉलेज मधुन शिक्षण प्राप्त केले त्याठिकाणी त्यांची भेट त्या काळातील इंग्लिश चे प्रसिध्द कवि आर्थन साइमन आणि इडमंड गोसे यांच्याशी झाली. त्यांनी सरोजिनींना भारतिय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यास व डेक्कन (दक्षिण पठार) ची भारतिय कवयित्री होण्याचा सल्ला दिला.

               त्यानंतर महान कवयित्री सरोजिनी नायडुंना भारतातील पर्वत, नद्या, मंदिरे आणि सामाजिक बाबींना आपल्या कवितांमध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवियत्री झाल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांनी लाखो हृदयांमध्ये स्थान मिळविले.


👫🏻 *सरोजिनी नायडुंचा विवाह*

                        भारताच्या महान कवियित्री सरोजिनी नायडु ज्यावेळी इंग्लंड येथे शिक्षण घेत होत्या त्या दरम्यान त्यांची भेट गोविंद राजुलू नायडूंशी झाली त्यावेळीच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्या वेळी इंग्लंड येथे फिजिशियन होण्याकरता गेले होते. शिक्षण पुर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा गोविंद नायडूंशी विवाह झाला.

                    1898 साली त्यांचा विवाह हा ब्राम्हो मॅरेज अॅक्ट अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला. त्यांचा विवाह हा आंतरजातिय होता त्याकाळी वेगवेगळया जातींमध्ये लग्न होणे हे एखाद्या गुन्हयापेक्षा कमी समजले जात नव्हते कारण त्यावेळी आंतर जातिय विवाहांना भारतिय समाजात मान्यता मिळाली नव्हती.

                      हे एक क्रांतिकारी पाऊल होते याकरता त्यांना फार संघर्ष करावा लागला होता परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता आपल्या निर्भय आणि सुशिक्षीत अश्या सरोजिनीला तिच्या निर्णयात पुर्ण सहाय्य केले. या सर्व विपरीत परिस्थीती पश्चात त्यांचे वैवाहीक जीवन यशस्वी ठरले विवाहापश्चात त्या चार मुलांच्या आई झाल्या जयसुर्या, पद्मजा, रणधीर आणि लीलामणी अशी चार अपत्ये त्यांना झाली.

                      सरोजिनींची कन्या पद्मजा त्यांच्यासारखीच कवियित्री झाली शिवाय ती सक्रीय राजकारणात उतरली आणि 1961 ला पश्चिम बंगाल ची गव्हर्नर देखील झाली.


⚜ *सरोजिनी नायडुंचे राजनितीक जीवन आणि स्वातंत्र्य संग्रामातील भुमिका*

                    सामान्य महिलांपेक्षा सरोजिनी अगदी भिन्न होत्या त्यांच्यात कायम काहितरी करण्याची उर्जा आणि उमेद होती त्यामुळे विवाहानंतर देखील त्यांनी लिखाण सुरू ठेवले त्यांच्या कवितांच्या प्रशंसकांमध्ये देखील हळुहळु वाढ होत गेली व लोकप्रियता देखील वाढत गेली.


कविता लिहीण्यात त्यांचे प्रभुत्व होते आणि साहित्याची देखील त्यांना चांगली जाण होती. आपल्या अवती भवतीच्या गोष्टी, भारताचे प्राकृतिक सौंदर्य आणि इतर ही विषयांना त्या आपल्या कवितांच्या माध्यमातुन अतिशय सुरेख पणे मांडत असत. त्यांच्या कवितांवर प्रेम करणारा फार मोठा रसिक वर्ग होता जो त्यांच्या कवितांना गाण्यांसारखे गुणगुणायचा.


1905 साली त्यांची बुल बुले हिंद ही कविता प्रकाशित झाली त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडली त्यानंतर एकामागोमाग सलग त्यांच्या कविता प्रकाशित होत गेल्या ज्यामुळे वाचकांच्या मनात त्यांनी एक जागा निर्माण केली. सरोजिनींच्या प्रशंसकांच्या यादीत जवाहरलाल नेहरू, रविन्द्रनाथ टागौर यांसारखे महान व्यक्तिमत्व देखील होते. सरोजिनी आपल्या कविता इंग्लिश भाषांमधुन देखील लिहीत असत.

                   त्यांच्या कवितांमधुन भारताच्या संस्कृतीचे अनोखे चित्र पहावयास मिळते. अश्या महान कवियित्री सरोजिनी नायडूची भेट ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्य सेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झाली तेव्हां त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखलेंनी सरोजीनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला दिला.

             गोपाळ कृष्ण गोखलेंनी सरोजिनींना आपली बुध्दी आणि शिक्षण पुर्णपणे देशाला समर्पित करण्यास सुचविले. शिवाय ते त्यांना हे देखील म्हणाले की तुम्ही क्रांतीकारी कविता लिहा आणि स्वातंत्र्याच्या या लढाईत लहान लहान गांवामधील लोकांना प्रोत्साहीत करा जेणेकरून वर्षानुवर्ष गुलामगिरीत अडकलेले सामान्यजन मोकळा श्वास घेऊ शकतील आणि या समरात सहभागी होतील. सरोजिनींनी गोपाळकृष्ण गोखलेंच्या या सल्ल्यावर सखोल विचार केला आणि आपले व्यावसायिक लिखाण बंद करून स्वतःला राजकारणात पुर्णपणे समर्पित करून टाकले.

              1905 साली बंगालच्या विभाजना वेळी महान क्रांतीकारी महिला सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधे सहभागी झाल्या होत्या. विभाजनामुळे त्या फार व्यथीत देखील होत्या पुढे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्या एक निष्ठावान देशभक्ता प्रमाणे सतत प्रयत्नं करत होत्या सामान्य जनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत चेतवण्याकरीता संपुर्ण भारत त्यांनी पिंजुन काढला व लोकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लावण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले.

                      सरोजिनी नायडुंनी मुख्यतः स्त्रियांच्यात जाऊन देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरीता आपले क्रांतिकारी विचार प्रगट केले. ज्या सुमारास सरोजिनी नायडू महिलांमध्ये हे क्रांतीकारी विचार पेरत होत्या त्यावेळेसच्या काळात महिलांनी स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कैद करून घेतले होते. त्या काळात महिलांची स्थिती फार मागासलेली होती. अश्या काळात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेणे तर दुर स्त्रियांना घराबाहेर पाऊल ठेवण्याची देखील परवानगी नव्हती.

                अश्या परिस्थीतीत चुल आणि मुल सांभाळणाऱ्या स्त्रियांची मानसिकता बदलणे हे कार्य अजिबात सोपे नव्हते परंतु या स्त्रियांना स्वातंत्र्य समरात येण्यास प्रोत्साहीत करणे हे अवघड काम सरोजिनी नायडू मोठया निष्ठेने करीत होत्या. सरोजिनी नायडू गावां गावांमध्ये जाऊन स्त्रीयांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दयायच्या आपल्या विचारांनी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत असत या शिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांकरता सुध्दा आपला आवाज बुलंद केला होता.

                   1916 ला जेव्हां त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. सरोजिनी गांधीजींना आपला आदर्श मानु लागल्या, गांधीजींपासुन प्रेरणा घेत त्यांनी आपली पुर्ण ताकत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात लावली.

                       1919 साली क्रुर ब्रिटीश शासनकर्त्यांनी  रॉलेट एक्ट समंत केला या अंतर्गत राजद्रोह दस्तऐवजावर कब्जा करणे अवैध मानण्यात आले होते. महात्मा गांधीजींनी या एक्ट विरोधात असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनात सरोजिनी नायडूंनी गांधीजींचे पुर्णपणे समर्थन केले. गांधीजींच्या शांततापुर्ण नितीचे आणि अहिंसावादी विचारांचे पालन देखील केले.

                     या व्यतिरीक्त त्यांनी मोंटगु-चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत आंदोलन, साबरमती संधी सत्याग्रह आणि नागरिक अवज्ञा आंदोलना सारख्या इतर आंदोलनांचे देखील समर्थन केले. एवढेच नव्हें तर सविनय कायदेभंग आंदोलनात त्या गांधीजींसमवेत कारागृहात देखील गेल्या. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना 21 महिने कारागृहात राहावे लागले होते या दरम्यान त्यांना कित्येक यातना देखील सहन कराव्या लागल्या होत्या. अश्या त-हेने स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान त्यांनी कित्येक दिवस जेल मध्ये काढले आणि एक सच्च्या देशभक्ताचे कर्तव्य पार पाडले.


⚛ *राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यपालाच्या रूपात सरोजीनी नायडू*

                       सरोजिनी नायडूंचे स्वातंत्र्याच्या लढाईतील योगदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव सामान्य जनतेवर पडला होता त्या दरम्यान त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली होती. त्यांच्या विचारांनी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू अत्यंत प्रभावित झाले होते.

          त्यांची प्रतिभा पाहुन 1925 साली त्यांना काँग्रेस अधिवेशनाची अध्यक्षा म्हणुन नियुक्त करण्यात आले पुढे 1932 ला भारताच्या प्रतिनिधी या नात्याने त्या दक्षिण अफ्रिकेत देखील गेल्या होत्या. भारताच्या क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंनी भारताच्या स्वांतत्र्याकरता भारतियांव्दारे केल्या जाणाऱ्या अहिंसात्मक संघर्षाचे बारकावे सादर करण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती.

