मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

रक्षाबंधन सणावर आधारित टेस्ट...

रक्षाबंधन प्रश्नमंजुषा

🎀 रक्षाबंधन प्रश्नमंजुषा 🎀

20 गुणांची ऑनलाइन चाचणी | प्रत्येक प्रश्न 1 गुण
1) रक्षाबंधन हा सण कोणत्या नात्याचे प्रतीक आहे?
2) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हातावर काय बांधते?
3) रक्षाबंधन सण कोणत्या महिन्यात येतो?
4) रक्षाबंधनाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?
5) रक्षाबंधन कोणत्या तिथीला साजरे केले जाते?
6) राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला काय देतो?
7) रक्षाबंधनाचा मुख्य संदेश कोणता आहे?
8) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला काय करते?
9) राखी कोणत्या नात्याचे बंधन दर्शवते?
10) रक्षाबंधन हा कोणत्या प्रकारचा सण आहे?
11) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधताना कोणती भावना व्यक्त करते?
12) रक्षाबंधनाच्या दिवशी प्रामुख्याने कोणता धागा बांधला जातो?
13) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर काय लावते?
14) रक्षाबंधनाच्या दिवशी कुटुंबात कोणती भावना वाढीस लागते?
15) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधल्यानंतर काय करते?
16) रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीबद्दल काय भावना ठेवावी?
17) रक्षाबंधन हा सण कोणता संदेश देतो?
18) रक्षाबंधनाच्या सणात राखी कशाचे प्रतीक मानली जाते?
19) रक्षाबंधनामुळे कोणता सामाजिक गुण वाढीस लागतो?
20) रक्षाबंधनाचा सण आपल्याला काय शिकवतो?

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन 2026...

 *फेलोशिपसाठी नियमावली*


*फेलोशिपचा विषय – कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने 'फ्लिप्ड क्लासरूम किंवा वर्ग पालट अध्यापन पद्धती'*


कृपया नियमावली पूर्णपणे वाचावी –


*अ) नोंदणी*


- फेलोशिपसाठी निश्चित केलेल्या विषयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावरील नवोपक्रम स्वीकारले जाणार नाहीत.

- महाराष्ट्रातील कोणत्याही माध्यमाच्या मान्यताप्राप्त शाळांतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक अर्ज करू शकतील. मात्र, प्रस्ताव आणि अहवाल केवळ मराठी किंवा इंग्रजी भाषेतच सादर करता येतील.

- अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी दीक्षा ॲपवरील 'AI साथी' हा चार तासांचा कोर्स पूर्ण केलेला असावा.

- अर्ज करताना जन्मतारखेचा पुरावा (जन्माचा दाखला, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) किंवा आधार कार्ड यांपैकी कोणतेही एक) जोडणे बंधनकारक आहे.

- नोंदणी करताना दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करून WhatsApp समूहात सहभागी व्हावे. पुढील सर्व सूचना WhatsApp समूहावरच दिल्या जातील.

- नोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांसाठी एक ऑनलाइन परीक्षा आयोजित केली जाईल. त्यासाठीची लिंकही WhatsApp समूहावरच देण्यात येईल.


*ब) ऑनलाइन परीक्षा*


- ऑनलाइन परीक्षेत MCQ पद्धतीचे ३० प्रश्न असतील. 

- MCQ पद्धतीचे प्रश्न सोडवून झाल्यानंतर साधारण १५० ते २५० शब्दांमध्ये "हा उपक्रम मला का घ्यावासा वाटतो?" या विषयावर उद्देशपत्र (Statement of Purpose – SOP) लिहावे लागेल. त्यासाठी स्वतंत्र वेळ देण्यात येईल.


*क) निवड*


- ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर गुणानुक्रमानुसार ३० प्राथमिक व १५ माध्यमिक अशा एकूण ४५ शिक्षकांची दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल.

- या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले शिक्षक आपापल्या नवोपक्रमाचा प्रकल्प प्रस्ताव तयार करतील.

- निवड झालेल्या शिक्षकांनी नवोपक्रम राबवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचे परवानगीपत्र कार्यशाळेस उपस्थित राहताना सादर करणे आवश्यक आहे.

- त्यानंतर प्रकल्प प्रस्ताव आणि उद्देशपत्र (Statement of Purpose – SOP) यांच्या आधारे २० प्राथमिक व १० माध्यमिक अशा एकूण ३० शिक्षकांची अंतिम निवड करण्यात येईल.

- अंतिम निवड यशवंतराव चव्हाण सेंटरने नियुक्त केलेली निवड समिती करेल. निवड समितीचा निर्णय अंतिम व सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील.


*ड) निवडीनंतर*


- निवड झालेल्या शिक्षकांनी आपला नवोपक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे. उपक्रम पूर्ण करण्यास विलंब झाल्यास संबंधित फेलोशिपबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार यशवंतराव चव्हाण सेंटरला राहील.

