*वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026*
*नावनोंदणी व अर्हता*
१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in
या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.
२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२६ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२६ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे
तथापि काही शिक्षक, मुख्याध्यापक हे दिनांक ०१.०५.२०२६ ते ३०.०४.२०२७ या कालावधीत १२ वर्षे २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत होणार आहेत फक्त असे शिक्षक मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करु शकतात,
४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २९.०४.२०२६ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in