मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

संवर्ग 4 शिक्षक बदली 2025 साठी उपयुक्त माहिती

 *✳️बदली पात्र व 1 युनिट शंका समाधान* 

*संजय नागे दर्या.अमरावती*

*9767397707*


*दि. 4 ऑगस्ट 2025*

*संपुर्ण बदली प्रक्रियेसंबधी काही शंका किंवा अडचणी येत असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता*


*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया 2025..संपलेली असून बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या  CEO लॉगिन ला प्राप्त  झालेल्या आहेत काही वेळातच बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात येईल* 


*संवर्ग 4 साठी सुधारित रिक्त पदांची यादी  आज दुपार पर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर लगेच संवर्ग 4 करिता अर्ज भरण्यासाठी सुविधा मंगळवारी सुरू होणार आहे.*


*✳️ बदली पात्र शिक्षकांना 1 युनिट मध्ये फॉर्म भरताना येणाऱ्या शंका व समाधान*


*(सध्या परिस्थितीत बदली प्रक्रिया ही 18 जून 2024 च्या शासन आदेशानुसार होत असून शासन आदेशातील भाषा ही संदिग्ध असते त्यामुळे शासन आदेशातील प्रत्येकच मुद्द्याचा शब्दशः अर्थ लावू नये)*


*➡️ 1) प्राधान्य क्रम भरताना घाई करू नये कारण प्राधान्यक्रम भरण्याकरिता 4 दिवस दिलेले आहे आपण असलेल्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करूनच प्राधान्यक्रम भरावा*


*➡️ 2) बदली पात्र शिक्षकांना 30 किंवा पोर्टलवर 30 पेक्षा कमी असल्यास तेवढे प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील*


*➡️ 3) 1 युनिट चा लाभ घेताना पती-पत्नी जिल्हा परिषदेचे शिक्षक असून दोघांमधील अंतर 30 किलोमीटर असणे अनिवार्य आहे* 


*➡️ 5) परंतु अशा पती पत्नीला 1 युनिट मधून बदली घ्यायची नसेल तर 1 युनिट हे अनिवार्य नाही म्हणजेच पती-पत्नी 30 किलोमीटरच्या आत असतील तरीही त्यांना एक युनिट मधून आवश्यकता नसल्यास बदली घेणे बंधनकारक नाही*


*➡️ 6)1 युनिट मधील शिक्षकांपैकी एक बदली पात्र शिक्षक आहे आणि दुसरा बदली पात्र शिक्षक नाही अशा परिस्थितीत फक्त बदली पात्र शिक्षकांलाच एक युनिट अंतर्गत फॉर्म भरावा लागतो* 


*➡️ 7)1 युनिट मध्ये फॉर्म भरताना दोघेही शिक्षक बदली पात्र असतील तर दोघांनाही फॉर्म भरावा लागतो* 


*➡️ 8)1 युनिटमध्ये 1 युनिट करिता ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यांच फॉर्म मधून दोघांनाही बदली मिळते* 


*➡️ 9)1 युनिट मधील दुसऱ्या जोडीदाराचा फॉर्म हा बदली पात्र मधून स्वतःचा वैयक्तिक फॉर्म भरावा लागतो तो सेफ्टी  (Sefty) फॉर्म असतो* 


*➡️ 10) जोडीदाराचा फॉर्म भरताना तो जोडीदाराच्या सेवाजेष्ठतेनुसार भरावा* 


*➡️ 11) 1 युनिट मधील दोन्ही फॉर्म मधील प्राधान्यक्रम हे सारखे भरण्याची गरज नाही जर आपण दोन्ही फॉर्म सारखे भरल्यास व दोघांमधील सेवाजेष्ठतेत एक वर्षापेक्षा जास्त फरक असेल तर जोडीदार विस्थापित होऊ शकतो*


*➡️ 12) वन युनिट मधून बदली देत असताना पोर्टल दोघांनाही वन युनिट मधून ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे त्याच फॉर्म मधून बदली देते जर त्याच फॉर्म मधून बदली झाली नाही तर प्रथम सेवा जेष्ठ शिक्षकाला बदली देते व नंतर आपल्या जोडीदाराचा फॉर्म त्यांच्या सेवाजेष्ठतीने तपासून त्याला बदली देते* 


