blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शिक्षक बदली नियमावली 2022

बदली प्रक्रिया कार्यपध्दती

*४.१ टप्पा क्र १ :- यामध्ये समाणिकरणाचा मुद्दा आहे. एखाद्या शाळेमध्ये काही पदे रिक्त ठेवायचे आहेत असे घोषित केल्यानंतर जितकी पदे रिक्त ठेवावयाची आहेत तितकी पदे आगोदरच रिक्त आसतील तर काहीही अडचण येणार नाही परंतु जर ठेवावयाच्या रिक्त पदापेक्षा कमी पदे रिक्त असतील म्हणजे त्या ठेवावयाच्या रिक्त पदावर शिक्षक कार्यरत असतील तर, ठेवावयाच्या रिक्त पदाइतक्या बदलीपात्र शिक्षकांची बदली करण्यात येणार आहे. त्यासाठी बदलीयादी मध्ये कोणाचे नाव घ्यावयाचे ते खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे. उदा. एका शाळेमध्ये ३ पदे रिक्त ठेवावयाची आहेत परंतु सध्या एकच पद रिक्त आहे तर त्या शाळेत आणखी दोन पदे रिक्त करावी लागतील त्यासाठी त्या शाळेतील बदलीपात्र नियमानुसार त्या दोन सेवाज्येष्ठ शिक्षकांचे नाव बदलीपात्र यादीमध्ये येइल आणि दोन शिक्षकांची बदली होइल. (४.१.१ ) म्हणजे आवश्यक तीन पदे रिक्त होतील.* 

*४.१.२ शाळेत एकच बदलीपात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होइल व एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील. तीन रिक्त पदापैकी दोनच पदे रिक्त राहतील. (एकही शिक्षक बदलीपात्र नसेल तर कोणाचीही बदली होउ शकत नाही )* 

*४.२ टप्पा क्रमांक २ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग १ यांच्या बदल्या :* 

*४.२.१ . टप्पा क्र १ पुर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होइल. त्यानंतर संवर्ग ०१ ला ३० शाळांचे पसंतीक्रम भरण्यास चार दिवसाचा आवधी देण्यात येइल. नंतर संवर्ग ०१ च्या बदल्या होतील. (नविन बदल )* 

*४.२.२ संवर्ग ०१ च्या बदल्या विनंती अर्जावरुनच होतील. जर अर्ज केला तर बदली होइल. बदलीपात्र यादीमध्ये नाव आसेल आणि बदली नको असेल तर विवरणपत्र ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र द्यावे लागेल. (ऑनलाईन/ऑफलाइन मागतील तसे)* 

*४.२.३ : संवर्ग ०१ मधील बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा १.८.१ ते १.८.२० मध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहिल.* 

*४.२.४ : एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी बदली मागितली आसल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेवून जेस्ठ कर्मचार्यास प्राधान्य राहिल.* 

*४.२.५ : सेवाज्येष्ठता समान आसल्यास वयाने जेस्ठ आसलेल्या कर्मचाऱ्यांस प्राधान्य राहिल.* 

*४. २.६: या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार होइल. या यादीच्या आधारे शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेवुन ज्या शाळामध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध आहेत त्या शाळेत प्राधान्यनुसार शिक्षकांची बदली करण्यात येइल. जर बदलीपात्र शिक्षक उपलब्ध नसेल तर बदली होणार नाही. (बदलीपात्र शिक्षक आसलेल्या शाळाच पसंतीक्रमामध्ये नोंदवाव्यात)* 

*४.२.७ : संवर्ग ०१ मधून बदली झाल्यास पुढील ३ वर्ष बदली साठी अर्ज करता येणार नाही.* 

*४.२.८ : संवर्ग ०१ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकानी त्याबाबचे सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. यावर गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेइल. (संवर्ग ०१ चे प्रमाणपत्र तपासण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करावी लागणार आहे. ही बाब नविन आहे )* 

*४.३ टप्पा क्र . ३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांच्या बदल्या :*
*संवर्ग :- २* 

*४.३.१ : टप्पा क्रमांक २ ची कार्यवाही झाल्यानंतर म्हणजे संवर्ग ०१ च्या बदल्या झाल्यानंतर सुधारित रिक्त पदांची यादी पुण्हा जाहीर होइल. नंतर संवर्ग ०२ मध्ये बदली करु इछिनार्या शिक्षकानी बदलीसाठी पसंतीक्रम देवुन अर्ज करावयाचे आहेत. यासाठी ४ दिवसाचा आवधी देण्यात येणार आहे.* 

