15 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १६६२: इंग्लंडमध्ये 'रॉयल सोसायटी'ची स्थापना.
* १९१६: बोईंग कंपनीची स्थापना.
* १९२६: मुंबईत बस सेवा सुरू झाली.
* १९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेची सुरवात.
* २००६: ट्विटरची स्थापना.
* २०२०: बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.
जन्म:
* १९०३: के. कामराज, तामिळ नाडूचे २रे मुख्यमंत्री व स्वातंत्र्यसेनानी.
* १९०४: मोगुबाई कुर्डीकर, जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका.
* १९३२: नरहर कुरुंदकर, विद्वान, टीकाकार आणि लेखक.
* १९३३: एम. टी. वासुदेवन नायर, भारतीय लेखक आणि पटकथालेखक.
* १९३५: भगीरथ प्रसाद त्रिपाठी, भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी.
* १९३७: श्री प्रभाज जोशी, भारतीय पत्रकार.
* १९४९: माधव कोंडविलकर, दलित साहित्यिक.
* १९९२: वैशाली टक्कर, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू:
* १९५८: नुरी अल-सैद, इराक देशाचे ८वेळा पंतप्रधान.
* १९६७: बालगंधर्व, गायक व नट.
* १९७९: गुस्तावोदियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष.
* १९९१: जगन्नाथराव जोशी, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक.
* १९९८: ताराचंद परमार, स्वातंत्र्यसैनिक.
* १९९९: इंदुताई टिळक, सामाजिक कार्यकर्त्या.
* १९९९: जगदीश गोडबोले, पर्यावरणवादी लेखक.
* २००४: बानू कोयाजी, कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