मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

वाक्यप्रचार


 • वाक्प्रचार व त्यांचा अर्थ याचा दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग होतो. दैनंदिन व्यवहारामध्ये बोलण्या बरोबरच साहित्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर केला जातो. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये  अनेक प्रश्न विचारले जातात.

 • अंग चोरणे- फारच थोडे काम करणे.

 • अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे.

 • अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे.

 • अंगवळणी पडणे- सवय होणे.

 • उर भरून येणे- गदगदून येणे.

 • कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे.

 • कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे.

 • कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.

 • काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे .
 • कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
 • कान उपटणे- कडक शब्दात समजावणे.

 • कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
 • कान निवणे- ऐकुन समाधान करणे.

 • कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे.

 • कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे.

 • कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.

 • कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.

 • कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे.
 • कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे.
 • कानावर घालणे- लक्षात आणून देणे.
 • कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे.
 • केसाने गळा कापणे- घात करणे.
 • कंठ दाटून येणे- गहिवरून येणे.
 • कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे.
 • कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे.
 • कंबर कसणे- जिद्दीने तयार होणे.
 • कंबर खचणे- धीर सुटणे.
 • खांद्याला खांदा भिडवने- सहकार्य व एकजुटीने काम करणे.

 • डोळ्यात खुपणे- मत्सर करणे.
 • डोळ्यात धूळ फेकणे- खोटेनाटे सांगून फसवणे.
 • डोळ्याला डोळा न लागणे- झोप न येणे.
 • डोळ्याचे पारणे फिटणे- समाधान होणे किंवा पाहून आनंदित होणे.
 • डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.
 • डोळ्यातून थेंब न काढणे- मोठा आघात होऊनही न रडणे.
 • तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापने.
 • तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.
 • तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे / अडचणीत येणे.
 • तोंडचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.
 • तोंड देणे- सामना करणे
 • तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे.
 • तोंड भरून बोलणे- मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
 • तोंड वेंगाडणे- याचना करणे.
 • तोंड सांभाळून बोलणे- जपून बोलणे.
 • तोंड सुख घेणे- दोष देताना वाटेल तसे बोलणे.
 • तोंडाची वाफ दवडणे- वायफळ बडबड करणे.
 • तोंडात बोट घालणे- आश्चर्यचकित होणे.

 • तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.
 • दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.
 • दात धरणे- सूड घेण्याची भावना बाळगणे.
 • दात विचकणे- निर्लज्जपणे असणे.
 • दाताच्या कण्या करणे- वारंवार विनंती करणे.
 • दाती तृण धरणे- शरण जाणे.
 • नजर चुकवणे- न दिसेल अशी हालचाल करणे. 
 • नवल वाटणे- आश्चर्य वाटणे, चकित होणे.
 • नाक उडवणे- थट्टा, उपास करणे
 • नाक कापणे- थट्टा उपहास करणे
 • नाक खुपसणे- नको त्या गोष्टीत उगाच सहभाग घेणे
 • नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे.
 • नाक मुरडणे- नापसंती दाखवणे, उपहास करणे
 • नाकाने कांदे सोलने- जास्तीचे शहाणपण दाखवणे
 • नाकी नऊ येणे- फार दमणे
 • पदरात घेणे- स्वीकारणे
 • पदरात घालने- चूक पटवून देणे
 • पाठ थोपटने- शाबासकी देणे, कौतुक करणे
 • पाठीशी घालणे- संरक्षण देणे
 • पाठ दाखवणे- समोरून पळून जाणे
 • पाठ पुरवणे- सारखे मागे लागणे
 • पाठबळ असणे- आधार असणे
 • पाठीला पोट लागणे- उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे
 • पाठ न सोडणे- एखाद्या गोष्टीचा पिच्चा पुरवणे
 • पाढा वाचणे- सविस्तर सांगणे
 • पाणी दाखवणे- सामर्थ्य दाखवणे
 • पाणी पडणे- वाया जाणे, नष्ट होणे
 • पाणी मुरणे- कपटाने काहीतरी लपवून ठेवणे
 • पाणी पाजणे- पराभव करणे
 • पाणी सोडणे- अशा सोडणे
 • पाय काढणे- विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
 • पाय घसरणे- तोल जाणे, मोहात फसणे
 • पायबंद घालने- आळा घालणे
 • पाय मोकळे करणे- फिरायला जाणे
 • स्वतःच्या पायावर उभे राहणे- स्वतंत्र किंवा स्वावलंबी होणे
 • पोटात कावळे कोकळणे- खूप भूक लागणे
 • पोटात ठेवणे- गुपित सांभाळून ठेवणे
 • पोटात शिरणे- मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे
 • पोटाला चिमटा घेणे- अत्यंत काटकसरीने राहणे
 • पोटावर पाय देणे- रोजंदारी बंद करणे
 • पोटाशी धरणे- माया करणे, कुशीत घेणे
 • प्राणापेक्षा जपणे- स्वतःच्या इत जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
 • बोटावर नाचवणे- हवे तसे खेळवणे
 • मनात अढी धरणे- एखाद्याविषयी मनात राग निर्माण होणे
 • मांडीवर घेणे- दत्तक घेणे
 • मुठीत असणे- ताब्यात असणे
 • रक्त आटवणे- अतीकष्ट करणे
 • रक्ताचे पाणी करणे- अतिश्रम करणे
 • हाडांची काडे करणे- अतिकष्ट करणे
 • हाडे खिळखिळी करणे- भरपूर चोप देणे
 • हात आखडणे- देण्याची क्षमता असतानाही कमी देणे
 • हातघाईवर येणे- मारमारीची पाळी निर्माण करणे
 • हातचा मळ असणे- एखादी गोष्ट सहज करता येणे
 • हात झटकणे- नामानिराळा होणे