*४.३.२ : संवर्ग २ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकानी विवरणपत्र ४ मधील नमुन्यामध्ये दोघाच्या स्वाक्षरीचे (पती-पत्नी) स्वयंघोषित प्रमाणपत्र द्यावयाचे आहे.* 

*४.३.३ : दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आसतील तर दोघापैकी एकानेच अर्ज करावयाचा आहे.* 

*४.३.४ : दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक आसताना संवर्ग २ मधुन बदली झाल्यानंतर पुढील बदलीसाठी या शासननिर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागु होणार आहेत. पुढिल बदलीच्या वेळेस एक एकक (One Unit) मानून बदलीने नियुक्ती देण्यात येइल. दोन जागा रिक्त आसतील त्याठिकाणी किंवा ३० कि मी च्या आत दोन पदे रिक्त आसलेल्या ठीकाणी एक एकक मानून बदली केली जाईल.* 

*४.३.५: ३० कि मी रस्त्याचे अंतर हे सर्वात नजीकचे अंतर ग्राह्य धरल्या जाणार आहे. ३० कि मी रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी रहातील. (बदली अर्ज करण्याच्या आगोदर अंतराचा दाखला दाखल करावयाचा आसेल तर आतापासुनच तयारी करावी लागणार आहे)* 

*४.३.६ : संवर्ग २ मधुन बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही . ( एक एकक म्हणून गणले जाइल परंतू तीन वर्षानंतर एकाने अर्ज करावयाचा की दोघाने अर्ज करावयाचा हे नमुद केलेले नाही कारण हे दोघेही ३० किमी च्या आत आल्यानंतर दोघापैकी एकाचे सध्याच्या क्षेत्रात १० वर्ष व सध्याच्या शाळेत पाच वर्ष पुर्ण झाल्यास तो बदलीपात्र होइल आणि त्यास खो बसेल. ३० किमीच्या आत आल्यानंतर सेवानियम पुर्ण करत असलेल्या एकाला खो बसु नये म्हणुन अर्ज करेल तेंव्हा एक युनिट म्हणुन अर्ज करावयाचा की सिंगल अर्ज करावयाचा की सुट मिळावी म्हणुन नकाराचा अर्ज करावयाचा याचा कोठेही उल्लेख नाही. २७/०२/२०१७ च्या शासननिर्णयानुसार एक युनिट म्हणुन दोघानाही बदली अर्ज करावयाची सुविधा देणे गरजेचे आहे तरच एक एकक म्हणून बदली होइल )* 

*४.४ टप्पा क्रं ४ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या : ४.४.१ : संवर्ग ०३ अवघड क्षेत्रातील शिक्षक: टप्पा क्रमांक ३ च्या म्हणजे संवर्ग २ च्या बदल्या झाल्यानंतर पुण्हा उर्वरित रिक्त पदांची यादी जाहीर होइल. त्यानंतर संवर्ग ०३ ला ३० शाळांचे पसंतीक्रम देण्यासाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी ४ दिवसाचा अवधी मिळणार आहे.* 

*४.४.२ : बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदकी करावयाची निश्चित धरावयाचीए अवघड क्षेत्रातील सेवा पुर्ण झाली आएल अशा शिक्षकानी बदलीसाठी विवरणपत्र - २ मध्ये अर्ज करावयाचा आहे. ( शासननिर्णयामध्ये पान क्र ०९ वर विवरणपत्र १ मध्ये अर्ज करावा असा उल्लेख झालेला आहे. ती प्रिंट मिस्टेक झालेली आहे असे वाटते)* 

*४.४.३ : या बदल्या सेवाज्येष्ठते नुसार होतील.* 

*४.४.४ : सेवा समान आसल्यास वयाने जेष्ठ कर्मचाऱ्यास प्राधान्य असेल.* 

*४.४.५ : या शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर व समानिकरणाच्या रिक्त जागा वगळता निव्वळ रिक्त जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार होतील (येथे रिक्त जागांचा उल्लेख केलेला नाही)* 

*४.४.६ :- बदलीस पात्र नसलेल्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकानी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर त्यांची बदली होणार नाही.* 