                           एवढेच नव्हें तर त्यांनी गांधीवादी सिध्दांताचा प्रसार करण्याकरता केवळ युरोपातच नव्हे तर संयुक्त राज्य अमेरीकेपर्यंतची यात्रा केली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर उत्तरप्रदेशाच्या पहिल्या गव्हर्नर (राज्यपाल) झाल्या. स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या गव्हर्नर होत्या भारताच्या सर्वात मोठया राज्याच्या त्या राज्यपाल झाल्या. सरोजिनी नायडूंनी आपल्या महान विचारांनी आणि गौरवपुर्ण व्यवहाराने आपल्या राजनितीक कर्तव्यांना उत्तम रितीने पार पाडले आणि त्यामुळे त्यांचे आजही स्मरण केले जाते.


🕯 *सरोजिनी नायडूंचा मृत्यु*

             देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता कठोर संघर्ष करणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी व महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या सरोजिनी नायडूंना 2 मार्च 1949 ला कार्यालयात काम करत असतांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.

                   अश्या तऱ्हेने आपलं संपुर्ण आयुष्य सरोजिनींनी देशाला समर्पित केलं. आपल्या जीवनात त्यांनी भरपुर ख्याती आणि सन्मान प्राप्त केला होता शिवाय त्या लोकांकरता प्रेरणास्त्रोत देखील ठरल्या.

                13 फेब्रुवारी 1964 ला भारत सरकारनं त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या सन्मानार्थ 15 पैश्यांचे डाकतिकीट प्रकाशित केले होते.


✍ *सरोजिनी नायडूंचे साहित्यातील योगदान*

             सरोजिनी नायडूंनी केवळ एक महान क्रांतिकारी आणि चांगल्या राजनितीज्ञ म्हणुनच ख्याती प्राप्त केली नाही तर त्या एक चांगल्या कवियित्री म्हणुन देखील प्रसिध्द होत्या. आपल्या कवितांमधुन लोकांमध्ये क्रांतिकारी विचारांचे बीज तर पेरलेच शिवाय भारतिय संस्कृतीची देखील अद्भुत अशी व्याख्या केली. बालकांच्या साहित्याचे त्यांनी विपुल लेखन केले आणि त्याकरता देखील त्या प्रसिध्द झाल्या.

              ईतकेच नव्हे तर त्यांच्या सुरेख कविता आणि गीतांमुळे त्यांना भारताची कोकिळा (भारताची नाइटिंगल) म्हणुन सन्मानित करण्यात आले होते. 1905 ला त्यांच्या कवितांचा संग्रह “गोल्डन थ्रेसहोल्ड” नावाने प्रकाशित झाला त्यांनतर त्यांनी आपले अन्य दोन संग्रह “दी बर्ड ऑफ टाईम” आणि “दी ब्रोकन विंग्स” देखील प्रकाशित केले या कवितांना केवळ भारतातील लोकांनीच पसंती दिली असे नव्हें तर या पुस्तकांना इंग्लंड मधे देखील मोठया संख्येने वाचकांनी पसंत केले आणि या मुळेच त्यांना एक शक्तीशाली लेखीका म्हणुन ओळख मिळाली.


प्रख्यात कवियित्री सरोजिनींनी कवितां व्यतिरीक्त काही आर्टिकल आणि निबंधांचे सुध्दा लिखाण केले होते जसे “वर्ड्स ऑफ़ फ्रीडम” हे त्यांच्या राजनितीक विचारांवर आधारीत होते. या शिवाय त्यांनी महिला सशक्तिकरणासारख्या सामाजिक मुद्दयाला देखील आपल्या पुस्तकांच्या माध्यमातुन वाचा फोडली होती. समाजात या लिखाणाचा खोलवर परिणाम झाला.


द फेदर ऑफ द डॉन ला त्यांची कन्या पद्मजाने 1961 ला एडिट करून प्रकाशित केले होते. त्यांचे इतर साहित्य “दी बर्ड ऑफ़ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ़ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ़ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ़ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ़ यूथ, दी मैजिक ट्री एंड दी विज़ार्ड मास्क देखील फार चर्चित आणि प्रसिध्द आहेत. या व्यतिरीक्त त्यांच्या काही कवितांमधील सुंदर आणि लयबध्द शब्दांमुळे त्या कवितांना गाता येणे सुध्दा शक्य आहे.


🔮 *सरोजिनी नायडूंविषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती*

              वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सरोजिनींनी 1200 ओळींचा ‘ए लेडी ऑफ लेक’ नावाचा खंडकाव्य लिहीला.

               1918 ला त्यांनी मद्रास प्रांतिय संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.

1919 ला अखिल भारतीय होमरूल लीग प्रतिनीधी मंडळातील सदस्य या नात्याने त्या इंग्लंड दौऱ्यावर जाऊन आल्या.

1930 ला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले गुजरात येथे धारासना मधील ‘मिठाच्या सत्याग्रहाचे’ नेतृत्व सरोजिनी नायडूंनी मोठया धैर्याने केले.

1942 साली ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि जेल मध्ये गेल्या.

1947 ला दिल्लीत झालेल्या आशियाई परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले.

1947 साली स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणुन त्यांची निवड झाली.

             

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

सुधाताई जोशी..



                *सुधाताई जोशी*  

                 (स्वातंत्र्य सैनिक)

       *जन्म : 14 जानेवारी, 1918*

                      (गोवा)

पति : महादेव शास्त्री जोशी

नागरिकता : भारतीय

धर्म : हिन्दू

आंदोलन : सत्याग्रह आंदोलन

तुरुंगवास : 2 वर्ष

प्रसिध्द  : गोवा मुक्ती संग्राम

विशेष : पोर्तुगीज सरकारने सुधाताईंच्या गोवा प्रवेशाची सूचना देणा-याला मोठे  बक्षीस देण्याचे जाहीर केली होती. 

         

       *तुरुंगवासाच्याच दरम्यान विनाेबा भावेंनी सुधाताईस पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले, "आपल्या तुरुंगवासाच्या काळास भाग्यच मानून काहीतरी नवीन, चांगलं शिकण्यास हा वेळ व्यतीत करा. आम्हाला तुमच्या धाडसाचे खूप काैतुक आहे." हे पत्र सुधाताईंना एक नवीन उमेद देण्याचं कारण ठरलं.*

कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू


कधी भाविनी वा कधी रागिणी


सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे


स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी


वैभव जोशी यांनी लिहिलेल्या या विलक्षण अशा ओळी कानावर पडताच एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात. अशाच अनेक स्त्रिया आपल्या इतिहासात सुवर्ण क्षण कोरुन गेल्या. त्यातीलच एक म्हणजे सुधाताई जोशी.


सुधाताई जोशी या १९५५ च्या म्हापसा सत्याग्रहाच्या अध्यक्ष होत्या. वेदांचे प्रगल्भ विद्वान आणि भारतीय संस्कृती कोशाचे रचनाकार पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या त्या धर्मपत्नी. महादेवशास्त्री यांनी आपले आत्मचरित्र आत्मपुराण यात सुधाताई जोशींच्या गोवा मुक्तिलढ्यात बजावलेल्या कार्याबद्दल लिहिले आहे.


१९५० साली सुधाताई व महादेवशास्त्री पुण्यात रहात होते. याच काळात गोव्याचा मुक्तिलढा पूर्ण जोमाने चालू होता. त्यात महादेवशास्त्री हे मूळ गोव्याचे त्यामुळे त्यांना आपल्या मातृभूमीच्या सूटकेसाठी कार्य करण्याची मनापासून इच्छा होती. त्यात महादेवशास्त्री हे गोवा काँग्रेस समितीच्या पुणे शाखेचे मुख्य होते. त्यांनी गोवा काँग्रेस समितीचे प्रमुख पिटर आल्वारिस यांच्यासमवेत पोर्तुगीज राजवटीविरुद्ध २६ जानेवारी, १९५५ रोजी सत्याग्रह करण्याचे योजिले. हे कार्य पुढे न्यायचे ठरवतानाच, महादेवशास्त्री यांच्या अत्यंत साध्या व सरळ गृहिणी मध्येच त्यांना म्हणाल्या, "तुम्ही नाही, तर मी आता हे कार्य पुढे नेईन. आपले आत्ताच हार्नियाचे ऑपरेशन करण्यात आले आहे आणि डॉक्टरांनी आपणास विश्रांती करण्यास बजावले आहे. त्यामुळे मी या आगीत उडी मारण्यासाठी तयार आहे. माफी असावी पण मी आपली परवानगी नाही मागत आहे तर माझा निर्णय आपणास कळवित आहे."


महादेवशास्त्रीसाठी ही गोष्ट जरा आश्चर्यचकित करणारी होती पण ते यावर काही करु शकले नाही. पिटर आल्वारिस यांना सुधाताईंची भूमिका आवडली. त्यांनी सुधाताईंचे स्वागत करीत त्यांना गोवा काँग्रेसचे मुख्य केले. सुधाताई १ मार्च, १९५५ रोजी आपल्या सहकाऱ्यांसोबत गोव्यात पोहचल्या. त्यांना एका पत्रकाराने सावध करण्याच्या हेतूने टोनी डिसोजाला २६ वर्षांचा तुरुंगवास भोगण्याची शिक्षा सुनावल्याचे कानावर घातले. त्यावर निडर आणि निर्धारित सुधाताई म्हणाल्या, "मला पर्वा नाही. पोर्तुगीज इथे २६ महिन्यांहून अधिक काळ राज्य करू शकणार नाही."


