मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

शुक्रवार, ४ जुलै, २०२५

जिल्हा परिषद जालिंदरनगर शाळेची जगातील दहा सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये निवड

 https://vote.worldsbestschool.org/publicvote25/entry/2649

नक्की vote करा..

जिल्हा परिषद जालिंदरनगर शाळेची जगातील दहा सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये निवड झाली आहे. तिला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी आपल्याला आपलं मत नोंदवावाच लागतंय. श्री.दत्ता वारे सर यांनी अगदी कमी वेळात बंद पडण्याच्या अवस्थेत गेलेली ही जिल्हा परिषदेची शाळा जगाच्या top 10 शाळांमध्ये आणली आहे. तिला एक नंबर पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मताची गरज आहे. शेवटची फेरी ही पब्लिक वोटिंगवर आधारित आहे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यासाठी आपल्याला मत करावाच लागतंय.


T4 Education या जागतिक संस्थेने आयोजित केलेल्या World's Best School competition स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर ता. खेड जि. पुणे ही शाळा जगातल्या सर्वोत्तम दहामध्ये (Top 10) निवड झाली आहे.


1. निवड झालेल्या दहा शाळांपैकी ही एकमेव भारतीय व जिल्हा परिषदेची सरकारी शाळा आहे..

2. लोकसहभागातून शाळाविकास करत शाळेने हे स्थान मिळवले आहे.

3. प्रगत देशातील व खाजगी क्षेत्रातील लाखो शाळांना पाठीमागे सोडून आपली सरकारी शाळा इथपर्यंत पोहोचलेली आहे.

4. सरकारी शाळांची क्षमता सिद्ध करणारा आणि सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल आहे. 


 पब्लिक वोटिंग 

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये या दहा शाळांपैकी ज्या शाळेला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग मिळेल ती शाळा विजेती शाळा म्हणून जाहीर होणार आहे. सरकारी शाळेचे म्हणजेच पर्यायाने समाजाचे हितचिंतक म्हणून, आणि एक देशाभिमानी भारतीय म्हणून आपण या शाळेला जिंकविण्यासाठी वोटिंग करालच… परंतु केवळ एवढ्या पुरते मर्यादित न राहता आपण या चळवळीचे नेतृत्व करून आपल्या प्रभावक्षेत्रातील सर्वांचे मतदान करून घ्यावे अशी आपणास विनंती करतो. लिंक वर जाऊन मत दिल्यानंतर दुसरी महत्त्वाची स्टेप शिल्लक राहते… तुमच्या ई-मेल अकाउंट वर आलेल्या मेलवर कन्फर्म वोट केल्यावरच मतदान प्रक्रिया पूर्ण होते. सरकारी शाळा जगात सर्वोत्तम होण्यासाठी फक्त एक पाऊल शिल्लक राहिले आहे.


 सरकारी शाळा जगात सर्वोत्तम झाल्यास 

आपण केवळ एका शाळेला जिंकविण्यासाठी प्रयत्न करत नसून संपूर्ण सरकारी शाळा व भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्य व बलिष्ठ करण्याचे काम करत आहोत. आपल्याला आपल्या समाजाचे आणि देशाचे गतवैभव परत आणायचे असेल तर भारतातील एका सरकारी शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट होणे  हे स्वप्न आपल्याला प्रयत्नपूर्वक साकार करावे लागेल. त्यासाठी आपण सर्वजण आपले कर्तव्य समजून या चळवळीचे नेतृत्व करूया… एका भारतीय व सरकारी शाळेला जगात सर्वोत्तम बनवूया…


1. एका भारतीय शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखे आहे. 

2. एका सरकारी जिल्हा परिषद शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट  होणे हा क्षण आपल्या देशाच्या आणि राज्याच्या सरकारी शिक्षण व्यवस्थेसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकेल असे मला वाटते. 

3. सरकारी शाळेबाबत समाजाच्या मनातील नेहमीच्या सवयीने असलेली दुय्यम दर्जाची मानसिकता व न्यूनगंड नष्ट होऊन सर्वत्र सकारात्मक व विधायक विचार प्रवाह निर्माण होईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

लोकप्रिय पोस्ट