*४.५ टप्पा क्रं ५ :- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती :* 

*संवर्ग ४ च्या बदल्या. ४.५.१. :- टप्पा क्रमांक ०१,२,३,४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपद्धतीमुळे म्हणजे समाणिकरणामुळे होणार्या व संवर्ग ०१,०२,०३ च्या बदल्यामुळे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे आसे शिक्षक व बदलीपात्र शिक्षक यांची एक नव्याने सेवाज्येष्ठता यादी, जिल्हा परिषदेतील एकून सेवा विचारात घेउन करण्यात येणार आहे. पुण्हा सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येइल व शिल्लक शिक्षकाना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसाचा अवधी देण्यात येइल. (२७/०२/२०१७ च्या शासननिर्णयामध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकाने सेवाकनिस्ठ शिक्षकांची जागा पसंतीक्रमामध्ये निवडावयाची असा उल्लेख होता परंतु येथे तसा उल्लेख नाही. यावर शुद्धिपत्रक येणे अपेक्षित आहे. कारण कोणता शिक्षक कोणत्या शिक्षकास खो देइल किंवा रिक्त जागा वगळता कोणती जागा पसंतीक्रमामध्ये नोंदवावी याबाबत स्पस्ट असा उल्लेख दिसत नाही.)* 

*४.५.२. सेवाज्येष्ठता समान आसल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली देण्यात येइल.* 

*४.५.३ यांच्या बदल्या प्राधान्यक्रमाने व व त्यांच्या पसंतीक्रमाने बदल्या करण्यात येतील . समानिकरणाच्या रिक्त जागा वगळता इतर रिक्त जागांवर बदली होणार आहे.* 

*४.५.४. या शिक्षकाने प्राधान्यक्रम न दिल्यास व बदली होत आसल्यास उपलब्ध होणार्या रिक्त पदांवर त्यांची नियुक्ती होइल. त्यामुळे प्राधान्यक्रम / पसंतीक्रम देणे योग्य राहील.* 

*४.५.४. सर्व शिक्षकाना किमान ३० अथवा टप्पा क्र. ४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.* 

*४.६. टप्पा क्र ६ :- विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा: टप्पा क्र. ५ पुर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे व टप्पा क्र. ५ मधून उरलेल्या शिक्षकाना त्यांच्या पसंतीक्रममध्ये बदल करण्यासाठी चार दिवसाचा आवधी मिळणार आहे . टप्पा क्रमांक ५ नुसार म्हणजे संवर्ग ४ च्या बदलीनुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात येणार आहे. सुधारित रिक्त जागामधुन किमान ३० अथवा टप्पा क्रमांक ५ ची बदली प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. पसंतीक्रम न दिल्यास व बदली होत आसल्यास उपलब्ध होणार्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाणार आहे. (संवर्गनिहाय टप्प्या टप्प्याने होणार्या बदल्यामध्ये प्रत्येक संवर्गाला अर्ज करण्यासाठी ४ दिवसाप्रमाणे एकूण २० दिवस जाणार आहेत.)* 

*४.७ कार्यमुक्तीचे आदेश : बदली आदेशामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद केला जाणार आहे आणि त्या दिनांकानंतर त्यांचे वेतन बदली होणार्या शाळेतुन काढले जाणार नाही. बदलीनंतर तो शिक्षक बदलीच्या ठीकाणी जर रुजु झाला नसेल तर त्यांच्यावर मा मुख्य कार्यकारी अधिकारी नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करणार आहेत.*
*२. आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडुन खालील माहिती प्रसिद्ध होइल.* 

*२.१ अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिद्ध होणार आहे. २.२ बदली संदर्भाने एक दिवसाचे प्रशिक्षण होणार आहे.( नविन बदल )* 

*२.३ शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे.* 

*१) यामध्ये मा. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र. ३२७८ / २०१० बाबत दिनांक १३/०९/२०१२ व दि २१/११/२०१२ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित आसल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करावयाच्या आहेत* 

*२) त्यानंतर जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित करण्यात येणार आहेत. ( यामध्ये निव्वळ रिक्त जागा व बदलीस पात्र आसलेल्या शिक्षकांच्या जागांचा समावेश असेल. जे शिक्षक बदलीस पात्र आहेत त्यांच्या जागा रिक्त जागा म्हणून घोषित होणार आहेत.)* 

*३) अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकाना बदली करुन घ्यावयाची आहे त्यांच्या जागा सुद्धा रिक्त जागा म्हणुन दाखवण्यात येणार आहेत. (हा नविन बदल आहे) ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकास बदली हवी आहे त्यानी आपले नाव आगोदरच द्यावयाचे आहे. आपन बदलीसाठी नाव दिल्यास आपले पद रिक्त दाखवण्यात येणार आहे.* 