*➡️ 13) वन युनिट मध्ये फॉर्म भरताना आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल तर व त्यांना वन युनिट मधून बदली मिळाली नाही तर त्याची बदली होत नाही*


*➡️ 14) वन युनिट मधून अर्ज करताना दोन पदे रिक्त आहेत अशा शाळा प्राधान्याने निवडाव्यात व उर्वरित प्राधान्यक्रमत एक पद रिक्त असलेल्या शाळा भराव्यात* 


*➡️ 15) वन युनिट मध्ये बदली करताना पोर्टल प्रथमतः दोन पदे रिक्त असणाऱ्या शाळा तपासते जर आपणास दोन पदं असणारी शाळा देता आली नाही तर एक पदाच्या शाळेतून दोघांनाही बदली देण्यात येते*


*➡️ 16) एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची अट नाही.*


*✳️ बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना येणाऱ्या शंका व समाधान*


*➡️ 1) बदली पात्र शिक्षक आपल्यापेक्षा सेवाजेष्ठ किंवा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतात*


*➡️ 2) बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या उर्वरित जागाचा प्राधान्यक्रम भरता येतो*


*➡️ 3) ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष सेवा व कार्यरत शाळेवर पाच वर्षे झाले अशा शिक्षकांच्या जिल्हा सेवाजेष्ठतेने बदल्या केल्या जातात*


*➡️ 4) बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्य क्रम भरताना आपल्या सेवा जेष्ठतेचा विचार करूनच भरावेत* 


*➡️ 5) बदली पात्र शिक्षकांना आपला प्राधान्यक्रम भरण्याकरिता 4 दिवसांचा वेळ दिलेला असतो त्या चार दिवसात आपण केव्हाही फॉर्म भरला तरीही त्याचा बदली प्रक्रियेवर कोणताही फरक पडत नाही* 


*➡️ 6) बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या सेवाजेष्ठतेने होतात* 


*➡️ 7) बदली पोर्टलवर प्रत्येक शिक्षकाचा 1 ते 30 प्राधान्यक्रम सिस्टीम तपासल्याशिवाय पुढील शिक्षकांचा प्राधान्यक्रम तपासत नाही*


*➡️ 8) बदली पात्र शिक्षकांनी शक्यतोवर विनंती पर्याय निवडूनच अर्ज करावा आपण अर्ज प्रशासकीय मध्ये भरल्यास आपण सरळ विस्थापित राऊंडमध्ये जाणार व विस्थापित राऊंडमध्ये पुन्हा आपणास आपला अर्ज प्रशासकीय मध्ये भरावा लागेल या ठिकाणी जर आपली शाळा कोणीही घेतली  नाही तर आपली बदली होणार नाही*


*➡️ 9) बदली पात्र शिक्षकांनी प्रशासकीय मध्ये अर्ज करून जर त्यांना बदली मिळाली नाही तर असे शिक्षक ज्या जिल्ह्यांमध्ये अवघड क्षेत्र आहे त्या जिल्ह्याच्या अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या यादीत समावेश होऊन त्यांची बदली टप्पा क्रमांक 7 मधून अवघड क्षेत्रात होऊ शकते* 


*➡️ 10) बदली पात्र शिक्षकांनी जर पसंती क्रम दिले नाहीत किंवा पसंती क्रम दिल्यानंतर त्यांच्या पसंतीक्रमतून बदली मिळाली नाही तर ते विस्थापित होऊन पुन्हा विस्थापित टप्प्यावर 30 शाळाचा प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देण्यात येते*


*सदर पोस्ट आपण इतर ग्रुप वर edit न करता फॉरवर्ड करावी जेणेकरून त्यांनाही फायदा होईल.*


*याबद्दल कोणतीही शंका असल्यास 9767397707 या नंबरवर आपण मला सरळ कॉल करू शकता.*

*अखिल महा. प्राथ. शिक्षक संघ अमरावती मार्गदर्शन समुह*

*धन्यवाद*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

लोकप्रिय पोस्ट