ज्या कार्यासाठी त्या गोव्यात आल्या होत्या ते लक्षात घेता सुधाताई यांनी ६ एप्रिल, १९५५ या दिवशी पहिल्यांदा म्हापश्याच्या हनुमान मंदिरासमोर सत्याग्रहाची सभा भरवली. एका स्टूलवर उभ्या राहून बोलत असतानाच पोर्तुगीज पोलीस त्यांच्या पुढ्यात बंदूक घेऊन उभा राहिला. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत सुधाताईंनी आपले भाषण सुरुच ठेवले. हे सहन न झाल्याने पोलीस अधिकाऱ्याने सुधाताईंच्या हातातील कागद हिसकावून घेतला. तोच तिथे जमलेल्या प्रचारकांनी तिरंगा फडकाविला. सुधाताईंना ताबडतोब अटक करण्यात आली.


थोड्याच दिवसानंतर २८ एप्रिल, १९५५ रोजी शिरगांवच्या जत्रेस लोकांची प्रचंड गर्दी होती. अचानक त्या गर्दीत एका महिलेने तिरंगा फडकवित "जय हिंद" अशी घोषणा दिली. सहाजिकच त्या काळात भारतीयांच्या देशभक्ती प्रदर्शनास विरोध होता. म्हणून त्या स्त्रीला अटक करून सुधाताई असलेल्या तुरुंगात नेण्यात आले. त्या महिलेस पाहून सुधाताईंना धक्काच बसला. कारण ती महिला त्यांच्या भगिनी आशाताई होत्या. त्या बुलढाणा, महाराष्ट्राहून खास गोव्यासाठी आल्या होत्या. त्यांना पोर्तुगीजांकडून मारहाण करण्यात आली. त्यांचे बंधू धनशाम फडके हेही पोर्तुगीजांच्या ताब्यात होते.


सुधाताईंना ४ वर्षे जेलमध्ये ठेवण्यात आले. तुरुंग राहण्यास साेईस्कर नव्हता पण तरीही त्यांना त्या वाईट स्थितीत दिवस घालवावे लागले. तद्नंतर काेर्टकचेरीही सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी काेर्टात न्यायधीशांनी त्यांना विचारले की त्यांना गाेवा हा भारताचा भाग व्हावा असे वाटते. यावर सुधाताईंनी सुंदर जवाब दिला. त्या म्हणाला, "यात गाेव्याला भारताचा भाग करण्याचा विषयच उद्भवत नाही, मुळात कित्येक वर्षांपासून गाेवा हा भारताचा भाग आहे. एकदा का तुम्ही इकडून गेलात की ताे आपाेआप भारताचा भाग असेल. " त्यांच्या अशा जवाबासाठी न्यायाधीशांनी त्यांना माफी मागण्यास सांगितले व गाेव्यात न येण्यास बजावले.

               सुधाताईंनी त्यावर माेठ्या धाडसाने उत्तर देत म्हटले, "गाेव्यात पुन्हा पाय न ठेवण्याचे वचन मी का म्हणून तुम्हाला देऊ. गाेवा माझी मातृभूमी आहे. मी येथे कधीही ये-जा करु शकते. आणि हाे, आपणास माझ्या कुटुंबाची काळजी करण्याचे कारण नाही, या क्षणाला मला माझे राष्ट्र माझ्या कुटुंबापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. माझ्या मुलांची काळजी घेण्यास माझे पती समर्थ आहेत. त्यामुळे मी काेणत्याही परिस्थितीत आपली क्षमा मागून दयायाचना मुळीच करणार नाही" या कारणास्तव सुधाताईंना १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली

              तुरुंगातील परिस्थिती वाईट होती. याच कारणामुळे सुधाताईंनी उपाेषण करण्याचे ठरवले. याच काळात त्यांनी युक्तीने महादेवशास्त्रींना गुप्त संदेश पाठवला, "जो सुखरुप महादेव रावांकडे पाेहाेचला" आणि त्यांना त्याचा अर्थ उमजला की सुधाताई फक्त पाणी ग्रहण करुन उपाेषण करीत आहेत. महादेवरावांनी लगेच ती बातमी दुसऱ्या दिवशी छापून आणली आणि त्यांच्या उपाेषणाबद्दल सर्वत्र भारतात चर्चा हाेऊ लागली.


लाेकांच्या भीतीपाेटी पाेर्तुगीजांनी सुधाताई आणि इतर देशसेवकांना केपेच्या जेलमध्ये चांगल्या ठिकाणी हलविले. तुरुंगवासाच्याच दरम्यान विनाेबा भावेंनी सुधाताईस पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले,"आपल्या तुरुंगवासाच्या काळास भाग्यच मानून काहीतरी नवीन, चांगलं शिकण्यास हा वेळ व्यतीत करा. आम्हाला तुमच्या धाडसाचे खूप काैतुक आहे." हे पत्र सुधाताईंना एक नवीन उमेद देण्याचं कारण ठरलं.


हे सगळ घडत असतानाच सुधाताईंच्या सुटकेचा विषय संसदेत पाेहाेचला हाेता. पं. जवाहरलाल नेहरुंनी त्यांच्या सुटकेसाठी पूर्ण प्रयत्न केले. शेवटी कठीण आयुष्य आणि पाेर्तुगीजांच्या जुलुमातून सुधाताईंना साेडण्यात आले. धन्य आहेत या स्त्रिया आणि त्यांचे कर्तृत्व. त्याचबराेबर आपण त्यांना मदत केलेल्या पुरुषांनाही विसरुन चालणार नाही हे ही तेवढेच सत्य आहे.         


      

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

सुंदरलाल बहुगुणा..

 

             सुंदरलाल बहुगुणा

   (चिपको आंदोलनाचे प्रमुख नेते)

        

              *जन्म : 9 जनवरी, 1927*

                  (सिलयारा, उत्तराखंड)

              *मृत्यु : 21 मई, 2021*

                       (ऋषिकेश)                                                 आईवडील : अम्बादत्त बहुगुणा, पूर्णा देवी

पत्नी : विमला नौटियाल

अपत्ये : राजीवनयन बहुगुणा, माधुरी पाठक, प्रदीप बहुगुणा

नागरिकता : भारतीय

शिक्षण : बी.ए., एम.ए. (अपूर्ण)

पुरस्कार : पद्मश्री, पद्म विभूषण, राष्ट्रीय एकता पुरस्कार, राइट लाइव लीहुड पुरस्कार (चिपको आंदोलन), जमनालाल बजाज पुरस्कार आणि आयआयटी रुड़की द्वारा सामाजिक विज्ञानाची मानद डाॕक्टरेट

विशेष : चिपको चळवळीचे  प्रमुख नेते

कार्य क्षेत्र : सामाजिक कार्यकर्ता, गांधीवादी कार्यकर्ते

                  सुंदरलाल बहुगुणा हे प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि 'चिपको चळवळ' चे प्रमुख नेते होते.  1984 मध्ये त्यांना 'राष्ट्रीय एकता पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.  सुंदरलाल बहुगुणा यांच्या मते, "झाडे तोडण्यापेक्षा ते लावणे जास्त महत्त्वाचे आहे".  1949 मध्ये मीराबेन आणि ठक्कर बाप्पा यांच्या संपर्कात आल्यानंतर सुंदरलाल बहुगुणा यांनी दलित वर्गातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्यासाठी टिहरीमध्ये 'ठक्कर बाप्पा वसतिगृह'ही स्थापन केले.  दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी चळवळही सुरू केली.

💁🏻‍♂️ *परिचय*

               सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म 9 जानेवारी 1927 रोजी उत्तराखंडमधील देवांच्या भूमीत सिल्यारा नावाच्या ठिकाणी झाला.  प्राथमिक शिक्षणानंतर ते लाहोरला गेले आणि तेथून त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स केले.  पत्नी श्रीमती विमला नौटियाल यांच्या मदतीने त्यांनी सिलायरा येथेच ‘पार्वती नवजीवन मंडळ’ स्थापन केले.  1949 मध्ये मीराबेन आणि ठक्कर बाप्पा यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी दलित वर्गातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्यासाठी टिहरी येथे ठक्कर बाप्पा वसतिगृहाची स्थापना केली.  दलितांना मंदिर प्रवेशाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली.  १९७१ मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी सोळा दिवस उपोषण केले.  चिपको आंदोलनामुळे ते वृक्षमित्र म्हणून जगभर प्रसिद्ध झाले.

