blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

जीवन कौशल्ये शिक्षण

 जीवन कौशल्ये शिक्षण

जागतिक आरोग्य संघटनेची एकूण 10 जीवन कौशल्य आहेत.


जीवनाच्या वाढ व विकास यांच्या महामार्गावर, प्रगतीवर जाताना प्रत्येक विदयार्थ्यांच्या क्षमतांचा योग्य विकास होणे अपेक्षित असते. त्यामुळे जीवन आनंददायी आरोग्यदायी आणि यशस्वी होऊ शकते. विदयार्थ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्ये सुसंगतपणे विकसित केली जावीत, त्यामुळे त्याला प्रभावीपणे व कुशलतेने जीवन ज येईल. अध्ययनकर्त्यांना भरपूर संधी उपलब्ध करून दयाव्यात की ज्यामुळे अध्ययनकर्ते ही कौशल्ये सहजगत्या शकतील, ग्रहण करतील म्हणूनच व्यक्तींच्या स्वतःच्या मानसिक व शारीरिक सर्वोत्कृष्ट क्षमतांचा वापर करून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे जीवन कौशल्य शिक्षण.


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९९७ मध्ये दहा मूलभूत जीवन कौशल्ये सांगितली आहेत. जीवन कौशल्ये म्हणजे अशी कौशल्ये की ज्याद्वारे व्यक्ती आपली शक्ती व क्षमतांचा वापर करून दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडविते व सकारात्मकपणे आपल्या दैनंदिन गरज प्रभावीपणे पूर्ण करते. जीवन कौशल्ये


१) 'स्व' ची जाणीव (Self Awarness) २) समानुभूती (Empathy)


३) समस्या निराकरण (Problem Solving) ४) निर्णय क्षमता (Decision Making)


५) परिणामकारक संप्रेषण (Effective Communication)


६) व्यक्ती-व्यक्तींमधील सहसंबंध (Interpersonal Relations) ७) सर्जनशील विचार (Creative Thinking)


८) चिकित्सक विचार (Critical Thinking)


९) भावनांचे समायोजन (Coping with Emotions)


१०) ताणतणावांचे समयोजन (Coping with Stress)


जीवन कौशल्य परिचय


१) 'स्व' ची जाणीव :


'स्व' ची जाणीव म्हणजे शक्तीची स्वतःच्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याची क्षमता. या कौशल्यामुळे व्यक्तीला स्वतःची आवड, नावड, भावना व वृत्ती यांच्याबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो


.


'स्व'ची जाणीव कौशल्य प्राप्त केल्यामुळे स्वयंशिस्त, नियमितपणा, वक्तशीरपणा, परस्पर सहकार्य इत्यादी गुण मुलांच्या अंगी आपोआप बाणतात. मुलांनी 'स्व' च्या जाणिवेचे कौशल्य आत्मसात करावे असे वाटत असल्यास प्रौढांनी सहनशीलता दाखवावी. त्यांची काळजी घ्यावी. मुलांना त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून याची त्यांच्या मर्यादांचीही जागावी. मुलांना स्वतःचे मूल्यमापन करण्याची आणि योग्य मार्गानि जाण्याची संधी द्यावी.


२) समानानुभूती :


समानानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत असे समजून तिचा दृष्टिकोन जाणून घेण्याची क्षमता होय. समानुभूतीमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची दुःखे व भावना त्याच्या भूमिकेत जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्यांना त्यांचे दुःख अथवा चिंता यावर मात करायला मदत करते.


विद्यार्थ्यांमध्ये भावनिक समरसता म्हणजे समानानुभूती कौशल्याचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी प्रथम विदयार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक विकासाच्या संदर्भातून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या व्यक्तिगत पूर्वग्रहाला अनुसरून इतरांबद्दल मत कसे बनवू नये आणि इतरांना स्वतःच्या समस्या स्वतःच सोडविण्यास कशी मदत करावी या गोष्टी समजण्यास शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभवांतून मार्गदर्शन करावे.. 

३) समस्या निराकरण :


समस्या म्हणजे आपल्या जीवनात येणारी अवघड परिस्थिती. ती लहान असो की मोठी, त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला मार्ग शोधण्याची आवश्यकता असते. गोंधळवून टाकणाऱ्या अवघड परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या प्रक्रियेला समस्या निराकरण म्हणतात.


