मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, ७ मे, २०२६

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ निकालाबाबत..

 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ निकालाबाबत


मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०८ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.


1. https://results.digilocker.gov.in


2. https://mahahsscboard.in


3. https://sscresult.mkcl.org


4. https://results.targetpublications.org


5. https://results.navneet.com


6. https://www.tv9marathi.com


7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results.


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट