मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

रविवार, ८ जून, २०२५

चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज

 चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागली. जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून याकडे पाहिलं जातं. चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे. चिनाब पूलाची वैशिष्ट्यै काय आहेत जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदी आज म्हणजेच 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन


चिनाब रेल्वे ब्रिज उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचाच एक भाग आहे. या पुलाच्या निर्माणासाठी 1486 कोटींचा खर्च अपेक्षित होता. हा पूल 266 किमी प्रति तास हवेच्या गतीचा सामना करु शकतो. तसंच, 8 रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता या पूलात आहे. या पूलामुळं श्रीनगर ते कटरापर्यंतचा प्रवास तीन तासांनी कमी होणार आहे. या ब्रिजवरील पहिली यशस्वी चाचणी जून 2024मध्ये झाली होती. त्यानंतर 2025मध्ये वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. या पुलाचा पाया 2003मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी रचला होता. त्यानंतर या पुलाच्या कामासाठी 22 वर्ष लागले.

चिनाब पुलाची वैशिष्ट्यं

- चिनाब पूल जगातील सर्वात उंच पूल
- उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग
- चिनाब पूल बांधण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली
- पुलाची उंची चिनाब नदीच्या तळापासून 1,178 फूट
-आयफेल टॉवरपेक्षा चिनाब पूल उंच
-कुतुबमिनारपेक्षा चिनाब पूल 5 पट जास्त उंच
-भूकंप, जोरदार वा-याचा पुलावर कोणताही परिणाम नाही
- पुलासाठी 30 हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर
- चिनाब पुलासाठी जवळपास 15 हजार कोटी रुपये खर्च
- चिनाब पूल हा अद्भूत अभियांत्रिकीचं उदाहरण
-चिनाब पूल पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

लोकप्रिय पोस्ट