101 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी भूषवणार आहेत. नाट्य परिषद नियामक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत संमेलनाध्यक्ष म्हणून मोहन जोशी यांच्या नावाची एकमताने निवड झाली.
शतकोत्तर ऐतिहासिक नाट्यसंमेलन बोरिवली येथे होणार आहे.
मोहन जोशी यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत आपला ठसा उमटवला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. आता नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना मिळाला आहे.
101 वे नाटय़संमेलन मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात बोरिवली येथे होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in