14 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १७८९: पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला.
* १८५३: न्युझीलंडमध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
* १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी 'डायनामाईट' या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
* १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या.
* १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातून काढुन टाकल्या.
* १९७६: कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
* २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
* २०१३: डाक व तार विभागाची १६० वर्षांपासून सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.
जन्म:
* १८५६: गोपाळ गणेश आगरकर - लोकमान्य टिळकांचे सहकारी व 'केसरी'चे पहिले संपादक.
* १९२०: शंकरराव चव्हाण - केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
मृत्यू:
* १९६३: स्वामी शिवानंद सरस्वती - योगी व आध्यात्मिक गुरू.
* १९७५: मदनमोहन - संगीतकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