blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शब्दसमूहाबद्दल एक शब्द.

  • अंग राखून काम करणारा – अंगचोर
  • अकस्मात घडून आलेला बदल – क्रांती
  • अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी – आदिवासी 
  • अतिशय उंच असलेला – अत्युच्च
  • अतिशय नाजुक – तोळामासा
  • अनुभव नसलेला – अननुभवी
  • अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
  • अनेकांमधून निवडलेले – निवड
  • अन्न देणारा -अन्नदाता
  • अपत्य नसणारा – निपुत्रिक
  • अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित 
  • आधी जन्म घेतलेला अग्रज
  • मागून जन्मलेला अनुज
  • अरण्याचा राजा – वनराज
  • अरण्याची शोभा – वनश्री
  • अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
  • आईवडील नसलेला – पोरका
  • आकाशात गमन करणारा – खग
  • आकाशातील ताऱ्यांचा पट्टा – आकाशगंगा
  • आग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र
  • आधुनिक विचारांचा दृष्टिकोण असणारा – पुरोगामी
  • आपल्या लहरी प्रमाणे वागणारा – स्वच्छंदी
  • आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा – खेळगडी
  • आवरता येणार नाही असे – अनावर
  • इच्छीलेली वस्तू देणारी गाय – कामधेनू.
  • इतरांच्या आधारावर जगणारा – आश्रित
  • इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन – वतन
  • ईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक
  • ईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक
  • उंचावरुन कोसळणारा पाणलोट – धबधबा
  • उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
  • उदयाला येत असलेला – उदयोन्मुख
  • एक देश सोडून दुसऱ्या देशी जाणे – देशांतर
  • एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे – एकेश्वरी
  • एकाच गोष्टीचा नाद करणारा – नादिष्ट
  • एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे – अन्योक्ती
  • एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिति – अभाव
  • ऐकण्यास गोड लागणारे – कर्णमधुर
  • ऐकायला व बोलायला न येणारा – मूकबधिर
  • कथा लिहिणारा – कथाकार,कथालेखक
  • कथा सांगणारा – कथेकरी
  • कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
  • कधीही नाश न पावणारा – अविनाशी
  • कधीही नाश न पावणारे – अविनाशी
  • कमी आयुष्य असलेला – अल्पायू,अल्पायुषी
  • कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी,क्षणभंगुर
  • कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष
  • कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यपराङमुख
  • कल्पना नसताना आलेले संकट – घाला
  • कविता करणारा / रचणारा – कवी
  • कविता करणारी – कवयित्री
  • कशाचीही भीती नसणारा – निर्भय
  • कष्ट करून जगणारा,श्रमांवर जगणारा – श्रमजीवी,कष्टकरी
  • कष्ट करून जगणारे – कष्टकरी
  • कसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ
  • कसलीही अपेक्षा नसणारा – निरपेक्ष
  • कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा – दिवटी
  • कार्य करण्यास सक्षम असलेला – कार्यक्षम
  • किल्ल्याच्या सभोवतालची भिंत – तट
  • कुंजात विहार करणारा – कुंजविहारी
  • कुस्ती खेळण्याची जागा – हौद,आखाडा
  • केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
  • केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
  • केवळ धर्मभेद करणारा – धर्मांध
  • कैदी ठेवण्याची जागा – कारागृह,बंदिशाळा,तुरुंग
  • कोणाचाही आधार नाही असा – अनाथ
  • कोणाच्याही पक्षात सामील न होणारा – अपक्ष
  • खूप आयुष्य असलेला – दीर्घायू,दीर्घायुषी
  • खूप दानधर्म करणारा – दानशूर
  • खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
  • खूप मोठा विस्तार असलेले – ऐसपैस,विस्तीर्ण
  • गाईसाठी काढून ठेवलेला घास – गोग्रास
  • गाडीच्या चाकांनी पडलेली वाट – चाकोरी
  •  गाणे गाणारा – गायक
  • गावच्या कामकाजाची जागा – चावडी
  • गावाचा कारभार – गावगाडा
  • गावाभोवतालचा तट – गावकूस
  • गुणांची कदर करणारा – गुणग्राहक
  • गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा – वावटळ
  • ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर – प्रक्षिप्त
  • घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
  • घरदार नसलेला -उपऱ्या
  • घरी पाहुणा म्हणून आलेला – अतिथि
  • घोडे बांधायची जागा – पागा,तबेला
  • चंद्रापासून येणारा प्रकाश – चांदणे
  • चंद्राप्रमाणे मुख असणारी – चंद्रमुखी
  • चरित्र लिहिणारा – चरित्रकार
  • चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुद्धपक्ष,शुक्लपक्ष
  • चार पाय असणारे – चतुष्पाद
  • चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चव्हाट
  • चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक,चवाठा
  • चार वेदांमध्ये पारंगत असणारा – चतुर्वेदी
  • चारही बाजूला पाणी असलेला भूप्रदेश – बेट
  • चिखलात उगवलेले कमळ – पंकज 
  • ****
  • चित्रे काढणारा – चित्रकार
  • चिरकाल जगणारा – चिरंजीवी
  • जगाचा नाश होण्याची वेळ – प्रलयकाळ
  • जमिनीचे दान – भूदान
  • जमिनीतून पाझरून निघणारा झरा – उपळी
  • जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
  • जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी – उभयचर
  • जमीनीखालचा गुप्त मार्ग – भुयार
  • जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा – दिपस्तंभ
  • जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
  • जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी – कमलाक्षी
  • जिवंत असेपर्यन्त -आजन्म
  • जिवाला जीव देणारा – जिवलग
  • जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी
  • जे साध्य करावयाचे आहे ते – ध्येय
  • ज्याचा तळ लागत नाही ज्याचा थांग लागत नाही असा – अथांग
  • ज्याचा विवाह झाला नाही असा – अविवाहित
  • ज्याचा विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय
  • ज्याची किंमत होऊ शकत नाही असे – अनमोल
  • ज्याचे हात गुढघ्यापर्यन्त लांब आहेत असा – आजानुबाहू
  • ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रपाणि,चक्रधर
  • ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा – उपकृत
  • ज्याला आईवडील नाहीत असा – पोरका,अनाथ
  • ज्याला आकार नाही असा – निराकार
  • ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा – अजर
  • ज्याला कधीही वीट नाही असे – अवीट
  • ज्याला काशाचीच उपमा देता येणार नाही असे- अनुपम
  • ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
  • ज्याला मरण नाही असा – अमर
  • ज्याला लाज नाही असा – निर्लज्ज
  • ज्याला सीमा नाही असे – असीम
  • ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा – अजिंक्य
  • ज्यास कोणीही शत्रू नाही असा – आजातशत्र
  • ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
  • ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
  • डोंगर पोखरून तयार केलेला रस्ता – बोगदा
  • डोंगरकपारीत राहणारे लोक – गिरिजन
  • डोक्यावर ओझे वाहून नेणारा – माथाडी
  • ढगांनी भरलेले – ढगाळलेले,अभ्राच्छादित
  • तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख – ताम्रपट
  • तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण – तिठा
  • तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
  • तोंडावर स्तुती करण्याचा गुण – तोंडपुजेपणा
  • त्वरित कृती करणारा – जहाल
  • थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट
  • थोड्यावर संतुष्ट असणारा – अल्पसंतुष्ट
  • थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा – आशीर्वाद
  • दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
  • दगडावर मूर्ती घडवणारा – शिल्पकार 
  • दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
  • दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
  • दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
  • दर महिन्याला प्रसिद्ध होणारे – मासिक
  • दर वर्षाला,वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे – वार्षिक
  • दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक
  • दररोज ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम
  • दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