*( उणीव : संवर्ग ०१/०२ मधील एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील जागा मागितली आणि त्या शिक्षकाची बदली पसंतीक्रमात दिलेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत झाली तर त्या अवघड क्षेत्रातील शाळेतील बदली इछुक शिक्षक बदली अर्ज करण्या आगोदर विस्थापित होइल. आणि बदली इछुक शिक्षकाने बदलीमध्ये पसंतीक्रम देवुन सुद्धा पसंतीक्रमातील शाळा मिळाली नाहीतर तो परत विस्थापित होइल. आणि त्याची जागा भरल्यामुळे त्याला प्रशासनामार्फत शाळा द्यावीच लागेल. इथ थोडा गोंधळ उडणार आहे. ही या बदली धोरणातील उणिव राहणार आहे. अवघड क्षेत्रातील शिक्षकाने दिलेल्या पसंतीक्रमामधील शाळा मिळेलच असे काही नाही आणि तो बदली इछुक आसल्यामुळे त्याची जागा रिक्त दाखवल्यामुळे तो बदलीच्या आगोदरच विस्थापित होइल हा शिक्षक विस्थापित झाल्यानंतर या विस्थापित शिक्षकास पदस्थापना कशी द्यायची याचा उलगडा कोठेही नाही. कारण हा शिक्षक बदलीच्या आगोदरच विस्थापित होणार आहे त्यामुळे बदली इछुक यादीमध्ये नाव द्यावे की नाही याच विचारात तो राहु शकतो.)* 

*२.३.२ समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या रिक्त पदांची यादी.नविन भरती किंवा खाजगी शाळेतील शिक्षकांच्या समायोजनाच्या वेळी ही समानीकरनात ठेवलेली रिक्त पदे ओपन होतील. (समानिकरणाची रिक्त पदे म्हणजे बदलीच्या आगोदरच रिक्त ठेवण्यासाठी घोषित केलेली पदे. ही पदे बदलीने भरता येणार नाहीत)* 

*२.३.३ शाळानिहाय रिक्त पदे जाहीर होतील.* 

*२.३.४ बदल्या करताना समाणिकरणाच्या रिक्त पदावर बदलीने नियुक्ती मिळणार नाही. म्हणजे ही पदे बदलीत कायम रिक्त राहतील. ही रिक्त पदे पसंतीक्रमामध्ये मागता येणार नाहीत.* 

*२.४ शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे* 

*२.४.१ मा. शिक्षणाधिकारी, सर्वसाधारण व अवघड क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील.* 

*२.४.२ विशेष संवर्ग भाग ०१ व भाग ०२ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील. (हा नविन बदल आहे )* 

*२.४.३ आक्षेप : वरील दोन्ही याद्यामध्ये शिक्षकाचा काही अक्षेप असेल तर याद्या प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसाच्या आत शिक्षणाधिकारी यांच्याकडे याद्यामधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षक अर्ज करु शकतील. या अर्जावर पुढील सात दिवसात निर्णय घेतील . या निर्णयावर शिक्षक समाधानी नसेल तर निर्णय मिळालेल्या दिवसापासुन पाच दिवसामध्ये तो शिक्षक मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करु शकेल. मा मुख्यकार्यकारी अधिकारी पुढील सात दिवसामध्ये निर्णय घेतील. आणि हा निर्णय अंतिम राहिल (ही अपिलीय बाब नविन आहे. यात २४ दिवस जाणार आहेत.)*
*जिल्हांतर्गत बदली धोरण २०२१* 
             *या नविन शासननिर्णयामुळे शासननिर्णय २७/०२/२०१७ च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले सर्व शासननिर्णय व शुद्धीपत्रके, परिपत्रके अधिक्रमित करुन दिनांक ०७/०४/२०२१ रोजी जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी जिल्हांतर्गत बदल्यांचे सुधारित धोरण खालीलप्रमाणे निश्चित केलेले आहे . या शासनिर्णयामध्ये आगोदरच्या शासननिर्णयातील काही बाबी जशाच्या तशा ठेवल्या आहेत आणि काही बाबी नविन समाविष्ट केलेल्या आहेत.* 

*१.१- अवघड क्षेत्र पान क्रमांक १६ वरील परिशिष्ट १ मध्ये जे ७ निकष दिलेले आहेत त्यापैकी ३ निकष पुर्ण करणारे गाव / शाळा अवघड क्षेत्र म्हणुन घोषित केली जाणार आहे. (नविन बदल )* 

