16 ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला.
* १९१६: मार्गारेट सॅंगरने प्लॅन्ड पेरंटहूड या संस्थेची स्थापना केली.
* १९२३: वॉल्ट डिझ्नीने आपला भाऊ रॉय डिझ्नीबरोबर द वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली.
* १९५१: पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान लियाकत अली खानची रावळपिंडीमध्ये हत्या.
* १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चंद्रपूर येथे आपल्या सुमारे ३ लक्ष अनुयायांसोबत तिसऱ्यांदा नवयान बौद्ध धम्मात प्रवेश.
* १९७८: जॉन पॉल दुसरा पोपपदी.
* १९९१: कायलीन, टेक्सास येथे जॉर्ज हेनार्डने एका हॉटेलात अंदाधुंद गोळ्या चालवून २३ लोकांना ठार मारले व २० जखमी केले.
* १९९६: ग्वाटेमाला सिटीतील एस्तादियो मातियो फ्लोरेस या ३६,००० लोकांच्या क्षमतेच्या स्टेडियममध्ये ४७,००० लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. चेंगराचेंगरीत ८४ ठार, १८० जखमी.
जन्म:
* १८५४: ऑस्कर वाईल्ड, आयरिश लेखक.
* १९६२: मंजुळा पद्मनाभन, भारतीय पत्रकार आणि लेखिका.
मृत्यू:
* १९५१: लियाकत अली खान, पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.
* २०२०: प्रदीप घोष, बंगाली प्रस्तोता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in