 • हात टेकणे- नाईलाजाने शरण येणे

 • हात दाखवणे- मार देणे, फसवणे
 • हात देणे- मदत करणे

 • हात मारणे- ताव मारणे 

 • हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे

 • हातापाया पडणे- लाचारीने विनवण्या करणे
 • हातावर तुरी देने- डोळ्यादेखत फसवून पळणे
 • दोन हात करणे- सामना करणे, टक्कर देणे
 • हृदय भरून येणे- गदगदून येणे
 •  

 • अधीर होणे - उत्सुक होणे.


 • अन्नान होणे - गरीबीमुळे खायला न मिळणे.

 • .

 • अभिमान वाटणे - गर्व वाटणे.


 • अभिवादन करणे - नमस्कार करणे. • अंदाज बांधणे - अटकळ बांधणे, तर्क करणे.


 • अंगाची लाहीलाही होणे- अतिशय संताप येणे.
 • .

 • अपव्यय टाळणे- दुरुपयोग न करणे.


 • अन्नाला जागणे- कृतज्ञ असणे.


 • अत्तराचे दिवे जाळणे - मूर्खपणाने उधळपट्टी करणे.


 • आश्चर्य वाटणे -नवल वाटणे.
 • .

 • आकाश ठेंगणे वाटणे - खूप आनंद होणे.
 •  

 • आव्हान देणे - संघर्षाला आ
 • .

 • आडवे होणे- झोपणे.
 • .

 • आवर्जून पाहणे - मुद्दाम पाहणे.


 • आभाळ कोसळणे- मोठे संकट येणे.


 • आहुती देणे- बलिदान देणे.

 • आरंभ होणे - सुरुवात होणे.


 • इनाम देणे - बक्षीस देणे.

 • उदास होणे - खिन्न होणे.


 • उदरनिर्वाह करणे - उपजीविका करणे.


 • उत्तेजन देणे- प्रोत्साहन देणे .


 • उघड्यावर टाकणे - निराधार करणे.


 • उपकार फेडणे - उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.

 • उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.
 •  

 • उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.


 • कंठ दाटून येणे - गहिवरून येणे, रडू येणे.


 • कानाडोळा करणे -  दुर्लक्ष करणे.


 • कंबर कसणे  - तयार होणे.


 • कान देणे - लक्षपूर्वक ऐकणे.


 • कानात वारे शिरणे - बेभान होणे.


 • कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.
 • .

 • काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.


 • केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने घात करणे.


 • कानोसा घेणे- अंदाज घेणे
 • . • कागाळी करणे - तक्रार करणे.


 • कंप पावणे - थरथरणे.
 • .

 • कोसळणे - जोरात पडणे.
 • .

 • कुरवाळणे - गोंजारणे.


 • कान झाकून घेणे - न ऐकणे, दुर्लक्ष करणे.


 • करुणा करणे -  दया दाखवणे.


 • खडानखडा माहिती असणे - बारीकसारीक गोष्टी माहिती असणे.


 • खळगी भरणे- पोट भरणे.
 • .

 • खंड पडणे- काम मध्येच थांबणे.

 • खो घालने- कामात विघ्न आणणे.


 • गुबगुबीत होणे - लठ्ठ होणे.


 • गळ घालणे -अतिशय आग्रह करणे.


 • गुजराण करणे - निर्वाह करणे.
 • .

 • गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.


 • घाबरगुंडी उडणे - खूप घाबरणे.
 •  

 • घाम गाळणे  - कष्ट करणे.
 •  

 • घर डोक्यावर घेणे -  खूप दंगा करणे.
 • .

 • चिंतेत पडणे  - काळजीत पडणे.
 • .

 • चक्कर मारणे - फेरफटका मारणे.


