लेबल
- Moral story (9)
- NMMS test (22)
- चालू घडामोडी current knowledge (74)
- जनरल नॉलेज (84)
- दिनविशेष (188)
- परीक्षा exam (31)
- प्रेरणादायी लेख (67)
- बोधकथा (14)
- महान व्यक्ती (special person) (111)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- विशेष प्रश्नमंजुषा (43)
- शासन निर्णय gr (47)
- शिक्षक दिन भाषण (4)
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (114)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (74)
- सामान्य ज्ञान टेस्ट (2)
- स्कॉलरशिप imp (21)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (50)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (31)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (27)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट लहान गट (58)
मंगळवार, २९ जुलै, २०२५
महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025
भारताचा अभिमान..! मनःपूर्वक अभिनंदन दिव्या..🌹🌹💐💐👍👍💐💐🌹🌹👍👍
जॉर्जियामध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत दिव्या देशमुख हिने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले..! नागपूरच्या या 19 वर्षीय बुद्धीबळपटूने सर्व देशवासीयांचा अभिमान वाढवला आहे.
दिव्याचे हे यश तरुणाईसाठी एक
प्रेरणास्त्रोत ठरेल!
तिला मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
सोमवार, २८ जुलै, २०२५
ए. पी. जे. अब्दुल कलाम
*भारतरत्न*
*अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम*
तथा
*ए. पी. जे. अब्दुल कलाम*
(भारताचे ११ वे राष्ट्रपती, वैज्ञानिक, अभियंता)
*जन्म : १५ ऑक्टोबर १९३*
*(रामेश्वर)*
*मृत्यू : २७ जुलै २०१५*
*(शिलाँग)*
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
🚀 *कार्य* 🛰
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
📚 *शिक्षण*
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
♦ *स्वभाव*
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
🥇 *गौरव*
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
◼ *निधन*
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन, यशवंतराव चव्हाण सेंटर.* 2025
*शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन, यशवंतराव चव्हाण सेंटर.*
(बालशिक्षण)
यावर्षीपासून (२०२५-२६) बालशिक्षणामध्ये काम करणार्या व्यक्तीसाठी शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) देण्यात येणार आहे.
🌀 एकूण १० फेलोशिप.
🕹फेलोशिप कोणासाठी असेल?
महाराष्ट्रभरात बालशिक्षणात काम करणारी व्यक्ती
🔹अंगणवाडी सेविका,
🔹पर्यवेक्षिका (सुपरवायझर)
🔹 बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO)
🔹बालशिक्षणात काम करणाऱ्या संस्थेतील कार्यकर्ते
🔹अनुदानित शाळांतील बालशिक्षक
🔹बालशिक्षण विभागप्रमुख
(खाजगी अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्यांना ही फेलोशिप नसेल)
✅ सविस्तर माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता खालील वेबसाईटवरती क्लिक करावे.
https://www.sharadpawarfellowship.com/
➡️ अर्ज करण्याची मुदत - १५ ऑगस्ट २०२५
रविवार, २७ जुलै, २०२५
कल्पना दत्ता
*कल्पना दत्ता*
(भारतीय क्रांतिकारक)
*जन्म : 27 जुलै, 1913*
(सिरपूर, चितगांव (बांग्लादेश), बंगाल)
*मृत्यु : 8 फेब्रुवारी 1995*
(कलकत्ता, पश्चिम बंगाल)
इतर नाव : कल्पना जोशी
पति : पूरन चंद जोशी
नागरिकता : भारतीय
चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा
जेल यात्रा : फेब्रुवारी 1934 मध्ये 21 वर्षाच्या कल्पना दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.
अन्य माहीती : सप्टेंबर 1979 मध्ये कल्पना दत्त यांना पुण्यात 'वीर महिला' या उपाधि ने सम्मानित केले गेले.
कल्पना दत्ता (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केल. ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली.
💁♀️ *सुरुवातीचे जीवन*
कल्पनाचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, ती कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी करण्यसाठी गेली. तेथे असतानाच ती विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्स्थेची सदस्य झाली. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.
🔫 *सशस्त्र चळवळ*
चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३० ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मे मध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या 'भारतीय रिपब्लिकन आर्मी’ च्या चितगांव शाखेत भरती झाली. सप्टेंबर १९३१ ला सूर्य सेनने तिला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच तिला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसर्या सुनावणीत तिला शिक्षा झाली. १९३९ मध्ये तिची सुटका झाली.
🙍🏻♀️ *नंतरचे जीवन*
कल्पना १९४० ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाली, व भाकपची सदस्य झाली. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस तिने स्वयंसेवक म्हणून काम केले. तिने तिचे आत्मकथात्मक पुस्तक, चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ ला इंग्रजीत प्रकाशीत केले. १९४६ मध्ये ती बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढली, पण जिंकू शकली नाही.
नंतर तिने भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तिचा म्रुत्यू झाला.
💁♀️ *वैयक्तिक जीवन*
कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला.. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.
🎞️ *चित्रपट*
चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये 'खेले हम जी जान से' हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पनाचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ ला 'चितगांव' हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.
बुधवार, २३ जुलै, २०२५
Clock time reading test 009
⏰ "Watch Time" – घड्याळातील वेळ आधारित 20 प्रश्नांची चाचणी
क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद
क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद
*जन्म : २३ जुलै, १९०६*
(भाबरा, झाबुआ, अलिराजपूर, मध्यप्रदेश)
*विरमरण : २७ फेब्रुवारी,*
*१९३१*
(अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद)
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा
धर्म: हिंदू
वडील: पंडित सिताराम तिवारी
आई: जगरानी देवी
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पुर्वज कानपूर जवळच्या बादरका गावातच राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.
वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.
साँडर्सचा बळी घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंताचा चेला बनले होते. कारण की, या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते, परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.
काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. वर वर पाहणार्याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले आहे असे वाटे.
गांधी आयर्वीन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतू गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले.”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’,ही आझादांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई भाईंओ, तुम लोग मेरे ऊपर गोलियाँ क्यों बरस रहे हो ? मै तो तुम्हारी आजादी के लिये लढ रहा हूँ ! कुछ समझो तो सही !” इतर लोकांना ते म्हणाले,” इधर मत आओ ! गोलियाँ चल रही है ! मारे जाओगे ! वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”
आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले.
नॉट बॉबर उद्गारला, ” असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !”
पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत, तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडीत मालवीय, सौ. कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. २८ फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढार्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.
सोमवार, २१ जुलै, २०२५
केंद्रप्रमुख परीक्षा...
खालील लिंक ला क्लिक करून केंद्रप्रमुख परीक्षेच्या नोट्स डाऊनलोड करू शकता
https://drive.google.com/file/d/1zlKMoAgcov-VaWUPzFtdHY6XTLBgt8wt/view?usp=drivesdk
अधिक माहिती साठी www.vkbeducation.com या शैक्षणिक वेबसाईटला भेट द्या..
स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज
- मुख्यपृष्ठ
- गणितीय महत्वाची सूत्रे
- म्हणी व त्याचे अर्थ
- जनरल नॉलेज
- इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- विरामचिन्हे
- विलोमपद भाषेची गंमत
- समूहदर्शक शब्द
- एकाच शब्दाचे अनेक अर्थ
- शब्दसमूहा बद्दल एक शब्द
- Proverbs म्हणी
- भारत राज्य आणि राजधानी
- एकवचन अनेकवचन
- महान भारतीयांची समाधी स्थळे *
- Months महिने
- प्राणी आणि त्यांचा निवारा
- प्राणी व त्यांची पिल्लू
- वाक्यप्रचार
- लिंग ,लिंग प्रकार
- नद्या आणि काठावरील शहरे
- अष्टविनायक
- देश आणि राष्ट्रीय खेळ
- मार्ग आणि मार्गावरील घाटांची नावे
- नृत्यप्रकार आणि सबंधित राज्य
- सीमारेषाची नावे
- धर्मग्रंथ आणि संस्थापक
- सरोवरे आणि राज्ये
- प्रसिद्ध घोषणा
- महाराष्ट्र राज्याची प्रतीके
- जोडशब्द
- शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ
- वाद्यांचे प्रकार
- मूलभूत हक्क आणि कर्तव्य
- जिल्हा निर्मिती आणि विभाजन
- यमक जुळणारे शब्द
- खेळ आणि खेळाडू
- दिनविशेष
- संक्षिप्त रूपे abbreviation
- प्राणी पक्षी यांची पिल्ले /animal birds bebies
- भारतीय वास्तुशिल्प
- भारतीय अभयारण्ये
- जगातील प्रमुख धर्म आणि धर्मग्रंथ
- महाराष्ट्रतील जिल्हे आणि टोपण नावे
- भारतातील थंड हवेची ठिकाणे
- Singular Plural
- भारतातील नवीन राज्यपालाचे नियुक्ती 2023
- मराठी इंग्रजी सुविचार
- शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
- रोगाचे नाव व रोग होण्याचे ठिकाण
- महाराष्ट्रातील वस्तुसंग्राहलये
- भारताचे पंतप्रधान
- राष्ट्रीय प्रतीके भारत bharat India
- भारतातील विविध क्रांती
- महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपणनावे
- महाराष्ट्रातील पहिले गाव नंबर 1
- वैज्ञानिक उपकरणे....
- जगातील काही प्रमुख सीमारेषा
- जागतिक संघटना व त्यांची मुख्यालय
- वैज्ञानिक संस्था व संज्ञा यांची माहिती
- विभाज्यतेच्या कसोट्या
- संक्षिप्त रूपे
- महत्वाची बंदरे
- प्रसिद्ध घाट
- Singular-Plural एकवचन अनेकवचन
- राष्ट्रीय उद्याने आणि राज्य
- भारत सरकार 2024 केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची खातेवाटपाची संपूर्ण यादी
लोकप्रिय पोस्ट
-
*JAVAHAR NAVODAY VIDYALAY* *Selection Test - 2026* *शैक्षणिक वर्ष 2026/27 साठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा फॉर्म भरणे सुरू* *यं...
-
विविध प्रकारच्या वस्तू अथवा प्राणी यांच्या समूहाचा बोध होण्यासाठी त्याला विशिष्ट नाव दिले जाते त्या समुदर्शक शब्द असे म्हणतात. क्रमांक ...
-
Loading…
-
एक पेड माँ के नाम या शासनाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://ecoclubs.education.gov.in/ विद्यार्थ्यांचे पूर्...
-
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (RTE ACT 2009) कलम क्र. १ संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ कलम क्र. २ व्याख्या- प्राथ. शिक्षण (E...
-
खालील लिंक ला क्लिक करून केंद्रप्रमुख परीक्षेच्या नोट्स डाऊनलोड करू शकता https://drive.google.com/file/d/1zlKMoAgcov-VaWUPzFtdHY6XTLBgt8wt...
-
तारे व आपली सूर्यमाला – MCQ टेस्ट 🌞 "तारे व आपली सूर्यमाला" – इयत्ता 5 वी | MCQ टेस्ट (20 प्रश्न) ✅ उत्तर तपासा...
-
सयाजीराव गायकवाड – टेस्ट 👑 सयाजीराव गायकवाड – टेस्ट (20 प्रश्न) ✅ उत्तर तपासा