- यशवंतराव चव्हाण सेंटरने वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठका व प्रशिक्षण कार्यक्रमांच्या संपूर्ण कालावधीत उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अपरिहार्य अडचण असल्यास पूर्वकल्पना देऊन सेंटरची परवानगी घेणे आवश्यक राहील.

- उपक्रम सुरू असताना यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रतिनिधी पूर्वकल्पना देऊन भेट देतील. त्यावेळी त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे अपेक्षित आहे.


*इ) अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ*


- इच्छुक शिक्षकांनी दिनांक १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत https://apply.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.


*ई) फेलोशिपच्या अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक*


१) फेलोशिपसाठी अर्ज मागवण्याची घोषणा – १२ ऑगस्ट २०२६


२) ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी – १२ ऑगस्ट २०२६ ते १२ सप्टेंबर २०२६


३) नोंदणी केलेल्या शिक्षकांसाठी ऑनलाइन परीक्षा – ४ ऑक्टोबर २०२६


४) निवड झालेल्या ४५ शिक्षकांची कार्यशाळा – ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर २०२६


५) ३० शिक्षकांची अंतिम निवड जाहीर करणे – २६ नोव्हेंबर २०२६


६) फेलोशिप प्रदान सोहळा – रविवार, १३ डिसेंबर २०२६


फेलोशिपचा कालखंड-

*मे २०२७ ते मे २०२८*

राष्ट्रीय क्रीडा दिन..2026

 क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना व निरोगी जीवनशैली याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ हा दिनांक २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत "Khelega Bharat, Jeetega Bharat" या संकल्पनेखाली साजरा करण्यात येणार आहे.






दिनांक २८ ऑगस्ट २०२६ – TRIBUTE” – मेजर ध्यानचंद व भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाला अभिवादन करण्यासाठी पुढीलपैकी योग्य उपक्रम आयोजित करावेत

  • मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली/अभिवादन करणे.
  • विदयार्थ्यांकडून विविध क्रीडा प्रकारांशी संबंधित “29 Challenge” राबविणे.
  • “Pass the Ball Challenge” आयोजित करणे.
  • विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये “Sports Bandhan” उपक्रम राबविणे.
  • भारतीय क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडू व स्थानिक क्रीडा व्यक्तिमत्वांची माहिती विद्यार्थ्यांना देणे.
  • उपलब्ध डिजिटल साहित्याचा वापर करून राष्ट्रीय क्रीडा दिनाबाबत जनजागृती करणे.

 दिनांक २९ ऑगस्ट २०२६PLAY” – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुख्य दिवशी “Ek Ghanta Khel Ke Maidan Mein” या आवाहनानुसार प्रत्येक विदयार्थ्याला किमान एक तास मैदानी खेळ अथवा शारीरिक उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे. यासाठी –

  • प्रत्येक वर्गासाठी एक खेळ/क्रिडा प्रकार निश्चित करणे.
  • खो-खो, कबड्डी, लगोरी, पिडू यांसारख्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे.
  • शिक्षक विरुद्ध विदयार्थी मैत्रीपूर्ण सामने आयोजित करणे.
  • धावणे, रिले रेस, विविध क्रीडा स्पर्धा व साधे शारीरिक उपक्रम आयोजित करणे.
  • विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी शक्य असल्यास क्रिडा पोशाख परिधान करावा.
  • मुली, दिव्यांग विदयार्थी तसेच सर्व वयोगटातील विदयार्थ्यांचा समावेशक सहभाग सुनिश्चित करावा.

 दिनांक ३० ऑगस्ट २०२६ – “MOVE” – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या समारोपाच्या दिवशी “Sundays on Cycle” विशेष उपक्रमांतर्गत सायकल रॅली/सायकलिंग, वॉकथॉन, रन-अँड-राईड इत्यादी उपक्रम स्थानिक परिस्थितीनुसार आयोजित करावेत. या उपक्रमांमध्ये रस्ता सुरक्षा, हेल्मेटचा वापर व स्थानिक वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

CTET Exam 2026 फ्रॉम भरण्यास संधी...


 *📌CTET सप्टेंबर २०२६*: परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


📍 *ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.*


अर्ज करण्याची नवीन तारीख: २५ ऑगस्ट – ०१ सप्टेंबर २०२६


ज्या पात्र उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता अर्ज करू शकतात. 


ज्यांनी याआधीच यशस्वीरीत्या अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.


📌*CTET परीक्षेची सुधारित तारीख:*

अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल.

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

वंदे मातरम् गीतावर आधारित टेस्ट..

