१७ ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १६६२: इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याने डंकर्क शहर फ्रान्सला विकले.
* १९३३: अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतून पळून अमेरिकेत आले.
* १९५६: जगातील पहिले अणुऊर्जा केंद्र एलिझाबेथ दुसरीने इंग्लंडच्या कंब्रिया प्रांतातील सेलाफील्ड येथे सुरू केले.
* १९७३: सिरीयाविरुद्ध इस्रायलला मदत केल्याबद्दल ओपेकने पाश्चात्य देशांना खनिज तेल विकणे बंद केले.
* २००३: तैपेईमध्ये १०१ मजली तैपेई १०१ या जगातील त्यावेळच्या सर्वात उंच इमारतीचे (शांघायमधील वर्ल्ड फायनान्शियल सेंटरच्या बांधकामामुळे आता दुसऱ्या क्रमांकावर) बांधकाम पूर्ण झाले.
जन्म:
* १८१७: सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
* १८६९: भास्करबुवा बखले, हिंदुस्तानी गायक-संगीतकार, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू.
* १९४९: प्रमोद महाजन, भारतीय जनता पक्षाचे नेते.
* १९६०: डियेगो माराडोना, अर्जेंटिनाचा फुटबॉल खेळाडू.
* १९६२: कोर्टनी वॉल्श, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
* १९६५: अरविंद डि सिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
* १९७०: अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९७१: ज्योतीर्मय सिकदर, भारतीय धावपटू.
* १९७२: एकॉन, अमेरिकन गायक.
* १९७७: सिमोना फुल्लर, ऑस्ट्रेलियन जलतरणपटू.
मृत्यू:
* १७०८: गुरू गोबिंद सिंग, शिखांचे दहावे गुरू.
* १८८२: दादोबा पांडुरंग तर्खडकर, मराठी व्याकरणकार आणि समाजसुधारक.
* १८८७: गुस्ताव कर्चॉफ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
* १९६७: फू-यी, शेवटचा चिनी सम्राट.
* १९८१: कन्नदासन, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तमिळ कवी आणि गीतकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in