blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

एकाच शब्दाचे अनेक अर्थ

 



मराठी मध्ये असे अनेक शब्द आहेत .एकाच शब्दाचे अनेक अर्थ सर्वाना माहित पाहिजेत. ते खालीलप्रमाणे....

  या घटका वर 

परीक्षेत प्रश्न विचारले जातात.


एकाच शब्दाचे अनेक अर्थ  


 हस्त         हात , एक नक्षत्र 

अंक संख्या, मांडी


अंग  शरीर, बाजू, भाग


अंतर


मन, लांबी, भेद, फरक


अंबर  आकाश, वस्त्र


अनंत परमेश्वर, अमर्याद


अभंग  न भंगलेला, का व्यरचनेचा  एक  प्रकार


आनंद      सुखाची कल्पना, मुलाचे नाव


आस      इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा


उत्तर   प्रश्नाचे उत्तर , एका दिशेचे नाव


ऋण  वजाबाकीचे चिन्ह, कर्ज, उपकार


ओढा आकर्षण, मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ


कर हात, सरकारी सारा,किरण


कर्ण महाभारतातील योद्धा, कान, त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू


कलम रोपांचे कलम, लेखणी


कळ  वेदना, भांडणाचे कारण, गुप्त किल्ली, बटन


कांबळे  घोंगडी, एक आडनाव


काळ  वेळ, मृत्यू, यम


किरण  उन्हाची तिरीप, व्यक्तीचे नाव


कीर्ती   प्रसिद्धी, मुलीचे नाव


कुबेर  इंद्रदेवाचा खजाना, खूप श्रीमंत व्यक्ती


गार    थंड,बर्फाची गोटी


घट  झीज, मडके


घाट  डोंगरातला रस्ता, नदीच्या पायऱ्या


चक्र   चाक,एक शस्त्र


चरण  पाय, ओळ


चिमणी   एक पक्षी,गिरणीचे धुराडे


चिरंजीव  मुलगा, दीर्घायुषी


चीज   सार्थक, दुधापासून बनवलेला पदार्थ 


चूक   दोष,लहान खिळा


छंद  नाद, काव्यरचनेचा एक प्रकार


जना  लोकांना, स्त्रीचे नाव


जलद  लवकर, ढग 


जात   समाज, प्रकार 


जीवन  आयुष्य, पाणी


जोडा  बूट, जोडपे


डाव  कपट, कारस्थान, खेळी


तट   कडा,किनारा,किल्ल्याची भिंत 


तळी  तळाला, ताम्हन, तलाव


ताव   तापविणे,कागद


तीर    काठ,बाण,बांध


दंड   काठी,शिक्षा,बाहू


द्वीज पक्षी, दात, ब्राह्मण


धड   अखंड, स्पष्टपणे, मानेखालचा शरीराचा भाग


धडा  पाठ,रिवाज


धनी  श्रीमंत मनुष्य,मालक


ध्यान  समाधी, चिंतन, भोळसर व्यक्ती


नग   पर्वत,वस्तू


नाद   छंद,आवाज,आवड


नाव   नाव,होडी


पक्ष    पंख,वादातील बाजू,पंधरवडा,राजकीय संघटना


पत्र   पान,चिठ्ठी


पय   पाणी,दूध 


परी     पंख असलेली काल्पनिक देवता 


पान   जेवणाचे ताट, वहीचे पान, झाडाचे पान 


पार   झाडाभोवतालचा ओटा, पलीकडे


पाल   सरपटणारा प्राणी, राहुटी 


पालक  आईवडील, पालनपोषण करणारे, एक पालेभाजी


पास       परवाना,उत्तीर्ण 


पूर     पाण्याचा लोंढा,नगर


प्रताप     पराक्रम, मुलाचे नाव 


प्रवीण      कुशल, मुलाचे नाव


भाव   भक्ती,किंमत,भावना,दर


मान   शरीराचा एक अवयव,प्रतिष्ठा


माया    धन,ममता


माळ     फुलांचा सर,ओसाड जागा


रक्षा   रक्षण,राख


रस   द्रवपदार्थ,गोडी


वचन  भाषण,प्रतिज्ञा


वजन   मान,भार


वर   आशीर्वाद,नवरा,वरची दिशा


वळण    प्रवृत्ती,वाकडा रस्ता


वाणी    व्यापारी,उद्गार,बोलणे


वात   ज्योत,वारा,विकार


वार   दिवस,घाव


शब्द  अनेक अर्थ


सुमन   फूल,पवित्र मन


हार   पराभव,फुलांची माळ 


 लहर    लाट , हुक्की ,नागमोडी रेषा  


वाणी     व्यापारी ,बोलणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.