समस्या निराकरणाचे कौशल्य विकसित करण्यामध्ये शिक्षक व पालक मुख्य भूमिका बजावू शकतात. समस्या जाणून घेणे. तिचा अर्थ समजून घ्यायला शिकणे, समस्येची कारणे शोधायला मदत करणे, सर्व शक्य असणारे पर्याय निर्माण करण्यास मदत करणे, योग्य पर्याय निवडून त्यानुसार कृती करण्यास मदत करणे, वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून कसे घ्यावे ह्याबाबत समस्येवर उपाय सापडेपर्यंत चालू ठेवण्यास प्रेरित करू शकतात. समस्या सोडविण्यासाठी आवश्यक व्यवहारातून विकसित करताना आदर्श उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवावेत. त्यातूनच सकारात्मक स्थिर वृत्तीचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होत असतो.


४) निर्णय क्षमता :


निर्णय क्षमता ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती किंवा गट एखादया प्रसंगाच्या किंवा समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करतो. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करतो आणि योग्य पर्यायाची निवड निश्चित करतो. विषयाचे महत्त्व, निर्णयाची अपेक्षित प्रतिक्रिया, संबंधित व्यक्ती अथवा गटाच्या वर्तनाचे सांस्कृतिक आदर्श, नैतिकता इत्यादी घटक निर्णय क्षमतेच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. विदयार्थ्यांच्या वतीने निर्णय घेण्यापेक्षा त्यांचा आत्मविश्वास वाढेल अशा परिस्थितींचा, धोका पत्करण्याच्या त्यांच्या तयारीचा आणि त्यांच्या स्वावलंबनाच्या भावनेचा अभ्यास पालक व शिक्षकांनी केला पाहिजे. हे करताना मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव विकसित करणे. स्वतंत्र विचार करणे. स्वार्थीपणाचा त्याग करणे आणि सहकार्याची भावना यांना तसेच त्यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला


विविध प्रकारे उत्तेजन दिले पाहिजे. 

५) परिणामकारक संप्रेषण :


आपण किती परिणामकारकपणे आपले विचार व्यक्त करतो ही बाब आपल्या जीवनातील यश निश्चित करते. पाठविणाऱ्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीने त्याचा संदेश ज्यावेळी स्वीकार करणारा स्वीकारतो, त्या वेळ परिणामकारक संप्रेषण घडते.


परिणामकारक संप्रेषण कौशल्य विकासासाठी आपल्या आकलनाची व्याप्ती वाढवली पाहिजे. आपल्या कल्पना बोलून अथवा न बोलताही स्पष्टपणे व्यक्त करण्याची सवय विकसित केली पाहिजे. विद्याथ्र्यांची भिन्नभिन्न पार्श्वभूमी, त्यांच्या बौद्धिक पातळीतील फरक, ज्या परिस्थितीत संप्रेषण घडत असते तिचे खास स्वरूप या सर्व गोष्टी शिक्षकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतील, अध्ययनशैलीतील, कौटुंबिक पार्श्वभूमीतील आणि त्यांच्या संप्रेषणाच्या मार्गातील व्यक्तिगत भेद माहीत करून दिले पाहिजेत.


६) व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंध :


व्यक्ती-व्यक्तींमधील आदर, प्रामाणिकपणा, विश्वास यांवर परस्परसंबंध अवलंबून असतात. समजूतदारपणा सहकार्य या आधारांवर परस्परांशी नाती जुळविली जातात तेव्हा त्याचा दर्जा उच्च प्रकारचा असतो. जेव्हा आपल्याला परस्परसंबंधाचे महत्त्व व फायदे जाणवतात, तेव्हा खरे परस्परसंबंध निर्माण होतात.


इतरांचे कौतुक करणे, आभार मानणे, गरजेच्या वेळी त्यांना मदत करणे, पालक व शिक्षकांचे ऐकणे, सूचनांचे पालन असे गुण अंगीकारण्यास मुलांना शिकविले तर ती इतरांशी स्नेहपूर्ण संबंध जोडण्याचे कौशल्य प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतील. त्यांच्यामध्ये सहकार्य, परिस्थितीशी मिळते जुळते घेण्याची वृत्ती, सहृदयता, स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे इत्यादी कौशल्ये निर्माण होतील. 

 ७) सर्जनशील विचार :


सर्जनशील विचार म्हणजे असे चिंतन जे काहीतरी नवीन उपयुक्त व असाधारण निर्माण करते. आजपर्यंत अस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट जेव्हा एखादी व्यक्ती शोधून काढत, तेव्हा सर्जनशीलता दिसून येते. ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्याची नवीन रीत शोधून काढते किंवा अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेचा पूर्णपणे नवीन गोष्टीच्या निर्मितीसाठी वापर करते, तेव्हा सर्जनशीलता अस्तित्वात येते.