वंदे मातरम - राष्ट्रीय गीत टेस्ट

🇮🇳 'वंदे मातरम' राष्ट्रीय गीत - विशेष टेस्ट

इतिहास, रचना आणि संविधानात्मक दर्जा - २० प्रश्न

✅ अचूक उत्तरांची यादी:

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाऊनलोड करा...

खालील लिंक वर जाऊन  सेल्फी विथ तिरंगा हा फोटो अपलोड करा 

लिंक मध्ये दिलेल्या आपली माहिती अचूक भरा 

व शेवटी सबमिट करा सर्टिफिकेट व व्हिडिओ डाऊनलोड करा..


 https://harghartiranga.com/selfie

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आधारित प्रश्नमंजुषा

रवींद्रनाथ टागोर - ऑनलाईन टेस्ट

रवींद्रनाथ टागोर ऑनलाइन टेस्ट

घटक: जीवन, साहित्य आणि कार्य (२० प्रश्न)

१. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार मिळाला?
२. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला?
३. नोबेल पुरस्कार मिळवणारे रवींद्रनाथ टागोर हे खालीलपैकी कोणते पहिले व्यक्ती होते?
४. रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे नाव काय आहे?
५. भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' ची रचना कोणी केली आहे?
६. भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या देशाचे राष्ट्रगीत (अमार शोनार बांग्ला) टागोरांनी लिहिले आहे?
७. ब्रिटिश सरकारने रवींद्रनाथ टागोरांना कोणती पदवी (Kighthood) दिली होती, जी त्यांनी नंतर परत केली?
८. टागोरांनी आपली 'नाईटहूड' (Knighthood) पदवी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ त्यागली?
९. रवींद्रनाथ टागोरांना 'गुरुदेव' ही पदवी कोणी दिली होती?
१०. रवींद्रनाथ टागोरांचा जन्म कोठे झाला होता?
११. रवींद्रनाथ टागोरांनी वयाच्या कितव्या वर्षी चित्रांकनाला (Painting) सुरुवात केली?
१२. टागोरांच्या संगीत आणि गायन शैलीला काय म्हणून ओळखले जाते?
१३. 'काबुलीवाला' या प्रसिद्ध लघुकथेचे लेखक कोण आहेत?
१४. १९०५ च्या बंगालच्या फाळणीदरम्यान टागोरांनी ऐक्याचे प्रतीक म्हणून कोणता सण साजरा करण्याचे आवाहन केले होते?
१५. रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांचे नाव काय होते जे ब्राह्मो समाजाचे नेते होते?
१६. 'घर बायरे' (Home and the World) ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली आहे?
१७. टागोरांच्या 'गीतांजली' च्या इंग्रजी आवृत्तीची प्रस्तावना (Introduction) कोणी लिहिली होती?
१८. महात्मा गांधींना 'महात्मा' ही पदवी सर्वप्रथम कोणी दिली असे मानले जाते?
१९. रवींद्रनाथ टागोरांचे टोपणनाव (Pseudonym) काय होते, ज्या नावाने त्यांनी सुरुवातीला कविता लिहिल्या?
२०. रवींद्रनाथ टागोरांचा जन्म दिवस (७ मे १८६१) पश्चिम बंगालमध्ये कोणत्या नावाने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो?

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

व्यसनमुक्ती आधारित प्रश्नमंजुषा टेस्ट..

तंबाखू मुक्ती व व्यसनमुक्ती ऑनलाईन टेस्ट

तंबाखू मुक्ती व व्यसनमुक्ती ऑनलाईन टेस्ट

घटक: तंबाखूचे दुष्परिणाम व व्यसनमुक्ती संस्था (२० प्रश्न)

१. तंबाखूमध्ये असणारा कोणता विषारी घटक व्यसन जडण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतो?
२. दरवर्षी 'जागतिक तंबाखूविरोधी दिन' (World No Tobacco Day) कधी साजरा केला जातो?
३. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र' (Muktangan) ची स्थापना कोणी केली?
४. सिगारेट आणि तंबाखू उत्पादने कायदा (COTPA) भारतात कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
५. तंबाखू सेवनामुळे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या अवयवाचा कर्करोग (Cancer) होतो?
६. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाद्वारे चालवला जाणारा राष्ट्रीय तंबाखू सोडण्याचा हेल्पलाइन क्रमांक (National Quitline Number) कोणता आहे?
७. जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) तंबाखू नियंत्रणासाठीचा कोणता जागतिक करार प्रसिद्ध आहे?
८. 'परिवर्तन' (Parivartan Trust) ही मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणारी संस्था कोठे स्थित आहे?
९. दुसऱ्या व्यक्तीने ओढलेल्या सिगारेटच्या धुराचा श्वासावाटे होणारा त्रास म्हणजे काय?
१०. अल्कोहोलिक निनावी (Alcoholics Anonymous - AA) ही संस्था प्रामुख्याने कशासाठी कार्यरत आहे?
११. राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन (International Day Against Drug Abuse) कधी पाळला जातो?
१२. तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर किती टक्के भागात वैधानिक इशारा व चित्र असणे कायद्याने बंधनकारक आहे?
१३. भारतातील 'निमहॅन्स' (NIMHANS) ही व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्यावरील सर्वोच्च संस्था कोठे आहे?
१४. तंबाखू सोडण्यासाठी वैद्यकीय उपचारात वापरल्या जाणाऱ्या थेरपीला काय म्हणतात?
१५. 'सर्च' (SEARCH) या संस्थेद्वारे गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू मुक्तीसाठी कोणी मोठे आंदोलन उभारले?
१६. COTPA कायद्याच्या कलम ६ नुसार शैक्षणिक संस्थेच्या किती मीटर परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे?
१७. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्यसनमुक्ती मोहिमेचे नाव काय आहे?
१८. धुम्रपानामुळे रक्तातील ऑक्सिजन वहन क्षमता कमी होण्याचे मुख्य कारण कोणता वायू आहे?
१९. 'क्रॅडल्स' किंवा पुनर्वसन केंद्रांमध्ये व्यसनमुक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या समुपदेशन पद्धतीला काय म्हणतात?
२०. किती वर्षांखालील अल्पवयीन व्यक्तीला तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे?

