मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

घराचे वास्तुशात्र

 *घराचे वास्तुशात्र*


     जिथे आपण सर्वजण *एकत्र राहतो,* एकमेकांना *आधार* देतो, *सुखदुःखे* वाटून घेतो. *ती वास्तू* फक्त आनंदी नसावी तर *समाधानी* असावी. आनंद हा *भौतिक पातळीवर* असतो आणि समाधान *आत्मिक पातळीवर* असते.     

  साखर, लिंबू, मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून* घ्यावे लागते तर *मीठ व साखरेला* पाण्यात *विरघळून* एकजीव व्हावे लागते. 

गोपुरम मीनाक्षी मंदिर (मदुराई) ताजमहल - आग्रा अजिंठा लेणी - अजिंठा (औरंगाबाद) दिलवाडा जैन मंदिरे - माऊंट आबू जंतरमंतर - दिल्ली

☝️ *​म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.* कारण *गृहमंदिरात* जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर *चवदार सरबत* नाही तर *मधुर-अमृत* तयार होईल.

आपले *आईबाबा* एकमेकांशी किती प्रेमाने *वागताहेत* हे बघून मुलांच्या *मनावर आणि शरीरावर* अत्यंत *शुभ परिणाम* होतो.अन्यथ: ती मनातल्या मनात *कुढत* राहतात.

मुले ही *अनुकरणप्रिय* असतात. आईचा *कडवट चेहरा,* वडिलांचा *आरडा-ओरडा* घराचा अक्षरशः उकिरडा करतो. आणि मग *वास्तुतज्ज्ञ* या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त *अतार्किक, अशास्त्रीय* आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो. आणि आपण *निर्बुद्ध मंडळी* त्यावर हजारो रुपये खर्च करुन *पस्तावतो.*

 अरे, *बाबांनो* कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर *पैसे घेऊन* तुमच्या घरात *"शांती"* आणणे  शक्य आहे का.?!!!  

××××

*तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.* 

ज्येष्ठ नागरिकांनी *प्रकृती साथ* देत असेल तर, *अर्थार्जन* करून मुलांना हातभार लावावा. 

*​रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.​* काहीही कारण नसताना सारखे *लोळत पडलेली* माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.

   🏌️‍♂️मुलांनीही *जन्मभर कष्ट* केलेल्या *आई-वडिलांशी* खूप *नम्रतेने* वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. *सून* म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला *खूप प्रेम आणि आधार* द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली *आधुनिक मुलगी* आहे. आपणच *जनरेशन गॅप* कमी करावा. अर्थात *सुनेने सुद्धा* सासरी साऱ्यांना असा *लळा* लावावा, की सून माहेरी गेली की *सुनं-सुनं* वाटलं पाहिजे.

घरात मेणबत्या *फुंकून* आणि *डोक्यावर कचरा* पाडून घेऊन वाढदिवसाचा *धांगडधिंगा* करण्यापेक्षा मुलाचे *निरांजन* ओवाळून *औक्षण* करावे. भोजनाचे वेळी *आनंदी वातावरण* ठेवावे. *पत्नी जेवली का* विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप *संयमाने* बोलावे.एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एकजण *चिडला* तर दुसऱ्याने *शांत* बसावे.  

गोपुरम मीनाक्षी मंदिर (मदुराई) ताजमहल - आग्रा अजिंठा लेणी - अजिंठा (औरंगाबाद) दिलवाडा जैन मंदिरे - माऊंट आबू जंतरमंतर - दिल्ली

🤓पहा ना,गवत नसलेल्या जागी *पडलेला अग्नी* जसा *आपोआप शांत* होतो, तसे *सारे शांत* होईल. चालतानाही *घरात पाय आपटू नयेत.* शांतपणे वस्तू हाताळाव्यात.उगीचच *भांड्यांची* आदळ-आपट करु नये. *​पुरुषांनीही* घरात *नीटनेटके* रहावे. सतत फक्त *बायकांनीच* सदाफुलीसारखे *टवटवीत* राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.​

*⚘अशी राहते समाधानी वास्तु!*⚘

म्हणून म्हणतो, *तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ* आणि करा आपली *वास्तुदेवता प्रसन्न.* !! 


👇🏻घरातील प्रत्येकाच्या *मोबाईलमध्ये* हा मॅसेज गेला, तर प्रत्येक घर *सुखी व समाधानी* होऊ शकेल.    

धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.