मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG
चालू घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चालू घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

प्रवीण परदेशी... मुख्य आर्थिक सल्लागार

 निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉन्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदाच्या धर्तीवर ही नियुक्ती करण्यात आली असून या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. शनिवारी रात्री शासकीय सुट्टीच्या दिवशी परदेशी यांच्या नियुक्तीचा शासनादेश जारी झाला. विशेष म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्तीनंतरही त्यांची मित्रा या संस्थेच्या

मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरील नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. मित्रा या संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा मुख्यमंत्र्यांचा मुख्य आर्थिक सल्लागार असेल, असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताचे 52 वे सरन्यायाधीश ..

 रिपाइंचे ज्येष्ठ नेते, केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांचे ज्येष्ठ सुपुत्र भूषण गवई, हे येत्या १४ मे रोजी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.

 (Next CJI of Supreme Court)


गवई यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. 

ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहायक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

अभिनेते विलास उजवणे यांचे निधन..

 

मालिका, सिनेमा आणि हिंदी मनोरंजनविश्वातही झळकलेले हरहुन्नरी अभिनेते डॉ विलास उजवणे (Dr Vilas Ujawane) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता. त्यावर त्यांनी मात केली होती. मात्र नंतर हृदयासंबंधी विकार झाल्याने पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे.


अभिनेते विलास उजवणे यांना २०२२ साली ब्रेन स्ट्रोक आजाराने ग्रासले होते. त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारासाठी लागणारा खर्च वाढतच गेला आणि त्यांची जमापुंजीही संपली. त्यांचा मित्र राजू कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट करत इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांना, संस्थांना आणि चाहत्यांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. यानंतर ते आजारातून बरेही झाले. त्यांनी पुन्हा कमबॅकही केलं होतं. 'कुलस्वामिनी' मराठी सिनेमात त्यांनी काम केलं. '२६ नोव्हेंबर' या मराठी सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे जो पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. त्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.


डॉ विलास उजवणे यांच्याबद्दल


विलास उजवणे यांचा जन्म नागपूरमध्ये झाला. नागपूर विद्यापिठातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. पदवी मिळवली. मात्र त्यांना अभिनयाची आवड होती. नंतर मुंबईत येऊन त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. 'शुभम भवतू' या डायलॉगमुळे डॉ विलास उजवणे घरोघरी लोकप्रिय झाले होते. 'चाल दिवस सासूचे', 'वादळवाट', 'दामिनी' यासह अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी सहजसुंदर अभिनय केला. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काही भूमिका साकारल्या. ११० सिनेमे, १४० मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. असा त्यांचा कलाविश्वातला प्रवास राहिला आहे.


अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन

 

अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि 'भारत कुमार' या नावाने विशेष ओळख मिळाली होती.

२४ जुलै १९३७ रोजी मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. त्यांचं खरं नावं हरिकृष्ण गिरी गोस्वामी असून ते सर्व कलाकारांसाठी प्रेरणास्थान होते. मनोज कुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर "शहीद" (1965), "उपकार" (1967), "पूरब और पश्चिम" (1970) आणि "रोटी कपडा और मकान" (1974) अशा अनेक देशभक्तीपर चित्रपटांचे दिग्दर्शनही केलंय.

पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली. देशभक्तीपर चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी "हरियाली और रास्ता", "वो कौन थी", "हिमालय की गॉड में", "दो बदन", "पत्थर के सनम", "नील कमल" आणि "क्रांती" सारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केलंय.


सोमवार, ३१ मार्च, २०२५

महाराष्ट्र केसरी विजेता 2025

 मनःपूर्वक अभिनंदन पैलवान वेताळ  जी शेळके.. 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आमदार रोहीत पवार मित्र मंडळ,जिल्हा तालीम संघ आणि कर्जत तालुका कुस्तीगीर संघाचे वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरचा वेताळ शेळके विजयी ठरला.

गादी वर झालेल्या अंतिम सामन्यात १- ७ च्या फरकाने वेताळ शेळके यांनी मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटील याच्या एकहाती विजय मिळवित महाराष्ट्र केसरी किताब मानकरी ठरला.तर पृथ्वीराज पाटील उप महाराष्ट्र केसरी ठरला. विजेत्याला ज्येष्ट नेते शरदचंद्र पवार यांचे हस्ते चांदीची गदा आणि बुलेट गादी बक्षीस म्हणून देण्यात आली.