बुधवार, २९ जुलै, २०२६

Short form and long from test computer

संगणक - शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म टेस्ट

संगणक (Computer) ऑनलाइन टेस्ट

घटक: शॉर्ट फॉर्म व फुल फॉर्म (२० प्रश्न)

१. CPU चा पूर्ण विस्तार (Full Form) काय आहे?
२. RAM चा पूर्ण विस्तार काय आहे?
३. ROM चा पूर्ण विस्तार काय आहे?
४. HTTP चा पूर्ण विस्तार काय आहे?
५. USB चा पूर्ण विस्तार काय आहे?
६. URL चा पूर्ण विस्तार काय आहे?
७. LAN चा पूर्ण विस्तार काय आहे?
८. WAN चा पूर्ण विस्तार काय आहे?
९. PDF चा पूर्ण विस्तार काय आहे?
१०. IP चा पूर्ण विस्तार काय आहे?
११. Wi-Fi चा पूर्ण विस्तार काय आहे?
१२. ALU चा पूर्ण विस्तार काय आहे?
१३. DVD चा पूर्ण विस्तार काय आहे?
१४. GUI चा पूर्ण विस्तार काय आहे?
१५. HTML चा पूर्ण विस्तार काय आहे?
१६. SSD चा पूर्ण विस्तार काय आहे?
१७. BIOS चा पूर्ण विस्तार काय आहे?
१८. VPN चा पूर्ण विस्तार काय आहे?
१९. ISP चा पूर्ण विस्तार काय आहे?
२०. SIM चा पूर्ण विस्तार काय आहे?

संगणक क्षेत्र आधारित शब्द संक्षेप टेस्ट

संगणक ज्ञान - ऑनलाईन टेस्ट

संगणक (Computer) ऑनलाइन टेस्ट

घटक: संगणकाची मूलभूत माहिती (२० प्रश्न)

१. संगणकाचा मेंदू (Brain of Computer) कशाला म्हटले जाते?
२. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस (Input Device) आहे?
३. RAM चा पूर्ण विस्तार (Full Form) काय आहे?
४. १ किलोबाईट (1 KB) म्हणजे किती बाइट्स (Bytes)?
५. संगणकाचा जनक (Father of Computer) कोणाला मानले जाते?
६. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम (Operating System) नाही?
७. कट (Cut) करण्यासाठी कोणती शॉर्टकट की (Shortcut Key) वापरली जाते?
८. WWW चा पूर्ण विस्तार (Full Form) काय आहे?
९. डेटा कायमस्वरूपी (Permanent) साठवण्यासाठी काय वापरले जाते?
१०. संगणकातील सर्वात लहान डेटाचे एकक (Smallest Unit) कोणते?
११. खालीलपैकी कोणते आऊटपुट डिव्हाइस (Output Device) आहे?
१२. ROM चे पूर्ण रूप काय आहे?
१३. URL चा पूर्ण विस्तार (Full Form) काय आहे?
१४. ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो?
१५. कॉपी (Copy) केलेल्या डेटाची माहिती कोठे साठवली जाते?
१६. भारत सरकारने तयार केलेला पहिला सुपरसंगणक (Supercomputer) कोणता?
१७. कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये IP चा अर्थ काय?
१८. सर्व सिलेक्ट (Select All) करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात?
१९. संगणकाला नुकसान पोहोचवणाऱ्या दुष्ट प्रोग्रामला काय म्हणतात?
२०. १ गीगाबाईट (1 GB) म्हणजे किती मेगाबाईट (MB)?

लोकप्रिय पोस्ट