  • दारावरील पहारेकरी – द्वारपाल,दारवान
  • दुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त
  • दुसऱ्याचे दु:ख पाहून कळवळणारा
  • दुसऱ्याच्या मनातील जाणणारा – मनकवडा
  • दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा – उदार,दिलदार
  • दुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी
  • दुसऱ्यावर अवलंबून नसलेला – स्वावलंबी
  • दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
  • देव आहे असे मानणारा – आस्तिक
  • देवलोकातील सुंदर स्त्रिया – अप्सरा
  • देवापुढे सतत जळणारा दिवा -नंदादीप
  • देशाची सेवा करणारा – देशसेवक
  • दोन थड्या भरून वाहणारी नदी – दुथडी
  • दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण – संगम
  • दोन नद्यांमधील जागा – दुआब
  • धान्य साठवण्याची जागा – कोठार
  • न कळण्यासारखे – अनाकलनीय
  • 168.न टाळता येणारे – अपरिहार्य
  • नऊ दिवस टिकणारा ताप – नवज्वर
  • नदीची सुरुवात होते ती जागा – उगम
  • नदीतील खोलगट भागातील खोल पाणी – डोह.नवऱ्या मुलाचा बाप – वरबाप
  • नवीन मतांचा पुरस्कार करणारा  - नवमतवादी
  • नसलेली गोष्ट आहे असे वाटणे – आभास
  • नाटक लिहिणारा – नाटककार
  • नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत – नांदी
  • नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट,अभिनेता
  • नाणी तयार करण्याचा कारखाना – टंकसाळ
  • नावाचा एकसारखा उच्चार – घोष
  • निरर्थक गोष्टी किंवा गप्पा – भाकडकथा
  • निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था – अनाथाश्रम
  • नेत्याचे अनुकरण करणारे – अनुयायी
  • नेहमी खोडी काढणारा – खट्टयाळ
  • नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
  • पडक्या घराची मोकळी जागा – बखळ
  • पडदा दूर करणे – अनावरण
  • पतीचा भाऊ – दीर
  • पहाटेपूर्वीची वेळ – उष:काल
  • पाऊस मुळीच न पडणे -अवर्षण , अनावृष्टी
  • पाच वडांचा समूदाय असलेली जागा – पंचवटी
  • पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
  • पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
  • पायात जोडे न घातलेला – अनवाणी
  • पायात पादत्राणे न घालता – अनवाणी
  • पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
  • पायी जाणारा – पादचारी
  • पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा – प्रदर्शन
  • पाहण्यासाठी आलेले लोक – प्रेक्षक
  • पिकांच्या दोन ओळींतील अंतर – पाथगी
  • पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ – पेय
  • पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक – पूरग्रस्त
  • पूर्वी कधीही घडले नाही असे – अभूतपूर्व
  • पूर्वी कधीही न ऐकलेले – अश्रुतपूर्व
  • पूर्वी कधीही न घडलेले – अभूतपूर्व
  • पूर्वी जन्मलेला – पूर्वज
  • प्रेरणा देणारा – प्रेरक
  • फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त,अन्नछत्र
  • बसगाड्या थांबण्याची जागा – बस-स्थानक
  • बातमी आणून देणारा/देणारी – वार्ताहर
  • बातमी सांगणारा/सांगणारी – वृत्तनिवेदक /वृत्तनिवेदिका
  • बालकांपासून वृद्धांपर्यन्त सर्वजण – आबालवृद्ध
  • बिनचूक वजनाचा काटा – धारवाडी काटा
  • भांडण उकरून काढणारा – भांडकुदळ
  • भाकरी करण्याची लाकडी परात – काठवत
  • भाषण ऐकणारे – श्रोते
  •  भाषण करणारा – वक्ता
  •  मडकी बनवणारा -कुंभार
  •  मन/चित्त आकर्षित करणारा – मनोहर,चित्ताकर्षक,मनोवेधक चित्तवेधक
  • मनाला आल्हाद देणारा – आल्हाददायक
  • मरण येईपर्यंत – आमरण
  • मशाल धरणारा नोकर – मशालजी
  • माकडाचा खेळ करून दाखवणारा – मदारी
  • मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक – चित्रगुप्त
  • मालाचा साठा करून ठेवण्याची जागा – गुदाम,कोठार,वखार
  • मासे पकडणारा – कोळी
  • मुद्द्याला धरून असलेले – मुद्देसूद
  • मूर्ती बनवणारा – मूर्तिकार
  • मूर्तीची तोडफोड करणारा – मूर्तिभंजक
  • मूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक
  • मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
  • मोजता येणार नाही असे – अगणित,असंख्य
  • मोठ्याने केलेले पाठांतर – घोकंपट्टी
  • मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र
