राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम (National Tele Mental Health Programme - Tele-MANAS) हा भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा उपक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सर्व नागरिकांना मोफत, गोपनीय आणि 24x7 मानसिक आरोग्य समुपदेशन सेवा दूरध्वनीद्वारे उपलब्ध करून देणे हा आहे. हा कार्यक्रम 10 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्यात आला.
महत्त्वाची माहिती:
- हेल्पलाईन क्रमांक: 14416 किंवा 1800-89-14416
- सेवा: 24 तास, आठवड्याचे 7 दिवस
- सेवा: अनेक भारतीय भाषांमध्ये, त्यात मराठीचाही समावेश आहे.
- समुपदेशन, मानसिक तणाव, चिंता, नैराश्य, परीक्षा तणाव, कौटुंबिक समस्या यांसाठी मदत उपलब्ध आहे. आवश्यक असल्यास तज्ज्ञांकडे पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जाते.
विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे आपल्या समस्या सदर हेल्पलाइन क्रमांक वर दूरध्वनीद्वारे सांगाव्यात तसेच मनात असणाऱ्या शंका विचाराव्यात आणि आपल्या समस्येविषयी मदत घ्यावी व दुसऱ्यांनाही मदत घेण्यास सांगावे
टेली मानस हेल्पलाइनवर दूरध्वनी केल्यावर आपण दिलेली माहिती पूर्णतः गोपनीय राहते..
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in