*१.२ सर्वसाधारण क्षेत्र - वरील अवघड क्षेत्रातील गावे वगळता बाकी सर्व गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडणार आहेत.* 

*१.३ बदलीसाठी ३१ मे ही तारीख अंतिम आहे.* 

*१.४- दोन्ही क्षेत्रासाठी ३१ मे पर्यंतची एकूण सलग सेवा अंतिम आहे.* 

*१.५ प्राथमिक शिक्षक, प्रा पदविधर, व अपग्रेड मुख्याध्यापक हे शिक्षक म्हणुन निश्चित केलेले आहेत.* 

*१. ६ मा मुख्यकार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत.* 

*१.७ - बदली अधिकारप्राप्त शिक्षक ज्या शिक्षकांची ३१ मे या तारखेस धरुन अवघड क्षेत्रातील सलग सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे असे शिक्षक. नव्याने घोषित होणार्या अवघड क्षेत्रातील शाळेत तो शिक्षक सध्या कार्यरत आसला पाहिजे व त्यास ३१ मे ला ३ वर्ष पुर्ण झाले पाहिजेत. (महिलांसाठी दुर्गम घोषित केलेल्या शाळेत ज्या महिला शिक्षिका सध्या कार्यरत आहेत त्याना अगोदरच्या शासननिर्णयानुसार एक वर्षानंतर बदली मागण्याचा अधिकार होता तो आता संपुष्टात आलेला आहे. अनफिट फॉर लेडीज हा मुद्दा वगळला आहे)* 

*१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग १: पान क्रमांक ०३ व ४ वर दिलेल्या १.८.१ ते १.८.२० मध्ये नोंदवलेल्या संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग ०१ मध्ये गणले जातील. (नमुद केलेले संवर्गाचे आजार व इतर बाबी वाचुन घ्याव्यात.) हा झाला संवर्ग १ . संवर्ग ०१ च्या बदल्या करताना १.८.१ ते १.८.२० या संवर्ग क्रमांकानुसारच सेवाज्येष्ठतेने बदल्या होतील.* 

*१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ :- संवर्ग ०२ पती-पत्नी एकत्रीकरण. येथे ३० किमी अंतराची अट लावली आहे. (आता जोडीदाराच्या सेवाज्येष्ठतेचा काहीही संबंध नाही.) अंतराची व १.९.१ ते १.९.६ ची पुर्तता करणारे शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतील . ( जुन्यातुन नव्याचा अंगिकार )* 

*१.१० बदलीस पात्र शिक्षक :- बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्ष पुर्ण झालेली आहे आणि सध्याच्या शाळेत ५ वर्ष पुर्ण झालेली आहे असे शिक्षक म्हणजे बदलीस पात्र शिक्षक. (आगोदर सध्याच्या शाळेत ३ वर्षाची अट होती आता ५ वर्षाची अट आली हा नविन बदल). यामध्ये एक खास बाब आहे की, घोषित केलेल्या अवघड क्षेत्रामध्ये जागा रिक्त राहत आसतील तर ज्या शिक्षकाना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये १० वर्ष पुर्ण झालेले आहेत परंतु सध्याच्या शाळेत ५ वर्ष पुर्ण झाले नसले तरीही अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रामध्ये १० वर्ष पुर्ण झालेल्या बदलीस पात्र शिक्षकाची आवश्यकतेनुसार बदली होणार आहे . ( येथे सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग १० वर्षे पूर्ण करणारे व वास्तव्य सेवाज्येष्ठता ज्यांची जास्त आहे त्यांची आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येणार आहे. ही बाब आगोदरच्या शासननिर्णयामध्ये नव्हती ही बाब नविन आहे. आपणास बदली नको आसली तरी अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी आपली बदली होवु शकते.)
**५. इतर धोरणात्मक बाबी :* 

*५.१ बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.* 

*५.१.१. राज्यस्तरावर एक नोडल ऑफीसरची नेमणूक होणार आहे.* 

*५.१.२ तांत्रीक बाबीसाठी एक कार्यक्रम अधिकारी यांची नेमणुक होणार आहे. जिल्हास्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यांची यांची जबाबदारी आहे.* 

*५.२ मुख्य कार्यकारी अधिकारी याना प्रत्येक शिक्षकाचा पसंतीक्रम दिसेल व बदल्या झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी याना संगणकीय यंत्रणेने बदलीच्या पुर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.* 

