22 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९३१: फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून हॉटसन वाचले.
* १९८३: पोलंड - १३ डिसेंबर १९८१ ला सुरु झालेला मार्शल लॉ अधिकृतपणे रद्द.
* २०१९: चांद्रयान २, इसरो - अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण, भारताची दुसरी चंद्र शोध मोहीम सुरु.
जन्म:
* १९२३: मुकेश, हिंदी चित्रपट पार्श्वगायक.
* १९३०: श्रीराम शंकर अभ्यंकर, भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक.
* १९५५: रिचर्ड जे. कॉर्मन, आर. जे. कॉर्मन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक.
* १९७०: देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री.
* १९९२: सेलेना गोमेझ, अमेरिकन गायक व अभिनेत्री.
* १९९५: अरमान मलिक, भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि गीतकार.
मृत्यू:
* १९१८: इंद्र लाल रॉय, पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट.
* १९३२: रेगिनाल्ड फेसेनडेन, कॅनेडियन-अमेरिकन शोधक, रेडिओ टेलेफोनीचे संस्थोधक.
* १९८४: गजानन ठोकळ, साहित्यिक आणि प्रकाशक.
* २००३: उदय हुसेन, सद्दाम हुसेन यांचा मुलगा.
* २००३: कुसय हुसेन, सद्दाम हु
सेन यांचा मुलगा.