महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 'गट-क' (Group-C) संवर्गातील विविध पदांच्या मेगा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २,६१९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून पात्र
उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी २७ जून पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल. यांनतर अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2026 आहे. या भरतीची संयुक्त पूर्व परीक्षा (CBT) 27 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करून परीक्षेची तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पदाचे नाव आणि रिक्त जागा
1) उद्योग निरीक्षक - 09 जागा
2) तांत्रिक सहायक -03 जागा
3) कर सहायक -282 जागा
4) सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क - 461 जागा
5) लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच
राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये - 1864 जागा
शैक्षणिक पात्रता
23 :
पद क्र. १ (उद्योग निरीक्षक): इंजिनिअरिंग पदवी किंवा
तंत्रज्ञानातील डिप्लोमा (Diploma in Technology) किंवा विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.).
पद क्र. २ (तांत्रिक सहायक): कोणत्याही शाखेतील पदवीधर.
पद क्र. ३ (कर सहायक):
१) कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र. ४ (सहायक मोटार वाहन निरीक्षक):
१) १० वी उत्तीर्ण.
२) ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य पात्रता.
पद क्र. ५ (लिपिक-टंकलेखक):
१) कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट: ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ३९४ रुपये, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ प्रवर्गासाठी २९४ रुपये, तर माजी सैनिकांसाठी ४४ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
लिंक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in