*५.३ ही बाब प्रशासकीय असुन शिक्षकाने कोणताही राजकीय दबाव आणु नये असे आढळल्यास जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ६(५) चा भंग केला म्हणून ती कृती शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र राहणार आहे.* 

*५.४ विनंती बदलीसाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण राहणार नाही.* 

*५. ५ बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मुळ ठिकाणी अथवा इतरत्र तात्पुरती प्रतिनियुक्ती देवू नये. असे केल्यास अवैधता / अनियमितता समजुन संबंधित अधिकारी शिस्तभंग कारवाईस पात्र होतील.* 

*५.६. १ मे ते ३१ मे दरम्यान वर्षातून एकदाच बदल्या होतील.* 

*५.७. जिल्हांतर्गत बदली संबंधाने शिक्षकाने दावा केला आसल्यास अशा प्रकरणात मा उच्च न्यायालय वा सक्षम न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमलबजावणी या बदलीच्या आगोदर होणार आहे त्यानंतर या बदल्या होणार आहेत. (मागील बदलीतील एखादा शिक्षक मा न्यायालयामध्ये गेला होता आणि त्याला बदली मिळण्याचा न्याय मिळाला आसेल तर असे प्रकरण या बदलीप्रकरणी आदेशाची अमलबजावणी या बदली प्रक्रियेच्या आगोदर करावयाची आहे व त्यानंतर ही बदलीप्रक्रिया करावयाची आहे. अशी बाब असेल तर संबंधित शिक्षकाने जिल्हास्तरावर निदर्शनास आणून द्यायला पाहिजे)* 

*५.८ आरटीई ॲक्टनुसार १०% पेक्षा जास्त जागा रिक्त ठेवता येणार नाहीत. समाणिकरणाच्या रिक्त जागा ठेवण्यासाठी समिती गठीत होणार आहे. समाणिकरणामध्ये रिक्त ठेवावयाच्या जागांचा निर्णय समिती घेणार आहे. समिती अध्यक्ष मा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) व शिक्षणाधिकारी (प्रा) हे असतील.* 

*५.९ जिल्हांतर्गत बदल्या ह्या ०१ मे ते ३१ मे या दरम्यान करण्याचे सुचित केले आहे. परंतु त्या व्यतिरिक्त काही अपरिहार्य व योग्य कारणास्तव ( प्रसुतेर रजेवर, बालसंगोपन रजेवर, गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी ) बदली करावयाची आसल्यास बदली न करता प्रतिनियुक्तेर करण्यात येणार आहे. सदर प्रतिनियुक्तीए ही मा विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात येणार आहे.* 

*प्रतिनियुक्ती करताना खालील बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.* 
*१) बदली प्रक्रिया पुर्ण झाल्यावर होणार्या रिक्त पदावर
प्रतिनियुक्ती करण्यात येइल.* 
*२) मुळ शाळेमध्ये शैक्षणिक अडचण निर्माण होणार नाही याची मा शिक्षणाधिकारी खात्री करतील.*
* ३) एक महिन्यात प्रतिनियुक्ती मागणी करणार्या शिक्षकांचे अर्ज मागवून शिक्षणाधिकारी (प्रा) यानी यादी तयार करावी.*
*४) कोणकोणते शिक्षक प्रतिनियुक्तीस पात्र आहेत हे ठरविण्याबाबत जिल्हास्तरावर खालीलप्रमाणे सामिती नियुक्त करण्यात येणार आहे.*
* १) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन ) जि प हे अध्यक्ष असतील* 

*२) शिक्षणाधिकारी (मा) जि प सदस्य आसतील ३) शिक्षणाधिकारी (प्रा) जि प हे सदस्य असतील.* 

*५) समितीने पात्र ठरविलेल्या शिक्षकामधून प्रस्ताव सेवाज्येष्ठतेने एका जागेसाठी तीन शिक्षकांचे प्रस्ताव मा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मा विभागीय आयुक्त याना सादर करतील. मा विभागीय आयुक्त एकास तीन मधील प्रस्तावातून एका जागेस एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करतील.* 

