blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

महानता. ....

 एक प्रेरणादायक कहाणी 📖


🧑🏻‍🏫 *शिक्षकाचा. .   .   ..... पगार. 


पिकासो (Picasso) हा स्पेन या देशात जन्मलेला एक अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. त्यांनी काढलेली पेंटिंग्स अख्ख्या जगात कोट्यावधि आणि अब्जावधि रुपयांना विकल्या जात असत!


एक दिवस रस्त्यानं जात असता एका महिलेची नजर पिकासोकडे गेली आणि योगायोगानं त्या महिलेनं त्याला ओळखलं. ती धांवतच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, "सर, मी आपली खूप चाहाती आहे. आपली पेंटिंग्ज मला प्रचंड आवडतात. आपण माझ्यासाठीही एक पेंटिंग तयार करून देऊ शकाल काय ?


पिकासो हसत म्हणाला, "मी इथं रिकाम्या हातानं आलोय. माझ्यापाशी कांहीही साधनं नाहीत, मी पुन्हा कधीतरी तुमच्यासाठी एक पेंटिंग नक्की बनवून देईन." 

परंतु त्या महिलेनं आता हट्टच धरला. ती म्हणाली, "मला आत्ताच एक पेंटिंग बनवून द्या. पुन्हा कधी आपली भेट होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही."


पिकासोनं मग आपल्या खिशातून एक छोटासा कागद काढला आणि आपल्या पेननं तो त्या कागदावर काहीतरी चित्र काढू लागला. जवळपास दहा मिनिटांमध्ये पिकासोनं त्या कागदावर एक पेंटिंग काढलं आणि तो कागद त्या महिलेला देत तो म्हणाला, "हे घ्या पेंटिंग. तुम्हाला याचे एक मिलियन डॉलर्स सहज मिळतील."


महिलेला मोठं आश्चर्य वाटलं. ती मनात म्हणाली, 'ह्या पिकासोनं केवळ 10 मिनिटांत घाईघाईनं हे एक काम चलाऊ पेंटिंग तयार केलंय आणि मला म्हणतोय की हे मिलियन डॉलर्सचं पेंटिग आहे.' मात्र उघडपणे काही न बोलता तीनं ते पेंटिंग उचललं आणि ती मुकाटपणे आपल्या घरी आली. तिला वाटलं पिकासो आपल्याला मूर्ख बनवत आहे. ती बाजारात गेली आणि पिकासोनं आपल्यासाठी बनवलेल्या पेंटिंगची किती किंमत मिळू शकेल याची तीनं तिथं चौकशी केली. या चित्राची  किंमत सुमारे दहा लाख डॉलर्सपर्यंत मिळू शकेल असं तिला जेव्हा कळलं तेव्हा तिच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. 


ती धावत धावतच पुन्हा एकदा पिकासोकडे गेली आणि त्याला म्हणाली, "सर आपण एकदम योग्य सांगितलं होतं. या चित्रांची किंमत खरोखरच सुमारे दहा लाख डॉलर्स आहे."


पिकासो हसून म्हणाला, " मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं."


ती महिला म्हणाली, "सर, आपण मला आपली शिष्या करवून घ्याल कां? मलाही पेंटिंग कसं बनवायचं ते आपण शिकवा. म्हणजे जसे तुम्ही दहा मिनिटांमध्ये दहा लाख डॉलर्सचं पेंटिंग बनवलं, तसंच मी अगदी  १० मिनटांत जरी नाही तरी १० तासांत का होईना चांगलं पेंटिंग बनवू शकेन अशी आपण माझी तयारी करून द्या." 


पिकासो हसतच म्हणाला, "हे जे पेंटिंग मी १० मिनटांत बनवलं आहे ते शिकण्यासाठी मला तीस वर्ष लागलेली आहेत. मी आपल्या जीवनाची तीस बहुमूल्य वर्षे यासाठी खर्ची घातली आहेत. तुम्हीही इतकीच वर्षे शिकण्यासाठी द्याल तर तुम्हीही माझ्यासारखीच चित्रे काढं शकाल." 


ती महिला अवाक् आणि निःशब्द झाली. ती पिकासोकडे नुसती पाहातच राहिली. 


*एक शिक्षकाला 35 मिनटांच्या एका लेक्चरसाठी जो पगार दिल्या जातो तोच उपरोक्त कथेबद्दल बरंच कांही सांगून जातो.* एका शिक्षकाला एका  वाक्यामागे 

त्याची कित्येक. वर्षांची मेहनत असते.


समाजाला वाटतं की शिक्षकाला  केवळ बोलायचंच तर असतं. त्याचाच पगार घेतात हे इतकाल्ले. इथं हे विसरून चालणार नाही की आज जगात सन्मान्य पदांवर जितके म्हणून लोक आरूढ आहेत त्यांच्यापैकी अधिकांश कुठल्या ना कुठल्या अध्यापकामुळेच त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत.


जर आपणही अध्यापकाच्या वेतनाला फुकटचं समजत असाल तर मग एक वेळ 35 मिनटांचं प्रभावी तसंच अर्थपूर्ण लेक्चर देऊन दाखवा. आपल्याला आपली क्षमता किती आहे याची लगेच जाणीव होऊन जाईल!


*सर्व शिक्षकांना समर्पित!*


सदैव प्रसन्न रहा. जे प्राप्त झालंय, तेवढं पुरेसं आहे.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.