🌳 *पर्यावरण संरक्षणाचे प्रतिक*

                 केवळ देशातच नव्हे तर जगभरातील निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणाचे महान प्रतीक सुंदरलाल बहुगुणा यांनी 1972 मध्ये चिपको आंदोलनाला धार दिली.  तसेच देश आणि जगाला वनसंवर्धनासाठी प्रेरित केले.  त्यामुळे चिपको आंदोलनाचा प्रतिध्वनी जगभर ऐकू आला.  बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या बहुगुणा यांचा नद्या, जंगले आणि निसर्गाशी अतूट संबंध होता.  त्यांनी पर्यावरणाला सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली.  उत्तराखंडमधील विजेची गरज भागवण्यासाठी ते छोट्या प्रकल्पांच्या बाजूने होते.  त्यामुळेच ते टिहरी धरणासारख्या मोठ्या प्रकल्पाच्या बाजूने नव्हते.  याबाबत त्यांनी जोरदार आंदोलन सुरू करून खळबळ उडवून दिली.


 त्यांचा नारा होता - 'धार ऐंच डाला, बिजली बणावा खाला खाला.'  म्हणजेच उंच भागात झाडे लावा आणि सखल भागात छोट्या प्रकल्पांच्या माध्यमातून वीजनिर्मिती करा.  साधी राहणी आणि उच्च विचार आत्मसात  ते आयुष्यभर निसर्ग, नद्या, जंगले यांच्या संवर्धनाच्या मोहिमेत मग्न राहिले.  बहुगुणा ही अशी व्यक्ती होती ज्याने चांगल्या आणि वाईट वनस्पतींमध्ये फरक करण्यास शिकवले.

⚜️ *चिपको आंदोलन म्हणजे काय?*

                  1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धानंतर भारत सरकारने तिबेट सीमेवर आपली उपस्थिती मजबूत करण्याची तयारी केली.  काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सीमावर्ती भागात रस्ते बांधण्याचे काम सुरू झाले.  त्या वेळी उत्तर प्रदेश (आता उत्तराखंड) मध्ये येणाऱ्या चमोली जिल्ह्यातही रस्ते बांधणीची प्रक्रिया सुरू झाली.  रस्ता बांधायचा असेल तर जमीन हवी होती आणि डोंगराच्या जंगलात झाडे तोडल्याशिवाय जमीन कशी मिळणार?  अशा स्थितीत जंगलतोड मोठ्या प्रमाणात सुरू झाली.  1972 पर्यंत, ही कापणी खूप तीव्र झाली होती.  स्थानिक लोकांनी झाडे तोडण्यास विरोध केला.  सुंदरलाल बहुगुणा आणि चंडी प्रसाद भट्ट सारखे लोक विरोधासाठी पुढे आले.  परिसरातील महिलाही जंगलतोडीच्या विरोधात उतरल्या.  अनेक ठिकाणी महिला मंगल दलाची स्थापना झाली.  रैनी गावात महिला मंगल दलाचीही स्थापना करण्यात आली.  गौरा देवी यांना अध्यक्ष करण्यात आले.  महिला मंगल दलाच्या महिलांनी घरोघरी जाऊन लोकांना वृक्षांचे महत्त्व समजावून सांगून पर्यावरणाबाबत जागरूक केले.


 1973 च्या सुरुवातीला रैनी गावातील अडीच हजार झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  याच्या निषेधार्थ संपूर्ण गाव उभे राहिले.  23 मार्च 1973 रोजी झाडे तोडण्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली.  मात्र या सगळ्याचा सरकारवर काहीही परिणाम झाला नाही.  झाडे तोडण्याचे कंत्राटही दिले होते.  झाडे तोडण्यासाठी कंत्राटदार पोहोचले.  त्यानंतर गौरा देवीच्या नेतृत्वाखाली रैनी गावातील महिला झाडांना चिकटून राहिल्या.  त्यांचे म्हणणे होते - “आधी आम्हाला तोडा, मग झाड तोडा”.  त्यामुळे शासनाला झाडे तोडण्याचा आदेश मागे घ्यावा लागला.  यानंतर झाडांना चिकटून झाडे वाचवण्याची ही मोहीम आजूबाजूच्या परिसरातही पसरली.  याला 'चिपको आंदोलन' असे म्हणतात.  सुंदरलाल बहुगुणा आणि चंडी प्रसाद भट्ट यांसारख्या पर्यावरणवाद्यांनी झाडांना चिकटून झाडे वाचवण्यासाठी या संपूर्ण चळवळीचे नेतृत्व केले.  पुढे ही चळवळ देशात आणि जगात प्रसिद्ध झाली.  जगभरातील पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण रक्षणात गुंतलेल्या लोकांना यातून प्रेरणा मिळाली.


 या आंदोलनाचा परिणाम असा झाला की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 'वन संवर्धन कायदा' आणावा लागला.  याद्वारे या भागातील झाडे तोडण्यास १५ वर्षांपासून बंदी घालण्यात आली होती.  अगदी केंद्र सरकारने स्वतंत्र 'वन आणि पर्यावरण मंत्रालय' निर्माण केले.

🏆  *पुरस्कार*

                    बहुगुणा यांच्या कार्याने प्रभावित होऊन अमेरिकेच्या फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने त्यांना 1980 मध्ये पुरस्काराने सन्मानित केले.  याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.  पर्यावरणाला कायमस्वरूपी संपत्ती मानणारा हा महामानव 'पर्यावरण गांधी' झाला.  आंतरराष्ट्रीय मान्यता म्हणून 1981 मध्ये स्टॉकहोमचे पर्यायी नोबेल पारितोषिक मिळाले.


 सुंदरलाल बहुगुणा यांना 1981 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता, जोपर्यंत वृक्षतोड सुरू आहे, तोपर्यंत मी स्वत:ला या सन्मानासाठी योग्य समजत नाही, असे म्हणत त्यांनी ते स्वीकारले नाही.

▪️1985 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार.

▪️1986 मध्ये सर्जनशील कार्यासाठी जमनालाल बजाज पुरस्कार,

▪️1987 मध्ये राईट लाइव्हलीहुड अवॉर्ड (चिपको मूव्हमेंट),

▪️ 1987 मध्ये शेर-ए-काश्मीर पुरस्कार

▪️1987 मध्ये सरस्वती सन्मान

▪️1989 IIT रुरकी द्वारे सामाजिक विज्ञानाची मानद डॉक्टरेट

▪️1998 मध्ये पहल सन्मान

▪️1999 मध्ये गांधी सेवा सन्मान

▪️ 2000 मध्ये संसदपटूंच्या मंचातर्फे सत्यपाल मित्तल पुरस्कार

▪️2001 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

🪔 *मृत्यू*

               सुंदरलाल बहुगुणा यांचे २१ मे २०२१ रोजी ऋषिकेश येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे निधन झाले.  ते 94 वर्षांचे होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोविड-19 ची लागण झाली होती.


 उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विट केले की, 'चिपको चळवळीचे संस्थापक, जगामध्ये 'वृक्षमित्र' म्हणून ओळखले जाणारे महान पर्यावरणवादी पद्मविभूषण श्री सुंदरलाल बहुगुणा जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे.  ही बातमी ऐकून मला अत्यंत दु:ख झाले आहे.  हे केवळ उत्तराखंडचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.  त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, 'पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना 1986 मध्ये 'जमनालाल बजाज पुरस्कार' आणि 2009 मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात श्री सुंदरलाल बहुगुणा जी यांचे कार्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.                                                                                                        

         

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

अनंत लक्ष्मण कान्हेरे.


                                                

         *अनंत लक्ष्मण कान्हेरे*

          ( भारतीय क्रांतिकारक )

                                                                                    *जन्म: 7 जानेवारी  1891*

     *फाशी : 19 एप्रिल 1910*

         (ठाणे, महाराष्ट्र, भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना : अभिनव भारत

धर्म : हिंदू

प्रभाव : विनायक दामोदर सावरकर

वडील : लक्ष्मण कान्हेरे                                                                                 *जन्म*

कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (औरंगाबादला) जातो काय, तेथे क्रांतीकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वा. सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तुल पडते काय आणि तो एका कपटी आणि उच्चपदस्थ इंग्रजाचा वध करतो काय, सारेच अतक्र्य आणि अशक्य ! पण हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणार्‍या युवकाचे नाव होते, अनंत लक्ष्मण कान्हेरे !


अनंतरावांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले. नाशिकच्या स्वातंत्र्यवादी गुप्त संस्थेच्या काशीनाथ टोणपे यांनी गंगाराम आणि अनंतराव यांना गुप्त संस्थेची शपथ दिली. मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीच्या घेतलेल्या प्रतिशोधानंतर अनंतरावही अशा कृतीला अधीर झाले. मग गंगाराम यांनी एकदा अनंतरावांच्या हातावर तापलेला लोखंडी चिमटा ठेवून आणि एकदा पेटलेल्या चिमणीची तापलेली काच दोन्ही हातांनी धरायला सांगून त्यांची परीक्षा घेतली. दोन्हीही दिव्ये करूनही अनंतरावांची मुद्रा निर्विकार होती !


*जॅक्सनला ठार मारण्याचा कट रचणे*

याच सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने खरे वकील, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली. जॅक्सनला ठार मारण्यासाठी अनंतरावांनी पिस्तुलाच्या नेमबाजीचा सराव केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी जॅक्सनला नीट पाहून घेतले. ‘जॅक्सनला मारल्यावर फाशी जावे लागेल, तेव्हा निदान आई-वडिलांकडे आठवणीसाठी आपले एखादे छायाचित्र असावे’; म्हणून त्यांनी स्वतःचे एक छायाचित्रही काढून घेतले.


