मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

मत्ता व दायित्व विवरण प्रपत्रे

 *१)मत्ता व दायित्व विवरण पत्र प्रपत्र-१*

*अचल मालमत्तेचे विवरण*


(यामध्ये फक्त आपल्या रेशनकार्डमध्ये नावे असणाऱ्या आई-वडिल,स्वतः व पत्नीच्या नावाने घर,जमिन,सदनिका,जागा,व्यापारी गाळे इ.ची खरी व वस्तुनिष्ठ माहिती भरावी..कारण पुढील विवरण पत्रात संपत्ती मध्ये अचानक वाढ दिसुन आल्यास आपण अडचणीत येऊ नये यासाठी काळजी घ्यावी.आपल्या आई वडिलांचे वेगळे रेशनकार्ड असेल तर त्यांची मालमत्ता लिहु नये..फक्त पती पत्नी च्या नावावरीलच मालमत्ता लिहावी)


1)अनुक्रमांक लिहावा.

2)ज्या गावात/शहरात मालमत्ता आहे तो पत्ता,तालुका,जिल्हा सह)

3)क्षेत्रफळ -मालमत्ता तपशील जमिन एकर,जागा व घर स्क्वेअर फुट /मीटर मध्ये लिहावे

4)मालमत्ता खरेदीची असल्यास शासकीय  स्टँप ड्युटी नुसार खरेदीची किंमत लिहावी..बागायती जमिन किमान ५ लाख रुपये एकर व बांधकाम असल्यास किमान १००० रुपये प्रति स्क्वेअर फुट प्रमाणे रक्कम लिहावी..वडिलार्जित असल्यास नावावर कधी झाली ते वर्ष लिहावे.

5)मालमत्तेची वरील दराप्रमाणे रक्कम लिहावी.

6)मालमत्ता धारक व्यक्तीशी नाते लिहावे..जसे स्वतः ,पत्नी,पती,आई,वडिल

7)मालमत्ता कशी मिळाली ते नमुद करावे.

8)मालमत्ते पासुनचे उत्पन्न योग्य दाखवावे..सदर रक्कम करपात्र ठरु शकते त्यामुळे योग्य तेच उत्पन्न दाखवा..

9)शेरा-आणखी काही तपशील असेल तरच लिहावा...


*👉प्रपत्र २-चल मालमत्तेचे विवरण*

(यामध्ये रोख व बँकेतील पोस्टातील रक्कम ,विमा पाॕलिसीमध्ये आजपर्यंत भरलेली रक्कम ,शिक्षक सोसायटीतील शेअर्स व ठेवी,सोने ,चांदी,हिरे,धातु,रत्न,चारचाकी गाडी,दुचाकी,टी.व्ही,फ्रीज,AC,)

1)अ.क्रमांक 

2)वर नमुद केलेल्या मालमत्तेविषयी तपशील उदा..

रोख रक्कम

बँकेतील शिल्लक रक्कम

फंड शिल्लक 

शिक्षक सोसायटी भाग-

ठेव-

LIC गुंतवणूक इ.

सोने

चांदी

चारचाकी गाडी

दोनचाकी गाडी


3)गुंतवणूक केलेल्या मालमत्ता तपशील व संस्था,बँक,पोस्ट इ.चा पत्ता 

4)मालमत्तेची सध्याच्या दरानुसार किंमत लाखात लिहावी.

5)मालमत्ता घरातील कोणाच्या नावावर आहे ते नाते लिहावे.

(सदरची गुंतवणूक किमान ५० हजाराच्या वरील असेल तरच लिहावी)*👉३)प्रपत्र३-दायित्वाचे विवरण*(यामध्ये सोसायटी ,बँक,घराचे,गाडीचे कर्ज तपशील लिहावा.)


1)अ.क्रमांक 

2)रक्कम -कर्जाची रक्कम लिहावी..लाखात

3)धनकोचे नाव व पत्ता..उदा.प्राथमिक शिक्षक पतसंस्था  सातारा बँक आँफ महाराष्ट्र इ.

4)दायित्व पत्करल्याचा दिनांक म्हणजे कर्ज घेतल्याची तारीख (महिना,वर्ष लिहिले तरी चालेल)

5)व्यवहाराचा तपशील..उदा..घर बांधकाम कर्ज

पतसंस्था कर्ज

गाडी खरेदी कर्ज

6)शेरा- 

विवरण प्रपत्र download kara 

https://drive.google.com/file/d/1xJtuewCVivF5J-T1O75Xtlt5eQhariaK/view?usp=drivesdkकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.