. *╭══════════════╮*
*✍️ HAPPY THOUGHTS*
*╰══════════════╯*
*✍️ प्रा. एस. एम. पाटील :*
*देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)*
*स्वतःवर विश्वास ठेवलात, तर एक दिवस जग तुम्हाला आदराने सलाम करेल. सत्याच्या वाटेवर एकटंच चालावं लागतं, जीवन हे नेहमी सरळ रेषेत चालत नाही. काही प्रसंग आपल्याला आतून हलवून टाकतात. आपल्यावर अन्याय होतो, आपल्याला किंमत दिली जात नाही, कधी कधी जाणीवपूर्वक आपला अपमान केला जातो. अशावेळी मनात वादळ उठतं.*
*माणूस दोन मार्गांपैकी एक निवडतो. एक तर तो गप्प बसतो, तडजोड करून परिस्थिती निभावतो, किंवा मग ठामपणे उभा राहतो आणि स्वतःलाच वचन देतो. जिथे माझी किंमत नाही, तिथे मी पाऊल ठेवणार नाही.*
*हा निर्णय सोपा नसतो. कारण समाजाला आपली शांतता, आपली शरणागती आवडते. पण जेव्हा आपण ठाम भूमिका घेतो तेव्हा लोक आपल्याला वेगवेगळ्या लेबलांनी हिणवतात,*
*हा खूप बोलतो, दात आलेत याला. हिला/याला शिंग फुटलीत, ही/हा कट्टर आहे, याच्यात हिच्यात अहंकार आहे, गर्विष्ठ आहे, वगैरे वगैरे,*
*स्वाभिमान जपणं म्हणजे कुणाचा अपमान करणं नव्हे तर तो आपल्या आत्मसन्मानाचा प्रश्न असतो. लोकं स्वतःच्या खोट्या इगोला योग्य वागणे समजतात आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वाभिमानाला अहंकार,*
*कधी कधी परिस्थिती इतकी टोकाला जाते की मनातून आवाज येतो, "देव आणि मी पाहू काय ते. माझं वागणं चुकीचं नाही तर मी कुठेही नतमस्तक होणार नाही". हा आवाज तुमचं मार्गदर्शन करतो. कारण स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच खरं आध्यात्म आहे.*
*सत्य बोलणारे, स्पष्टवक्ती माणसे अनेकदा एकटी पडतात. त्यांच्याबद्दल लोक पाठीमागे बोलतात, अफवा पसरवतात, त्यांचं चुकीचं चित्र रंगवतात. पण कसं आहे,*
*"लोकांच्या जीभा लांब असतात, परंतु वेळेचा हात त्याहून लांब असतो"*
*सत्याच्या वाटेवर चालणं कठीण असलं तरी शेवटी मनाला ते समाधान देणारं असतं. हो, कधी कधी डोळ्यात पाणी येतं, काळीज पिळवटून दुःख होतं, पण आतून ताकद वाढत जाते.*
*"एकटं पडणं म्हणजे हरवणं नाही, कधी कधी तेच स्वतःला सापडणं असतं"*
*जे लोक अन्याय करतात, खोटं बोलतात, ते थोड्या काळासाठी यशस्वी होतात. पण वेळ ही सर्वात मोठी न्यायाधीश आहे. खोटं कितीही जोरात बोललं तरी त्याचं अस्तित्व कमी वेळाचं असतं.*
*अशा वेळी आपलं काम इतकंच असतं की रागात न वाहवत जाता योग्य मार्गावर राहणं, शांतपणे पण ठामपणे आपली बाजू मांडणं, स्वतःच्या मनाचा, आत्मसन्मानाचा आवाज ऐकणं.*
*"सत्य लपवलं जाऊ शकतं, पण ते कायमचं दडपलं जाऊ शकत नाही"*
*स्वाभिमान जपणं म्हणजे एकाकी होणं नसतं, तर स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहणं आहे.*
*शेवटी एकच, जग तुमच्यावर बोट ठेवेल, पण तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवलात, तर एक दिवस जग तुम्हाला आदराने सलाम करेल.*
*┈┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉┈*
*𝐇𝐚𝐯𝐞 𝐀 𝐍𝐢𝐜𝐞 𝐃𝐚𝐲•─╼⃝𖠁*
*✥●⊱✧⊰●☬ॐ☬●⊱✧⊰●✥*
*‼️🌹सुप्रभात🌹‼️*
*✒️ प्रविण सरवदे, कराड,*
🍃🍂🌷🙏🌷🍂🍃
*┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉*
*अनोळखी, अनोखी म्हणत असताना,*
*अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे*
*म्हणजे मैत्री,*
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
*आनंदी रहा..! समाधानी रहा..!!*
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
┊ ┊ ┊ ┊ 🍃
┊ ┊ ┊ 🍃 💛
┊ ┊ 🍃 💚
┊ 🍃 ❤
🍃 💙
🧡
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in