आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे (वय ८३, रेवंता अपार्टमेंट, राजाराम रायफल्स परिसर) यांचे 17 सप्टेंबर 2025 निधन झाले.
अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर ते भाभा अणुसंशोधन केंद्रात रुजू झाले. अणुविज्ञान व अभियांत्रिकीचे एक वर्षाचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. सुरुवातीला त्यांनी 'फास्ट ब्रीडर रिॲक्टर'च्या डिझाईनवर काम केले. ते, १९६९-७० मध्ये फ्रान्समधील 'सेंटर दि इटुडेस न्यूक्लिअर' येथे प्रतिनियुक्तीवर होते. १३ एमडब्ल्यूच्या फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर (एफबीटीआर) डिझाईन टीमचे ते सदस्यही होते. त्यांनी एफबीटीआरचे अनेक तांत्रिक अडथळे दूर केले. ते एप्रिल २००४ मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते कसबा सांगाव येथील शेती व्यवसायात रमले होते.
त्यांनी विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना २००३ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवले होते. याशिवाय विविध संस्था, संघटनांच्यावतीने त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी काही काळ शिवाजी विद्यापीठात शैक्षणिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे
.
मेक इन इंडिया'चे शिल्पकार
भारतात 'फास्ट ब्रीडर रिॲक्टर टेक्नॉलॉजी' ही 'मेक इन इंडिया' पूर्वीची खऱ्याअर्थाने स्वदेशी उपलब्धी ठरली आहे. त्याचे मुख्य शिल्पकार डॉ. भोजे होते. त्यांच्या कार्यामुळेच आज भारत पीएफबीआर व थोरियम आधारित रिॲक्टरच्या दिशेने वाटचाल करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in