बुधवार, २६ मार्च, २०२५

विधानसभा उपसभापती निवड 2025..

 मनपूर्वक अभिनंदन 🌹 🌹 🌹 

विधानसभा अध्यक्षपद आणि विधानपरिषद सभापती पद हे भाजपकडे गेले. तर विधान परिषदेचे उपसभापती पद हे शिंदेंकडे राहिले. विधानसभा उपाध्यक्षपद हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा निवडून आलेल्या 

आण्णा बनसोडे यांची उपाध्यक्ष 

म्हणून निवड करण्यात आली आहे.

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आण्णा बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज सादर केला होता. परंतु विरोधकांकडून कोणताही उमेदवारी अर्ज सादर न केल्याने आज त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी प्रस्ताव मांडला. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अनुमोदन दिले.

गुरुवार, २० मार्च, २०२५

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025

 .महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना जाहीर

मनःपूर्वक अभिनंदन...

राम सुतार हे सुप्रसिद्ध भारतीय शिल्पकार आहेत. त्यांचे पूर्ण नाव राम वंजी सुतार असे आहे. धुळे जिल्ह्यातील गोंदूर या खेडेगावात त्यांचा जन्म झाला होता. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यांचे बालपण अतिशय खडतर आणि संघर्षाच्या स्थितीत गेले. परंतु, लहानपणापासून त्यांना शिल्पकलेची आवड होती. पुढे त्यांना त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. राम सुतार पुढील शिक्षणासाठी मुंबईतील सर जेजे आर्ट ऑफ स्कूलमध्ये आले. प्रतिरुपण व शिल्पकलाविषयक पदविका मिळवली


 ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार महात्मा गांधी यांच्या मुर्तींसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी यांच्या मूर्ती 50 पेक्षा जास्त देशांत बसवण्यात आलेल्या आहेत. संसद भवनात स्थापित करण्यात आलेली महात्मा गांधी यांचे शिल्पही राम सुतारय यांनीच तयार केले आहे. त्यांनी आतापर्यंत महात्मा गांधींच्या एक हजारांपेक्षा जास्त मूर्ती तयार केल्या आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह अन्य नेत्यांचे शिल्पही राम सुतार यांनी तयार केले आहेत.


देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात उंच शिल्प राम सुतार यांनीच डिझाइन केले होते. या शिल्पाच्या निर्माण काळात ते अनेक दिवस गुजरातेतच होते. सध्या राम सुतार केम्पेगौडा येथे एक 90 फूट उंचीची मूर्ती तयार करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. 

गुरुवार, १३ मार्च, २०२५

दिनविशेष 21 मार्च..

 २१ मार्च हा दिवस अनेक ऐतिहासिक घटनांनी परिपूर्ण आहे. या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे:

महत्त्वाच्या घटना:

 * आंतरराष्ट्रीय वन दिन:

   * संयुक्त राष्ट्रसंघाने 2012 पासून 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला आहे.

 * आंतरराष्ट्रीय जातीभेद विरोधी दिन:

   * जातीभेदाविरुद्ध लढण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

 * जागतिक कविता दिन:

   * युनेस्कोने 21 मार्च हा दिवस जागतिक कविता दिन म्हणून घोषित केला आहे.

 * १९९०: नामिबियाला दक्षिण आफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

 * २००६: सोशल मीडिया साइट ट्विटरची स्थापना झाली.

 * २००३: जळगाव महानगरपालिकेची स्थापना.

 * २०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.

 * १६८०: छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.

 * १८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.

 * १५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणाऱ्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

 * १८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

जन्म:

 * १९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म.

 * १९७८: अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.

 * १८४७: कालनिर्णयचे निर्माते बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म.

 * १८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म.

 * १९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म.

मृत्यू:

 * १९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन.

 * १९७३: नटवर्य शंकर घाणेकर यांचे निधन.

इतर माहिती:

 * या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

 * 21 मार्च रोजी दिवस आणि रात्र समान असतात.


लोकप्रिय पोस्ट