  • म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार – म्हातारचळ
  • यज्ञ करण्याची ठराविक जागा – यज्ञसूकर
  • योजना आखणारा – योजक
  •  रक्षण करणारा – रक्षक
  • रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
  • राजाची स्तुती करणारा – भाट
  • राज्यातील लोक – प्रजाजन,रयत,प्रजा
  •  रात्री फिरणारा – निशाचर
  • रात्रीचा पहारेकरी – जागल्या
  • रिकामा हिंडणारा – टवाळखोर
  • रोग्याची शुश्रूषा करणारी – परिचारिका
  • लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर – माहेर
  • लग्नात द्यावयाची भेट – आहेर
  • लग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी
  • लढण्याची विद्या – युद्धकला
  • लहान मुलाला झोपण्यासाठी गायिलेले गाणे – अंगाईगीत
  • लाखो रुपयाचा धनी – लक्षाधीश
  • लिहिता – वाचता येणारा – साक्षर
  • लिहिता वाचता न येणारा – निरक्षर
  • लोकांचा आवडता – लोकप्रिय
  • लोकांचे नेतृत्व करणारा – लोकनायक
  • लोकांचे पुढारीपण करणारा – पुढारी
  • लोकांच्या मदतीने चाललेले राज्य – प्रजासत्ताक
  • लोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य
  • वनात राहणारे प्राणी – वनचर
  • वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
  • वाडवडिलांकडून मिळालेली – वाडीलोपार्जित
  • वारस नसलेला – बेवरसी
  • विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई
  • .विमान चालवणारा – वैमानिक
  • विविध बाबींत प्रवीण असलेला – अष्टपैलू
  • विषयाला सोडून बोलणे – अप्रस्तुत
  • व्याख्यान देणारा – व्याख्याता
  • शत्रूकडील बातमी काढणारा – हेर
  • शत्रूला सामील झालेला – फितूर
  • शापापासून सुटका – उ:शाप
  • शिकारीसाठी उंच बांधलेला माळा – मचाण 
  • ****
  • शिल्लक राहिलेले – उर्वरित
  • शोध लावणारा – संशोधक
  • श्रम न करता खाणारा -ऐतोबा
  • श्रेष्ठ ऋषि – महर्षी
  • संकट दूर करणारा – विघ्नहर्ता
  • संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
  • सतत उद्योगशील असणारा – उद्यमशील
  • सतत एकटे राहण्याची आवड असलेला – एकलकोंडा
  • सतत काम करणारा – दिर्घोद्योगी
  • .सतत कोसळणारा पाऊस – झड
  • सतत निंदानालस्ती करणारा – निंदक
  • सतत पैसा खर्च करणारा – उधळ्या
  • समाजाची सेवा करणारा – समाजसेवक
  • .सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
  • .सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
  • सर्व दिशांना पांगलेले – दिगंतर
  • सर्वात शेवटी जन्मलेला -अनुज
  • साक्षात्कार झालेला – द्रष्टा
  • सापांचा खेळ करणारा – गारुडी
  • सिनेमाच्या कथा लिहिणारा – पटकथा लेखक
  • सुखाच्या मागे लागलेला – सुखलोलुप
  • सूचना न देता येणारा – अतिथि
  • सूर्याचे उत्तरेकडे सरकणे – उत्तरायण
  • सैन्याची चक्राकार केलेली रचना – चक्रव्यूह
  • स्तुती गाणारा – भाट
  • स्वच्छ,गार पाणी ठेवण्याची जागा – आबदारखना
  • स्वतः श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
  • स्वतः संपादन केलेली – स्वार्जित,स्वसंपादित
  • स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र – आत्मवृत
  • स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा – सांगकाम्या
  • स्वतःच्या फायद्याचे पाहणारा – अप्पलपोटा
  • स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा – स्वार्थी
  • स्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी
  • स्वतःबद्दल अभिमान नसलेला – स्वाभिमानशून्य
  • स्वदेशाचा अभिमान असणारा – स्वदेशाभिमानी
  • स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
  • हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
  • .हत्तीला वश करण्याचे साधन – अंकुश
  • हरिणासारखे डोळे असणारी – मृगाक्षी,हरिणाक्षी,मृगनयना
  • हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्रांती
  • हिंडून करायचा पहारा – गस्त
  • हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत – आसेतुहिमाचल 
  • होडी चालवणारा – नावाडी,नाखवा,नाविक
  •      स्वतःचा  अजिबात अभिमान नसलेला  स्वाभिमान शून्य
  • दुसऱ्याच्या हिताची काळजी करणारे -हितचिंतक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.