मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

राष्ट्रीय क्रीडा दिन..2026

 क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना व निरोगी जीवनशैली याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ हा दिनांक २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत "Khelega Bharat, Jeetega Bharat" या संकल्पनेखाली साजरा करण्यात येणार आहे.






दिनांक २८ ऑगस्ट २०२६ – TRIBUTE” – मेजर ध्यानचंद व भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाला अभिवादन करण्यासाठी पुढीलपैकी योग्य उपक्रम आयोजित करावेत

  • मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली/अभिवादन करणे.
  • विदयार्थ्यांकडून विविध क्रीडा प्रकारांशी संबंधित “29 Challenge” राबविणे.
  • “Pass the Ball Challenge” आयोजित करणे.
  • विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये “Sports Bandhan” उपक्रम राबविणे.
  • भारतीय क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडू व स्थानिक क्रीडा व्यक्तिमत्वांची माहिती विद्यार्थ्यांना देणे.
  • उपलब्ध डिजिटल साहित्याचा वापर करून राष्ट्रीय क्रीडा दिनाबाबत जनजागृती करणे.

 दिनांक २९ ऑगस्ट २०२६PLAY” – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुख्य दिवशी “Ek Ghanta Khel Ke Maidan Mein” या आवाहनानुसार प्रत्येक विदयार्थ्याला किमान एक तास मैदानी खेळ अथवा शारीरिक उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे. यासाठी –

  • प्रत्येक वर्गासाठी एक खेळ/क्रिडा प्रकार निश्चित करणे.
  • खो-खो, कबड्डी, लगोरी, पिडू यांसारख्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे.
  • शिक्षक विरुद्ध विदयार्थी मैत्रीपूर्ण सामने आयोजित करणे.
  • धावणे, रिले रेस, विविध क्रीडा स्पर्धा व साधे शारीरिक उपक्रम आयोजित करणे.
  • विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी शक्य असल्यास क्रिडा पोशाख परिधान करावा.
  • मुली, दिव्यांग विदयार्थी तसेच सर्व वयोगटातील विदयार्थ्यांचा समावेशक सहभाग सुनिश्चित करावा.

 दिनांक ३० ऑगस्ट २०२६ – “MOVE” – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या समारोपाच्या दिवशी “Sundays on Cycle” विशेष उपक्रमांतर्गत सायकल रॅली/सायकलिंग, वॉकथॉन, रन-अँड-राईड इत्यादी उपक्रम स्थानिक परिस्थितीनुसार आयोजित करावेत. या उपक्रमांमध्ये रस्ता सुरक्षा, हेल्मेटचा वापर व स्थानिक वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट