सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि. ०१.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२५ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
२/- सन २०२४-२५ (टप्पा-२) मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.२९.०७.२०२४ ते दि. १५.०९.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ९७,६२८ शाळांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले.
सन २०२५-२६ मध्ये देखील 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३" या अभियानाचा कालावधी दि. ०३ नोव्हेंबर २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२५ यादरम्यान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर अभियान राबविण्याबाबत सूचना संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.
४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र, तालुका, जिल्हा, मनपा, विभाग, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दि. १६/१०/२०२५ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.
५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याहो स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल. त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही
खालील लिंक वर जाऊन माहिती भरा
https://education.maharashtra.gov.in/schoolMMSSS/users/login/4

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in