 *जॅक्सनवर चार गोळ्या झाडल्या !*

२१ डिसेंबर १९०९ या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असतांनाच आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंतराव शांतपणे आरक्षकांच्या स्वाधीन झाले.

 *फाशीची शिक्षा*

जॅक्सनवधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे अन् विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली. १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात सकाळी ७ वाजता हे तीन क्रांतीकारक धीरोदात्त वृत्तीने फाशी गेले. त्यांच्या नातलगांच्या विनंतीला न जुमानता ब्रिटीश सरकारने ठाण्याच्या खाडीकिनारी या तिघांच्याही मृतदेहांना अग्नी दिला आणि त्यांची राखही कोणाला मिळू नये, म्हणून ती राख खाडीच्या पाण्यात फेकून दिली.


वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणार्‍या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्यासारख्या अनेकांच्या बलीदानांमुळेच आज आपण स्वतंत्र आहोत.

                                                                                                          

                                                                                                                                                                                       

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

शिवराम बाबूराव भोजे

 शिवराम बाबूराव भोजे (Shivram Baburao Bhoje) हे एक भारतीय शास्त्रज्ञ होते, जे विशेषतः अणुऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांचा जन्म १९४१ मध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या अकलूज येथे झाला. त्यांनी पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली.

भोजे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) येथून केली. तिथे त्यांनी फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या (Fast Breeder Reactors) विकासावर काम केले. भारतातील फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर (FBTR) च्या निर्मिती आणि कार्यान्वित करण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे ते ओळखले जातात.

त्यांच्या काही प्रमुख योगदानांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

 * फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर (FBTR): हा भारतातील पहिला फास्ट ब्रीडर रिॲक्टर होता, जो १९८५ मध्ये तामिळनाडूतील कलपक्कम येथे सुरू झाला. भोजे या प्रकल्पाचे संचालक होते आणि तो यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 * प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर (PFBR): त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यातील ५०० मेगावॅटच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या (PFBR) डिझाइन आणि विकासासाठीही योगदान दिले.

 * अणुऊर्जेमध्ये आत्मनिर्भरता: भोजे यांनी भारताला अणुऊर्जा तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम केले, ज्यामुळे देशाला ऊर्जा सुरक्षा मिळण्यास मदत झाली.

विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना २००४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

तु

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष...

 विश्वास पाटील — जीवनपट

🔹 नाव: विश्वास नारायण पाटील
🔹 जन्म: २८ नोव्हेंबर १९५९
🔹 जन्मस्थान: नेर्ले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र


🎓 शिक्षण

  • इंग्रजी साहित्यात एम.ए. पदवी
  • कायद्याचे शिक्षण (एल.एल.बी.)
  • नंतर UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS मध्ये प्रवेश

🏛 करिअर

  • भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये अधिकारी म्हणून काम
  • विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त अशी महत्त्वाची पदे भूषवली
  • प्रशासकीय सेवेत काम करताना ग्रामीण भागातील जीवन, शेतकरी समस्या, ऐतिहासिक ठिकाणांचे अभ्यास यांचा अनुभव

✍ साहित्यिक योगदान

विश्वास पाटील यांनी ऐतिहासिक, सामाजिक आणि वास्तववादी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या:

  • पानिपत – तिसऱ्या पानिपतच्या लढाईवर आधारित ऐतिहासिक कादंबरी
  • झडझडती – विस्थापित लोकांच्या समस्या व पुनर्वसनावर आधारित कादंबरी (यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार)
  • महानायक – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित कादंबरी
  • संभाजी – छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन
  • चंद्रमुखी – तामाशा, लावणी आणि राजकारण यावर आधारित सामाजिक कादंबरी
  • पांगिरा – ग्रामीण जीवनातील संघर्ष दर्शवणारी कादंबरी

🏆 पुरस्कार व सन्मान

  • साहित्य अकादमी पुरस्कारझडझडती कादंबरीसाठी
  • नाथ माधव पुरस्कारपानिपत कादंबरीसाठी
  • गडकरी पुरस्कारमहानायक कादंबरीसाठी
  • अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार

📰 अन्य माहिती

  • २०२६ साली होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड
  • ऐतिहासिक संशोधनावर आधारित लिखाण, तपशीलवार चित्रण आणि प्रभावी कथनशैली ही त्यांची खासियत
  • त्यांचे लिखाण इतिहासाला जिवंत स्वरूपात उभे करते आणि वाचकाला त्या काळात घेऊन जाते


रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

पद्मभूषण ताराबाई मोडक..

                                             


     *बालशिक्षणाच्या अध्वर्यू* 

   *पद्मभूषण ताराबाई मोडक*


*जन्म: १९ एप्रिल १८९२*

             (इंदूर, भारत)

*मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३*

धर्म : हिंदू

वडील : सदाशिव पांडुरंग केळकर

आई : उमाबाई सदाशिव केळकर

पती : के. व्ही. मोडक


               ह्या एक मराठी भाषिक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात.


🤱🏻 *जन्म आणि बालपण*

             ताराबाईंचा जन्म इंदूरचा आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते.. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रार्थना समाजाचे बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या.


💁  *चरित्र*

    केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले. पण ताराबाई आणि त्यांच्या बहिणीची रवानगी पुण्याच्या हुजूरपागेत झाली (इ.स. १९०२). पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना प्रसंगी हेटाळणीही सहन करावी लागली. शाळेच्या वसतिगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण ताराबाईंना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कायमच अभिमान वाटत राहिला. शाळेत असताना त्यांनी वाचनालयाच्या ग्रंथपालांकडे भास्कराचार्यांचे ’लीलावती’ आहे का अशी विचारणा केली होती. ग्रंथालयात ते पुस्तक नव्हते, पण ग्रंथपालबाईंना त्यावेळी या मुलीचे खूप कौतुक वाटले होते.

                 याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१९०६) आणि ताराबाई पुणे सोडून मुंबईला आल्या. इथे त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूलमध्ये) जाऊ लागल्या. सुरुवातीला त्या शाळेत जायला ताराबाई नाराज होत्या. बूट घालण्यासारखे रिवाज त्यांना पसंत नव्हते. पण लवकरच त्या शाळेत रुळल्या आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला हा बदल ताराबाईंना खूप शिकवून गेला. पण लवकरच त्यांच्या आईदेखील वारल्या (१९०८). आई आणि वडील या दोघांचाही आधार आता तुटला होता. आर्थिक चणचण दिवसेंदिवस वाढत होती. १९०९साली ताराबाई मॅट्रिक झाल्या.

            ताराबाई मो?  प्रथम मुंबईच्या एल्फिम्स्टन कॉलेजात आणि नंतर विल्सन कॉलेजात शिकू लागल्या. १९१४साली फिलॉसॉफी घेऊन बी.ए. झाल्या. १०१६साली त्या एम.ए.च्या परीक्षेला बसल्या, पण तीत पास होऊ शकल्या नाहीत.

            प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. टेनिस, बॅडमिंटन तर त्या उत्तम खेळतच पण विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यात त्यांना विशेष रस होता.

            कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा परिचय के.व्ही. मोडक यांच्याशी झाला. के.व्ही. हे एल्‍फिन्स्टन कॉलेजचे माजी प्राचार्य वामन मोडक यांचे चिरंजीव. मोडक कुटुंबही प्रार्थना समाजाशी बांधिलकी ठेवून होते. ताराबाई आणि के.व्ही. यांच्या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि पदवीधर झाल्यावर एका वर्षातच त्या के. व्ही. मोडकांशी विवाहबद्ध झाल्या. के.व्ही. त्या वेळी अमरावती मुक्कामी होते आणि तिथे एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. १९१५ साली ताराबाई लग्न करून अमरावतीला आल्या, तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. के.व्ही. आणि ताराबाई यांचा संसार हा दोन आधुनिक, बुद्धिमान आणि प्रतिभावंतांचा संसार होता. अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रात दोघांचाही दबदबा होता. सभा, संमेलनांतून उठबस होती. साहित्य, संगीत, नाटके, पाहुण्यांची सरबराई यात दिवस जात होते. याच दरम्यान त्यांच्या आयुष्याने एक वेगळीच कलाटणी घेतली.

            १९१५साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तेथे १९१८पर्यंत ताराबाईंनी नोकरी केली. १९२०मध्ये त्यांना मुलगी झाली.

         पुढे काही कारणांनी त्यांचा संसार अपयशी ठरला, त्यांनी विभक्त होण्याचा आणि अमरावती सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना मनाचा आत्यंतिक खंबीरपणा त्यांनी दाखवला. ज्या काळात नवऱ्याचे घर सोडणाऱ्या स्त्रीला फक्त परित्यक्ता असेच संबोधले जायचे, त्या काळात ताराबईंनी स्वतंत्र संसार थाटला. सोबत एक वर्षाची कन्या-प्रभा-होती आणि पुढचे भविष्य अंधकारमय होते.

