blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

श्रीमंत (बोधकथा)



एका कुविख्यात दरोडेखोराची ही कथा. त्याचा मुलगा जेव्हा सोळा वर्षाचा झाला, तेव्हा त्याने त्याला आपल्या व्यवसायाची गुपिते सांगण्यास सुरूवात केली. तो आता आपल्या व्यवसायाची सारी सुत्रे मुलाकडे | देणार होता. मुलाला तो सांगत होता, "बेटा! तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाशील आणि पोलिसांच्या हाती सापडशील. तेव्हा मी सांगतो त्याच ठिकाणी तुझ्या आयुष्यातील पहिली चोरी कर."


असे म्हणून त्याने आपल्या मुलाला एका साधूची झोपडी दाखवली. मुलगा म्हणाला, "पण तिथे चोरी करून काय मिळणार ?" दरोडेखोर म्हणाला, "अरे तिथे गेलास, तर दोन फायदे होतील. एक म्हणजे तिथे पोलिस नक्की येत नाहीत. दुसरे म्हणजे त्या साधूला लोक भरपूर भेटवस्तू देतात..... सोनं, चांदी, फळं.. पण तो त्या सर्वांना वाटत राहतो. तो सारं वाटणारच आहे, तर आपण का आणू नये ? आणि मी गेली तीस वर्षे तिथं चोरी करतो. त्यानं कधीही पोलिसात तक्रार केली नाही."


हे ऐकून मुलगा म्हणाला, "म्हणजे तुम्ही तीस वर्षे चोरी करूनही त्याला कधीही, काहीही कमी पडलं नाही आणि तुम्हाला मात्र अजून चोरी करावी लागते. याचाच अर्थ सज्जनपणाने जगूनच श्रीमंती लाभते. मग हा धंदा करण्यापेक्षा मी त्या साधूकडेच जाऊन राहतो."

बोध ::::

 कितीही संकटे आली, तरी सज्जनांचे समाधान, त्यांची श्रीमंती कधीच कमी होत नाही. ते मनानेच श्रीमंत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.