*६) ही प्रतिनियुक्ती पाच वर्षातुन एकदाच असेल.* 

*७) प्रतिनियुक्ती मिळालेले शिक्षक पुढील वर्षीच्या बदलीस
पात्र असतील.* 

*८) प्रतिनियुक्तीनंतर त्यांची सेवा ही मुळ शाळेवरील धरण्यात येइल.* 

*५.१०. बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार :* 

*५.१०.१ संगणकीय प्रणालीद्वारे झालेल्या बदलीमध्ये आपल्यावर अन्याय झाला आहे आसे वाटल्यास आणि ७ दिवसाच्या आत जिल्हास्तरावर तक्रार केल्यास मा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या • स्तरावर गठीत झालेली समिती आपल्या तक्रारीवर ३० दिवसामध्ये निर्णय देणार आहे. गैरसोयीची बदली म्हणजे बदलीतील अनियमितता नव्हे हे लक्षात घेण्यास सांगितले आहे. अनिवार्य रिक्त ठेवलेल्या पदावर समुपदेशनाने बदली करता येणार नाही.* 

*५.१०.२ मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या निर्णयावर आपण समाधानी नसाल तर आपणास निर्णय मिळालेल्या दिनांकापासून ७ दिवसाच्या आत मा विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार /अपील करता येणार आहे. आपणास आपल्या अपील वजा तक्रारीवर आपण तक्रार दाखल केलेल्या दिवसापासुन ३० दिवसाच्या आत निर्णय मिळणार आहे. आणि हा निर्णय अंतिम राहणार आहे.* 

*५.१०.३ आपण अपिल केलेले आसले तरी आपणास शाळेत उपस्थित राहून आपणास आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. आपले अपिलिय अधिकार अबाधित राहणार आहेत. कर्तव्य बजावणे बंधनकारक राहणार आहे.* 

*५.१०.४ विशेष संवर्ग ०१ व ०२ चा लाभ घेतलेल्या शिक्षकाविरोधामध्ये तक्रार प्राप्त झाल्यास त्या त्या संवर्गनिहाय कागदपत्रांची पडताळणी होणार आहे आणि आपले म्हणने मांडण्यास ७ दिवसाचा आवधी मिळणार आहे.* 

*५.१०.५ : अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरुन बदली करुन घेतलेली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन होणार आहे. आणि त्याच्या विरूध्द शिस्तभंगाची कारवाई मा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्तावित करणार आहेत. ( निलंबन ही बाब नविन आहे )*
*३. शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे.* 

*३.१ बदलीस पात्र शिक्षकांकडून बदलीने नियुक्ती मिळवण्यासाठी जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम घ्यावा लागेल. (आगोदर २० पसंतीक्रम होते आता ३० झाले आहेत )* 

*३.२ बदली अधिकारप्राप्त शिक्षकाना बदली हवी असेल तर ३० शाळांचा पसंतीक्रम द्यावा. पान क्रमांक १९ विवरणपत्र - २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ३० शाळांचा पसंतीक्रम देवुन अर्ज करावा लागेल.* 

*३.२.१ संवर्ग १ मधील शिक्षकाना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीमध्ये नाव आसताना बदली नको असल्यास त्यानी पान क्रमांक २१ वरील विवरणपत्र ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करावा. (बदली हवी असेल तर ३० शाळांचा पसंतीक्रम द्यावा. बदलीस पात्र आसताना बदली नको आसल्यास विवरणपत्र ३ मध्ये मुद्दा क्रमांक ८ च्या समोरील चौकोनामध्ये राईट चे चिन्ह लिहून विवरणपत्र द्यावे.* 

*३.२.२ विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकाना बदली हवी असल्यास, किंवा बदलीस पात्र यादीमध्ये नाव असल्यास, त्यानी पान क्रमांक २३ वरील विवरणपत्र - ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करावा लागेल. संवर्ग २ मधील शिक्षकानी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासूनच्या ३० कि.मी. अंतरातील अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागेल. ('त्या तालुक्यात ' ही बाब यामध्ये नविन आहे.)* 

*३.३ बदलीस पात्र शिक्षकानी पान क्रमांक १७ वरील विवरणपत्र - १ मध्ये नमुद केल्याप्रमाणे ३० पसंतीक्रमाचा अर्ज करावा लागेल. जर पसंतीक्रमाचा अर्ज केला नाही तर उपलब्ध आसलेल्या कोणत्याही रिक्त पदी आपली बदली होइल.*



✳️ *शिक्षक बदल्या 2022|VC 7.03.2022 मधील महत्त्वाचे अपडेट* 


✳️ *संदर्भाधीन शासन निर्णय, शासनपत्रामध्ये दिलेल्या निर्देशानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत तसेच सदर बदलीच्या अनुषंगाने येणार्या अन्य समस्यांबाबत अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली  दिनांक 17.3.2022 रोजी दुपाटी 4.00 वा. V.C.  आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती.*