            पण ताराबाईंना स्वावलंबी होण्यासाठीची संधी लवकरच चालून आली (१९२१). राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांना प्राचार्यपदासाठी बोलावणे आले. राजकोटची ही नोकरी उत्तम होती आणि त्यांच्यासाठी एक आव्हान होती. एकतर मुलुख गुजराती होता. त्यामुळे आधी शिकवणी लावून गुजराती शिकावी लागली. प्राचार्यपदाच्या कामात व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. त्यासाठी त्यांनी बडोदा, अहमदाबाद येथील ट्रेनिंग कॉलेजना भेट देऊन व्यवस्थापनाचे तंत्रही आत्मसात केले. ताराबाईंनी ही नोकरी जेमतेम दोन वर्षे केली. या वेळी त्यांची नोकरी सोडायला कारण होती त्यांची मुलगी प्रभा! तिच्या त्यांच्या मुलीच्या, प्रभाच्या भविष्याच्या चिंतेखातर, तिची कुचंबणा लक्षात घेऊन ताराबाईंनी राजकोटची नोकरी सोडली. कॉलेजात नोकरीत असताना ताराबाईंनी मानसशास्‍त्रावरील खूप पुस्तके वाचली.

                  याच काळात त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या भावनगर येथील शिक्षणप्रयोगांविषयी वाचले आणि त्या सौराष्ट्रातील भावनगरला येऊन दाखल झाल्या. गिजुभाई भावनगरमधील ‘दक्षिणामूर्ती’ या संस्थेत मॉन्टेसरी शिक्षणपद्धती नुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यांनाही त्यांच्या या कार्यात सहकारी हवाच होता आणि ताराबाईंच्या रूपाने तो मिळाला. ताराबाई स्वत: उच्चशिक्षित, शिकवण्याची कला आणि आवड असलेल्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारली की, तडीस नेण्यासाठी झोकून देणाऱ्या होत्या.

          गिजुभाई आणि ताराबाईंची भेट ऐतिहासिक होती. भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी होती. दोघांनी मिळून बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. ज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते आणि प्राथमिक शिक्षण ६ व्याt वर्षापासून सुरू होत होते, त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांच्या या प्रयत्नाकडे निव्वळ ‘फॅड’ म्हणून बघणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आज बालशिक्षण एक शास्त्र म्हणून उदयाला आले आहे. पण त्याचे बीजारोपण करण्याचे काम गिजुभाईंबरोबर ताराबाईंनी केले. गिजुभाईंना त्यामुळेच ताराबाई गुरुस्थानी मानत आल्या. त्यांच्याकडूनच त्यांनी बालशिक्षणाची संथा घेतली. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात मनापासून सामील झाल्या.

        भावनगरमधील वास्तव्याने त्यांच्यातील लेखिकेलाही आकार दिला. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची (मॉन्टेसरी संघाची) स्थापना झाली आणि त्याच्यातर्फे ‘शिक्षणपत्रिका’ हे मासिक प्रकाशित होऊ लागले. या नियतकालिकाचे संपादन ताराबाईंनी केले. या मासिकाची हिंदी आणि मराठी आवृत्ती ताराबाईंच्या बळावरच उभी राहिली. इथे असतानाच ताराबाईंनी शंभरच्यावर पुस्तकांचे संपादन केले, काहींचे लेखन केले, बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मॉन्टेसरी संमेलने भरवली आणि बालशिक्षण हे त्यांचे कार्यक्षेत्रच बनून गेले. ताराबाई भावनगर विषयी म्हणतात, ‘तेथेच मला माझे गुरू, जीवनदिशा आणि जीवनकार्य गवसले’.

          ताराबाई भावनगरला ९ वर्षे होत्या. या काळात त्यांनी फक्त मॉन्टेसोरींच्या तत्त्वांचा अभ्यासच केवळ केला असे नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय संदर्भानुसार त्यांत बरेच बदल केले. आपल्याकडे शिक्षणाला पावित्र्याची किनार आहे. याचा विचार करून बालघरांचे रूपांतर बालमंदिरांत केले. बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. माँटेसोरी तत्त्व बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देते. ताराबाई प्रयोग करत असलेला काळ गांधीयुगाचा म्हणजे पर्यायाने स्वातंत्र्ययुद्धाचा होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला, बालस्वातंत्र्याला विशेष अर्थ होता. ताराबाईंनी या सर्व विचारांचा, संकल्पनांचा मेळ आपल्या बालशिक्षणात साधला.

      बालशिक्षणात प्रयोग आणि त्याचा प्रसार करत असतानाच ताराबाईंनी शिक्षकांचे प्रशिक्षण हाती घेतले. त्यापाठोपाठ बालशिक्षण तळागाळापर्यंत जाण्यासाठी पालक आणि शासन यांच्या प्रबोधनाचे कामही केले. इतके सगळे करूनही त्यांना आता ध्यास लागला होता तो खेड्यातील बालशिक्षणाचा!

       खेड्यांमध्ये बालशिक्षणाचा प्रसार करायचा असेल, तर त्यासाठी स्वस्त साधने हवीत, शिवाय स्थानिक पातळीवरही सहज उपलब्ध होतील किंवा बनवून घेता येतील अशीही हवीत. गिजुभाईंनी जेव्हा बालशिक्षण आजूबाजूच्या खेड्यातून नेण्याचा विचार केला, तेव्हा अशी साधने बनवण्याची जबाबदारी ताराबाईंवर सोपवली. हेच खेड्यातील बालशिक्षणाचे धडे ताराबाईंना पुढे कोसबाडला उपयोगी पडले.


🏢 *शाळा*

                पुढील काळात मुंबईला आल्यावर त्यांनी दादरला आपल्या कल्पनांवर आधारित असे शिशुविहार सुरू केले. इथे येऊन त्यांना आपल्या बालशिक्षणाचा पुन्हा श्रीगणेशा करावा लागला. कारण तोपर्यंत बालशिक्षण आणि ताराबाई दोन्हीही महाराष्ट्राला नवखे होते. शिशुविहारची स्थापना त्यांनी इ.स. १९३६ मध्ये केली आणि जसजशा या बालशाळा वाढत जातील, तसतसा त्यांना आवश्यक असणारा प्रशिक्षित शिक्षकवर्गही लागणार या विचाराने शिशुविहारमध्येच त्यांनी बाल अध्यापक विद्यालयाची मंदिराची स्थापना केली. शिशुविहार आणि बालअध्यापक विद्यालय यांचे पुढच्या दहा वर्षांचे नियोजनही त्यांनी व्यवस्थित करून ठेवले. पुढे पुन्हा खेड्यात जाऊन पूर्णवेळ बालशिक्षणाला वाहून घेण्याची भावना मूळ धरू लागली. त्यासाठी त्या ठाणे जिल्ह्यातील बोर्डीला वास्तव्यास आल्या. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या शिष्या अनुताई वाघ होत्या. बोर्डीला आल्या तेव्हा ताराबाईंच्या आयुष्याची मध्यान्ह केव्हाच उलटून गेली होती आणि बालशिक्षणातही त्या मुरल्या होत्या. अनुताईंचीमात्र ही सुरुवात होती.

         इ.स. १९४५ मध्ये बोर्डीला आल्यावर ताराबाईंनी आपले पूर्ण लक्ष बालशिक्षणावर एकवटले. आता त्यांना त्यांच्या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे परिमाणही द्यायचे होते. कालांतराने कोसबाडला आल्यावर त्यांच्या प्रयोगांना आदिवासींच्या संदर्भांचे परिमाणही मिळाले आणि साऱ्या देशात एकमेव ठरावी अशी सर्वव्यापी बालशिक्षणाची पद्धत अस्तित्वात आली. बोर्डी आणि कोसबाड इथल्या आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या वास्तव्यात ताराबाईंच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या शिक्षणाचा डोलारा कसा उभा राहिला हा इतिहास ग्रंथबद्ध आहे. गिजुभाईंना जशा त्यांच्या आदर्श सहकारी म्हणून ताराबाई मिळाल्या तशाच ताराबाईंना गुरुस्थानी मानून त्यांच्या प्रत्येक प्रयोगात सर्वस्व ओतून काम करणाऱ्या अनुताई मिळाल्या. या दोघींनी हरिजन वाड्यापासून सुरू केलेला प्रवास कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत शेवटी आदिवासी समाजात शिक्षण प्रसार आणि रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत झाला.


🏅 *पुरस्कार*

           ताराबाईंचे हे योगदान केंद्र सरकारच्या नजरेतूनही सुटले नाही आणि त्यांनी ताराबाईंना इ.स. १९६२ साली ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला

          शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. इ.स. १९४६-इ.स. १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय दादरला परिषदेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती.


🪔 *निधन*

               ताराबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा जितकी विलक्षण आहे, तितकीच ती त्यांच्याविषयीचा आदर दुणावणारी आहे. पावलोपावली भिडणारी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी संकट म्हणून न स्वीकारता संधी म्हणून स्वीकारली आणि निव्वळ मार्गच काढला नाही, तर त्यातून सुंदर संकल्पना घडवल्या. वैयक्तिक होरपळीचे प्रतिबिंब ना कधी त्यांच्या स्वभावावर, ना व्यक्तिमत्त्वावर आणि ना कधी त्यांच्या कार्यावर पडले.

           ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे ऑगस्ट ३१ इ.स. १९७३ ला मुंबईत निधन झाले.


