अभिनेते अनंत नाग यांना फाळके पुरस्कार 2024
हंसगीते, अंकुर,मंथन, मिनचिना ओटा यांसारख्या अभिजात चित्रपटांमधून हिंदी, कन्नड चित्रपटसृष्टीत प्रभावी भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना २०२४चा दादासाहेब फाळके पुरस्कार 16 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर झाला.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला हा पुरस्कार त्यांना २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, अनेक दशकांपासून अनंत नाग यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवला आहे.
पाच दशकांच्या कारकिर्दीत विविध भाषांमधील २५०हून अधिक चित्रपटांत विविध भूमिका साकारणारे अनंत नाग यांनी रंगभूमीही गाजवली आहे.
राजकारणातही सक्रिय राहिलेले आणि कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले अनंत नाग यांनी कोकणी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये नाटकांमध्ये कामे केली आहेत.
१९७३ मध्ये कन्नड चित्रपट 'संकल्प'मधून नाग यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अंकुर, निशांत, मंथन, भूमिका, कोंडुरा, कलयुग आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in