 • जळून खाक होणे- पूर्ण जळून राख होणे.

 • जीभ सैल सोडणे- वाटेल तसे बोलणे.
 • .

 • झुंबड उडणे- खूप गर्दी होणे.
 • .

 • झेंडू फुटणे- खूप भीती वाटणे.


 • टोमणा मारणे- खोचकपणे बोलणे.


 • डोळ्याचे पारणे फिटणे -  अतिशय प्रसन्न होणे.

 • डोळा लागणे -  झोप लागणे.
 • .

 • डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे. 


 • डोळ्यात खुपणे- मत्सर करणे. 


 • डोळा लागणे- झोप लागणे.


 • डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.


 • तणतणत निघून जाणे- खूप रागाने निघून जाणे.


 • तल्लीन होणे- गुंग होणे.
 • .

 • ताव मारणे  -  भरपूर खाणे.


 • तोंड देणे - सामना करणे.
 • .

 • दम लागणे- धाप लागणे.
 • .

 • दिवस फिरणे- वाईट दिवस येणे.
 • .

 • धूम ठोकणे- पळून जाणे.
 • .

 • धारातीर्थी पडणे- लढाईत मरण येणे.
 • .

 • नाव मिळवणे- कीर्ती मिळवणे.
 • .

 • पाठ थोपटने- शाबासकी देणे.


 • पाठबळ असणे- आधार असणे.
 • .

 • पोटात कावळे ओरडणे  - खूप भूक लागणे.


 • प्रशंसा करणे - स्तुती करणे.


 • पोटाशी धरणे - मायेने कुशीत घेणे.
 • .
 • तोंडात शेण घालणे- पराकोटीची निंदा करणे.
 • तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.
 • तोंडाला तोंड देणे- भांडणे.

 • पारा चढणे - राग येणे.

 • प्राणाला मुकले - जीव जाणे, मरण येणे.

 • फडशा पडणे-  खाऊन संपवणे.
 • .

 • बाचाबाची होणे - शाब्दिक भांडण होणे.
 • .

 • बेत करणे - योजना आखणे.

 • भारी वाटणे- चांगले वाटणे.


 • मुठीत असणे- ताब्यात असणे.
 •  .

 • मान्य करणे - कबूल करणे.
 • .

 • मार्ग काढणे - रस्ता काढणे, मार्ग काढणे.


 • मुग्ध होणे - मोहित होणे.
 •  .

 • दिवस पालटणे - चांगले दिवस येणे.


 • देखरेख करणे - राखण करणे.


 • दंग असणे  - मग्न असणे.


 • धुळीस मिळणे  - नष्ट होणे.
 • .

 • धडपड करणे - खूप कष्ट करणे.


 • नाळ तोडणे - संबंध तोडणे.

 •   • रस असणे  - रुची असणे, आवड असणे.
 • .

 • लळा लागणे - ओढ वाटणे.


 • वनवन करणे - खूप भटकणे.


 • वीरगती प्राप्त होणे - देशासाठी लढताना मरण येणे. • समाधानाची ढेकर देणे - जेवून तृप्त होणे.


 • संघर्ष करणे - झुंजणे, लढणे.


 • संकल्प करणे - एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे.
 • .

 • सतर्क असणे - दक्ष असणे.


 • स्तुती करणे - प्रशंसा


 • सहाय्य करणे  - मदत करणे.


 • हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.


 • हात देणे- मदत करणे.


 • हातावर तुरी देणे- फसवून पळून जाणे.
 • .

 • हरभऱ्याच्या झाडावर चढवणे- खोटी स्तुती करणे.

 • हाय खाणे- धास्ती घेणे.
 • .

 • हायसे वाटणे- समाधान वाटणे.


 • हुलकावणी देणे- फसवणे.
 •  
 • गळा काढणे- मोठ्याने रडणे.
 • गळा गुंतणे- अडचणीत सापडणे.
 • गळ्यात गळा घालणे- खूप मैत्री करणे.
 • गळ्यातला ताईत होणे- अत्यंत आवडता होणे.
 • गळ्यापर्यंत बुडणे- कर्जबाजारी होणे, डबघाईला येणे.
 • चेहरा खुलने- आनंदित होणे.
 • चेहरा पडणे- लाज वाटणे, खजील होणे.
 • छाती दडपणे- घाबरून जाणे.
 • जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.
 • जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे. 
 • डोक्यावर खापर फोडणे- निर्दोष माणसावर दोष टाकणे.
 • डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे.
 • डोळा असणे- नजर/पाळत ठेवणे.
 • डोळा लागणे- झोप येणे.
 • डोळे उघडणे-अनुभवाने सावध होणे.
 • डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
 • डोळे निवणे- समाधान होणे.
 • डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
 • डोळ्यात अंजन घालणे- चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
 • .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.