🏩 *दादरचे शिशुविहार*

इ.स. १९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुंबईत दादरला शिशुविहार ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील हे पहिले आदर्श बालमंदिर! आज या संस्थेत मराठी व गुजराती या दोन माध्यमांमधून अध्यापक विद्यालय, अभिनव प्राथमिक (विभाग) शाळा, माध्यमिक विद्यामंदिर, सरलाताई देवधर पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र असे विभाग चालतात.

             ' बालदेवो भव ' हे शाळेच ब्रीदवाक्यच आहे. प्रवेशाच्या वेळेस मुलांची मुलाखत घेतली जात नाही. मुले शाळेत रुळेपर्यंत, शाळेचा व शिक्षकांचा परिचय होईपर्यंत पालकांना आठवडाभर मुलांबरोबर बसण्यास मुभा देण्यात येते. मुलांना डबा, पाटीदप्तर, वॉटर बॅग यांचे ओझे आणावे लागत नाही.

                 शाळेच्या इमारतीची रचनाही मुलांचा विचार करूनच केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोकळेपणाने फिरता येईल असे मोठे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात ३० मुलांसाठी एक प्रशिक्षित, प्रेमळ व मुलांचे मन जाणणारी शिक्षिका आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देता येते. आनंदायी वातावरणात खेळाद्वारे मुले येथे हसत खेळत शिक्षण घेत असतात. त्यांना शाळेचीही गोडी वाटू लागते. ती चटकन् रमतात.

               शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरस्त हे लक्षात घेऊन मुलांची शारीरिक वाढ योग्य संतुलित होण्यासाठी वातावरणात मुलांच्या वयानुसार योग्य उंचीची झोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम, डबलबार, सीसॉ इत्यादी साधने आहेत. मुलांना रोज निराळा सकस पौष्टिक आहार दिला जातो.

            लहान मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे भातुकली. मुलांच्या भावनिक विकासात त्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन बाहुलीघराची योजना आहे. त्यासाठी मुलांच्या उंचीचेच खास कपाट बनवले आहे. वाळूच्या हौदात खेळताना लाडू, डोंगर, बोगदा, किल्ला करतात. येथे वाळू स्वच्छ राहील याची काळजी घेतली जाते.

        मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांना भाजी चिरणे, किसणे, निवडणे, कुटणे, पीठ चाळणे, दळणे अशी कामे करायला हवी असतात. त्यांच्या वयाचा व शारीरिक कुवतीचा विचार करून लहानसे जाते, खलबत्ता, चाळणी, कमी धारेची सुरी असे देऊन ती कामे करायला देता येतात. आजपर्यंत एकाही मुलाला अशी कामे करताना इजा झालेली नाही. या साधनांवर खेळत असताना स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप शिकवता येते. मुले स्वावलंबी व्हावी म्हणून नाडी घालणे, बटणे लावणे, वेणी घालणे, पावडर लावणे इ. व्यवसाय दिले जातात.

      कोणतेही ज्ञान ग्रहण करायचे तर त्यासाठी ज्ञानेंदियांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी रंग, वास, चव, आकार, स्पर्श, आवाज या संवेदनांसाठी निरनिराळी साधने आहेत. कै. ताराबाई मोडक व शिक्षणतज्ज्ञ कै. शेष नामले यांनी मॅडम मॉन्टेसरीच्या साधनांवर आधारित भारतातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीला अनुसरून साधनांची निर्मिती केली. प्रत्यक्ष फळे, फुले, धान्य, कागद, कापड, विविध रंगांच्या बाटल्या, खोकी इत्यादींचा उपयोग करून रंग, आकार, वास, चव यासाठी वेळोवेळी नावीन्यपूर्ण साधने बनवून आजचे शिक्षकही त्यात भर घालीत आहेत. बालमंदिरातल्या विविध साधनांवरील खेळांमधून बालकांचा बौद्धिक विकास योजनापूर्वक विकसित केला जातो.

               आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत अशी साधने देऊन मुलांच्या जिज्ञासावृत्तीला खतपाणी घातले जाते. भिंगातून किड्याचे निरीक्षण करणे, लोहचुंबक विविध वस्तूंना लावून पहाणे, साबणाचे फुगे उडवणे इ. खेळून प्रत्यक्ष अनुभव घेतात. वर्गात कोणत्या साधनांवर खेळायचे याचे मुलांना स्वातंत्र्य असते. जोडीदाराबरोबर सहकाराने खेळणे, इतर मुले खेळत असताना पहाणे इ. क्रिया करताना मुलांमध्ये स्वयंशिस्त येते, संयमाची जाणीव येते व सामाजिकतेची जबाबदारी समजते.

   मुलांना श्रवण, भाषण-संभाषण ही कौशल्ये येण्यासाठी आमच्या शिशू विहारमध्ये रोजच बडबडगीते, बालगीते, समरगीते, भजन इ. गाण्याचे प्रकार ऐकवले जातात. मनोरंजन व भावनिक विकासाबरोबरच मानसिक आरोग्य तंदुरुस्त रहाण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. अनौपचारिक गप्पा, सण व भोवती घडणार्‍या घटनांवर गप्पागोष्टी करणे, सहल, नाट्य, बाहुलीनाट्य असे अपक्रम घेतले जातात. गप्पा मारणे हे तर मुलांच्या आवडीचेच. त्यातूनच आपले विचार योग्य शब्दात मांडणे , सुसंगत बोलणे मुले शिकतात.

                मुलांबरोबर गप्पागोष्टी करणे ही बालशिक्षणाने प्राथमिक शिक्षणाला दिलेली देणगी आहे. प्राथमिक शिक्षणातील परिपाठात याचा उपयोग करून घेतला जातो. प्राणी, पक्षी, वाहने, फळे, फुले, भाज्या, वनस्पतींचे अवयव, फळांचे भाग, ब्रश, पूजेचे सामान, वाद्ये इ.चा परिचय-पाठ देताना प्रत्येक वस्तु दाखवून ओळख दिल्यामुळे ते ज्ञान कायम टिकते. तसेच शब्दांचे अर्थ समजतात, शब्दसंग्रह वाढतो. वर्णन करून गोष्ट सांगणे, चित्रांच्या मदतीने गोष्ट सांगणे, चित्रावरून गोष्ट तयार करणे असे विविध उपक्रम घेतले जातात. पाच वर्षांची मुले चित्रावरून गोष्ट तयार करू शकतात. मुलांना व्याकरणशुद्ध बोलता यावे म्हणून व्याकरणावरील मौखिक खेळ घेतले जातात. एकवचन-अनेकवचन, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय वगैरे मौखिक खेळ खेळाच्या स्वरूपात घेतले जातात. या खेळांसाठी मुलांच्या दैनंदिन परिचयाच्या वस्तूंचा उपयोग केला जातो.

              अक्षरओळख देण्यापूर्वी चित्र किंवा वस्तूमधील साम्य ओळखणे, भेद ओळखणे, काय कमी आहे, काय चूक आहे यासारखे खेळ दिले जातात. त्यामुळे अक्षरे शिकताना अक्षरांमधील सूक्ष्म फरक मुले ओळखतात. अक्षरे शिकता शिकता ती केव्हा वाचायला लागतात हे कळतही नाही. लेखनासाठी बोटाच्या स्नायूंचा विकास व्हावा म्हणून मातीकाम, चित्र रंगवणे, ठसेकाम, चित्रे काढणे इ. खेळ दिले जातात. वाचनासाठी, लेखनासाठी आवश्यक पूर्वतयारी झाली, तर लिहायला वाचायला फारसा वेळ लागत नाही. त्यासाठीची पूर्वतयारीच तर बालमंदिरात या प्रत्येक खेळातून, व्यवहारातून व उपक्रमातून केली जाते.

                     भारतीय संस्कृती जपण्यासाठी सर्वधर्मसमभावाने मुलांच्या सहभागाने निरनिराळे सण साजरे केले जातात. मुलांमध्ये राष्ट्रीय भावना जोपासणे फार महत्त्वाचे! त्यासाठी राष्ट्रीय सण, उत्सव, पुढाऱ्यांचे स्मृतिदिन, राष्ट्रध्वजाचे महत्त्व इत्यादी उपक्रम घेतले जातात.

            दिवाळीपूर्वी मुलांकडून भेटकार्ड तयार करून घेऊन पोस्टऑफिस हे ठिकाण प्रसारासाठी निवडले जाते. प्रत्येकाला आपले कार्ड पोस्टात टाकण्यास मिळते. त्याच वेळेस पोस्टाचाही परिचय दिला जातो. तिथे चाललेली कामे दाखवली जातात. तसेच पेट्रोल पंप, भाजी बाजार, धोबी, इस्त्रीवाला वगैरे ठिकाणी प्रत्यक्ष मुलांना नेऊन ती कामे दाखवली जातात. वर्षअखेरीस साडेचार वर्षांवरील मुलांचे एक दिवसीय निवासी शिबीर घेतले जाते. आकाशदर्शन, शेकोटी, शेकोटीची प्रतिज्ञा, त्याच्याभोवती फेर धरून गाणी म्हणणे, दुसऱ्या दिवशी सकाळी सहल अशी कार्यक्रमांची आखणी केली जाते.