हे कौशल्य आत्मसात करण्यास पोषक असे वातावरण शिक्षकांनी वर्गात निर्माण केले पाहिजे. मुलांना आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करणयाची संधी दिली पाहिजे. समस्या निर्माण झाल्यास मुलांना जेवढे उपाय सुचविता येतील तेवढे सुचविण्यास सांगावे. समस्येच्या संदर्भात शक्य असणाऱ्या सर्व उपायांबाबत विचार करण्यास, चर्चा व वादविवादात सक्रिय भाग घेण्यास उत्तेजन दयावे.


८) चिकित्सक विचार : एखादया विषयाची विशिष्ट माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहान-लहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची विचार प्रक्रिया म्हणजे चिकित्सक विचार होय. चिकित्सक विचार तर्कशुद्ध विचार करू शकण्याच्या क्षमतेची निर्मिती करतो.


चिकित्सक विचार कौशल्याचा विकास घडवून आणण्यासाठी विविध विषयांमधून शिकविल्या जाणाऱ्या पाठ्यक्रमाचा उपयोग करता येईल जेव्हा या कामासाठी योग्य मजकूर शिकवायची वेळ येईल तेव्हा पृथक्करण, विचारमंचन, तर्कशुद्ध विचार आणि अनुमान काढणे ही कौशल्ये विकसित करावी लागेल. घाईघाईने निर्णय न घेणे, आपल्या पक्षपातीपणा अथवा पूर्वग्रह आपल्या निर्णयप्रक्रियेत अडथळा आणीत नाही ना, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 


९) भावनांचे समायोजन :


भावना हा शब्द कोणताही क्षोभ, मानसिक स्थैर्याचा भंग, सहनशीलता अथवा मानवाची प्रक्षुब्धावस्था यांच्याशी संबंधित आहे. भावना सकारात्मक असोत वा नकारात्मक, जर त्यांना विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ दिले तर त्या अपायकारक ठरतात म्हणून ताणतणावांची यशस्वीपणे हाताळणी करण्यास शिकविण्याची आवश्यकता आहे.


विदयार्थ्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकविण्याची फार गरज आहे. यासाठी पालक व शिक्षकांनी सोशिक बनले पाहिजे. भावनांच्या आहारी गेल्यास होणारे तोटे तसेच भावनांना काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यास होणारे फायदे मुलांना स्पष्ट शब्दांमध्ये समजावून सांगितले पाहिजेत. भावना कशा व्यक्त कराव्यांत हे सुद्धा शिकविले पाहिजे. आपल्यावर कोणत्या भावनेचा प्रभाव आहे आणि तिचे उगमस्थान कोठेआहे हे शोधणे या मूलभूत बाबींची जाणीव करून देणे गरजेचे आहे. भावना अनावर झाल्यास दिसणारी शारीरिक लक्षणेसुद्धा मुलांना माहीत असली पाहिजेत, 

 १०) ताणतणावांचे समायोजन :


आपण एखादे कार्य हाती घेतलेले असते ते पूर्ण करीत असताना अनेक समस्या उद्भवतात व दडपण येते. अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा सामान्यपणे लोक तणावग्रस्त होतात. एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहिली तर त्याचे पर्यवसान शारीरिक तसेच मानसिक स्वरूपाच्या अनेक समस्यांमध्ये होते. म्हणून ताणतणावांची यशस्वीपणे हाताळणी गरजेचे असते. जोपर्यंत ताण निर्माण करणाऱ्या परिस्थितीची ओळख पटत नाही आणि तिच्यावर मात करण्यासाठी पुरेसे उपाय केले जात नाही तोपर्यंत ती परिस्थिती अनेक समस्या निर्माण करू शकते.


प्रेमळ व आश्वासक वातावरण निर्माण करून मुलांमध्ये आपण आत्मविश्वास निर्माण करू शकतो. मुलांना कामांचा प्राधान्यक्रम ठरवून विचारीपणे वागायला सांगितले पाहिजे. परिस्थितीचे विश्लेषण करून आपल्या तणावांमागील कारणे शोधायला शिकवू शकतो. योग्य निर्णय घेऊन कृती करण्याची प्रेरणा त्यांना देऊ शकतो. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचे प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले पाहिजे. त्यामुळे हळूहळू व टप्प्याटप्प्याने मुले आपल्या तणावांवर मात करायला शिकतात.


वरील सर्व जीवन कौशल्ये विदयार्थ्यांपर्यंत पोहचविताना शिक्षकांनी आपल्या दैनंदिन अध्ययन अनुभवांतून तसेच विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. शिक्षकांनी गरजेनुसार कल्पकता वापरून शाळेतील शिक्षण विद्यार्थ्यांच्या वास्तव जीवनाशी कसे जोडले जाईल ते पाहावे व विद्यार्थी स्वानुभवातून सहजतेने शिकतील.. त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित होतील. 

🙏🙏 धन्यवाद.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.