✳️ *सदर  बैठकीमध्ये Teacher transfer portal ची चाचणी घेण्यात आली*
*याच portal च्या माध्यमातून शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत*

✳️ *Teacher transfer portal वर शिक्षकांची माहिती खालील प्रमाणे अपडेट केली जाईल*
➡️ *Teacher transfer portal वर  phase 1 मध्ये teacher data updation यामध्ये सर्व शिक्षकांना स्वतःची वैयक्तिक माहिती मोबाईल नंबर व ओटीपी च्या माध्यमातून login करून भरावयाची आहे*
➡️ *यामधील employee details मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरलेली असेल त्यामध्ये शिक्षक कोणतेही बदल करू शकणार नाहीत*
➡️ *परंतु  employment details यामध्ये आपण आपली कार्यरत शाळेतील तपशील, एकूण सेवेचा तपशील ,तसेच इतर सेवा संबंधी माहिती बदलू शकतो किंवा नवीन add करू शकतो*
➡️ *संपूर्ण माहिती तपासून submit केल्यानंतर ही माहिती मान्यते करीता गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविली जाईल* 
➡️ *गटशिक्षणाधिकारी हे संबंधित शिक्षकांची माहिती transfer portal वर लॉगिन करून पाहू शकतात अथवा काही चुकीची माहिती असल्यास दुरुस्त करू शकतात* 
➡️ *संबंधित शिक्षकांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी verify केल्यानंतर ही माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवली जाईल* 
➡️ *संबंधित माहिती शिक्षक transfer portal वर login करून पाहू शकतात*
➡️ *गटशिक्षणाधिकारी यांनी दुरुस्त केलेली माहिती शिक्षकास मान्य नसल्यास  त्या संदर्भात शिक्षक  शिक्षणाधिकारी यांच्याकडे portal वर online  अपील करू शकतात* 
➡️ *यामध्ये  शिक्षणाधिकारी transfer portal वर login करून जिल्ह्यातील संपूर्ण  शिक्षकाची माहिती व अपील पाहू शकतात शिक्षणाधिकारी सदर माहितीची शहानिशा करून बरोबर असल्यास submit करतील अथवा नव्याने बदल करायचा असल्यास बदल करून submit करतील* 
➡️ *अशाप्रकारे शिक्षणाधिकारी यांनी बदल केलेले शिक्षकांचे profile शिक्षक पुन्हा बदलू शकणार नाहीत* 
*ती माहिती  शिक्षकांना read only mode वर दिसेल*
➡️ *शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे update केलेले profile शिक्षक लॉगिन करून पाहू शकतात*
➡️ *संबंधित अपडेट केलेले प्रोफाइल  व माहिती शिक्षकांनी वाचावी व except करावी अशाप्रकारे शिक्षकांची except केलेली माहिती Teacher transfer portal वर अपडेट केली जाईल*
➡️ *Teacher transfer portal वर अपडेट केलेल्या माहितीच्या आधारे बदली प्रक्रिया राबवली जाईल*

✳️ *बदली प्रक्रिया राबविण्याकरिता VC च्या माध्यमातून खालील सूचना देण्यात आल्या*
✳️ *सन 2022 मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.*
✳️ *शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून शिक्षकांचा डाटा प्राप्त झाला असून शालार्थ तसेच सेवार्थ प्रणालीतील डाटा अद्ययावत नाही. सदरचा डाटा अद्ययावत करणे,* 
➡️ *1) UDSIE अपडेट व दुरुस्ती करणे. अंतिम मुदत 25 मार्च* 
➡️ *2) शाळा नोंदणी व दुरुस्ती. अंतिम मुदत 25 मार्च* 
➡️ *3) शिक्षक डाटा चेक करणे अंतिम मुदत 25 मार्च* 
➡️ *4) अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे. अंतिम मुदत एप्रिल 2022*
➡️ *5) user testing अंतिम मुदत 1 एप्रिल* 
➡️ *6) समानीकरण धोरण जाहीर करणे अंतिम मुदत 25 एप्रिल*
➡️ *7) टोस्टर अपडेट करणे. अंतिम मुदत 15 एप्रिल* 
➡️ *8) आंतरजिल्हा बदली आदेश - बदली होईपर्यंत / सेवानिवृत्त होईपर्यंत वैध राहील.*
➡️ *9) आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्ती साठी 10% ची अट राहील.*

*धन्यवाद*🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.