            या शिबिरात संघवृत्ती, खिलाडूवृत्ती, स्वयंशिस्त, स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव आदि गुणांचा विकास होतो. शारीरिक स्वच्छता, परिसर स्वच्छता यासंबंधीचे प्रात्यक्षिक मुलांना पहायला मिळते. एका वर्षीच्या सहलीत मुलांना गवतावर पडलेले दव पहायला मिळाले. दवाचा आकार, ओलावा, त्याची चमचम असा चित्तथरारक अनुभव मुलांनी घेतला. मित्रांच्या सहवासात अधिक काळ राहायला मिळाल्यामुळे मुले खुश असतात.

              शिशुविहार म्हणजे एक घर आहे. येथे शिक्षक, शिपाई व मुले यांच्यात प्रेमाचे, आपुलकीचे नाते निर्माण झालेले असते. एकदा एक मुलगा रडत असताना त्याने शांत राहावे म्हणून 'तू सारखा रडत असल्याने माझा कान दुखतो,' असे ताईंनी सांगितले. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या एका विद्याथिर्नीने ते ऐकले. दुसऱ्या दिवशी शाळेला निघताना तिने आईजवळ तेलाची बाटली दे, असा हट्ट धरला. आईलाही काही कळेना. मुलीच्या आग्रहाखातर त्या तेलाची बाटली घेऊन आल्या.

            शिशुविहारामध्ये दोन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लागावी , यासाठी शिशु-बँकेची योजना आहे. ही ऐच्छिक असते. मुलांचे बचत खाते असते. त्यांना पासबुक दिले जाते. मुले आपल्याला मिळणारे बक्षिसाचे पैसे, खाऊचे पैसे त्यात जमा करतात. मुलांनी जमा केलेल्या पैशांवर रीतसर व्याज दिले जाते. हे खाते केव्हाही बंद करण्याची मुभा मुलांना असते. पण जी मुले १० वीपर्यंत यात पैसे साठवतात, त्यांना शाळा सोडून जाताना कॉलेजला जाण्यासाठी आवश्यक असलेल्या फीसाठी एकरकमी हे पैसे मिळू शकतात. कित्येक मुलांनी आजपर्यंत या आमच्या सोयीचा फायदा करून घेतला आहे.

          दुसरा उपक्रम म्हणजे पालकांसाठी. या बालमंदिरात तळागाळातील मुलेही प्रवेश घेतात. त्यातल्या कित्येक मुलांचे पालक निरक्षर असतात. त्यांच्यासाठी बालमंदिरातील शिक्षकांनी साक्षरतेचा वर्ग सुरू करून आपली पालकांची आणि समाजाची असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे.

📝 *लेखन*


नदीची गोष्ट

बालकांचा हट्ट

बालविकास व शिस्त

बिचारी बालके

सवाई विक्रम


🎯  *चरित्र*


सौ. ललितकला शुक्ल यांनी ताराबाई मोडक यांचे चरित्र लिहिले आहे; ते ललितकला प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

      

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

भारतरत्न राजीव गांधी

 

  

          *भारतरत्न राजीव गांधी*

         (भारताचे सातवे पंतप्रधान)

       *जन्म : २० ऑगस्ट १९४४*

      (मुंबई, ब्रिटिश भारत)

       *मृत्यू : २१ मे १९९१*

   (श्रीपेरुमबुदूर,तमिळनाडू, भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आई : इंदिरा नेहरू - गांधी

वडील : फिरोज जहांगीर गांधी

पत्नी : सोनिया गांधी

अपत्ये : राहुल गांधी, प्रियंका गांधी - वडेरा

व्यवसाय : वैमानिक, राजकारणी

 राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. १९८४ ते २ डिसे. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)

 राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले.


राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.


इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.


राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.


राजीव गांधी यांना मरणोत्तर *भारतरत्न* पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🌀 *सुरुवातीचे आयुष्य*

राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला. इंदिरा गांधींनी इ.स. १९४४ मध्ये राजीव यांना जन्म दिला. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद (प्रयागराज) येथे स्थायिक झाले. पण इ.स. १९४९च्या सुमारास इंदिरा व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिरा मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स. १९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

💁‍♂️ *शिक्षण व वैवाहिक जीवन*


राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. इ.स. १९६१ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना १९६५च्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या ॲन्टोनीया माईनो (Antonia Maino - सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे १९६८ मध्ये त्यांनी भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. १९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक म्हणुन रुजू झाले. त्यांना १९७० मध्ये राहुल तर इ.स. १९७२ मध्ये प्रियंका ही दोन अपत्ये झाली.

⚜️ *राजकारणात प्रवेश*

इ.स. १९८० मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. त्याचा विमान अपघातात मृत्यु झाला. यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीव व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ.स. १९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले.

⚜️ *पंतप्रधानपद*

३१ ऑक्टोंबर १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.

♨️ *आरोप*

इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. राजीव गांधी यांनी पुढीलप्रमाणे उद्गार काढल्याचे म्हटले जाते,"जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे." या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली.

🪙 *आर्थिक धोरणे*

राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरून संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले.

💥 *हत्या*

इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभेदरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. लिट्टेने सुरुवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला पण घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर, इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती तर गमावलीच शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले.

🪪 *टपालाचे तिकीट*

राजीव गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.


         

सोमवार, २८ जुलै, २०२५

ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

              *भारतरत्न*

*अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम*

              तथा  

*ए. पी. जे. अब्दुल कलाम*

(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)

*जन्म : १५ ऑक्टोबर १९३*

                *(रामेश्वर)*

*मृत्यू : २७ जुलै २०१५*

                *(शिलाँग)*

सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण

                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 

लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.


🚀 *कार्य* 🛰

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 📚 *शिक्षण*

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.


 ♦ *स्वभाव* 

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

 

🥇 *गौरव*

अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

 

◼ *निधन*

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

       

रविवार, २७ जुलै, २०२५

कल्पना दत्ता


             *कल्पना दत्ता*

       (भारतीय क्रांतिकारक)


      *जन्म : 27 जुलै, 1913*

     (सिरपूर, चितगांव (बांग्लादेश), बंगाल)


     *मृत्यु : 8 फेब्रुवारी 1995*

        (कलकत्ता, पश्चिम बंगाल)


इतर नाव : कल्पना जोशी

पति : पूरन चंद जोशी

नागरिकता : भारतीय

चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा

जेल यात्रा : फेब्रुवारी 1934 मध्ये 21 वर्षाच्या कल्पना दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.


अन्य माहीती : सप्टेंबर  1979  मध्ये कल्पना दत्त यांना पुण्यात 'वीर महिला' या उपाधि ने सम्मानित  केले गेले.


कल्पना दत्ता  (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केल. ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली. 


💁‍♀️ *सुरुवातीचे जीवन*


कल्पनाचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, ती कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी करण्यसाठी गेली. तेथे असतानाच ती विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्स्थेची सदस्य झाली. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.


🔫 *सशस्त्र चळवळ*


चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३० ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मे मध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या 'भारतीय रिपब्लिकन आर्मी’ च्या चितगांव शाखेत भरती झाली. सप्टेंबर १९३१ ला सूर्य सेनने तिला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच तिला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसर्‍या सुनावणीत तिला शिक्षा झाली. १९३९ मध्ये तिची सुटका झाली.


🙍🏻‍♀️ *नंतरचे जीवन*


कल्पना १९४० ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाली, व भाकपची सदस्य झाली. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस तिने स्वयंसेवक म्हणून काम केले. तिने तिचे आत्मकथात्मक पुस्तक, चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ ला इंग्रजीत प्रकाशीत केले. १९४६ मध्ये ती बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढली, पण जिंकू शकली नाही.


नंतर तिने भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तिचा म्रुत्यू झाला.


💁‍♀️ *वैयक्तिक जीवन*


कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला.. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.


🎞️ *चित्रपट*


चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये 'खेले हम जी जान से' हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पनाचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ ला 'चितगांव' हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.

          

बुधवार, २३ जुलै, २०२५

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद

                                                                                                                                                   


     क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद


      *जन्म : २३ जुलै, १९०६*

(भाबरा, झाबुआ, अलिराजपूर, मध्यप्रदेश)

     *विरमरण : २७ फेब्रुवारी,*  

                     *१९३१*

      (अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद)

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना: कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा

धर्म: हिंदू

वडील: पंडित सिताराम तिवारी

आई: जगरानी देवी


          चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पुर्वज कानपूर जवळच्या बादरका गावातच राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.

            वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.

       साँडर्सचा बळी घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंताचा चेला बनले होते. कारण की, या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते, परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.

         काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. वर वर पाहणार्‍याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले आहे असे वाटे.

         गांधी आयर्वीन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतू गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले.”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’,ही आझादांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई भाईंओ, तुम लोग मेरे ऊपर गोलियाँ क्यों बरस रहे हो ? मै तो तुम्हारी आजादी के लिये लढ रहा हूँ ! कुछ समझो तो सही !” इतर लोकांना ते म्हणाले,” इधर मत आओ ! गोलियाँ चल रही है ! मारे जाओगे ! वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”

        आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले.

       नॉट बॉबर उद्गारला, ” असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !”

       पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत, तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडीत मालवीय, सौ. कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. २८ फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढार्‍यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.

       

लोकप्रिय पोस्ट