मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

रविवार, १ जून, २०२५

मिस वर्ल्ड २०२५ विजेत्या..

 

मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं बाजी मारली. मिस वर्ल्डचा मुकूट तिनं जिंकला. तर भारताच्या नंदिनी गुप्ता आठव्या स्थानी राहिल्या..

मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचं आयोजन तेलंगनातील हैदराबादमध्ये करण्यात आलं होतं. १०८ देशांच्या सौंदर्यवतींनी यामध्ये भाग घेतला होता. ज्युलिया मोर्ले या प्रमुख परीक्षक होत्या. तर बॉलीवूड अभिनेता सोनू सूद, उद्योगपती सुधा रेड्डी, माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, राणा दुगुबाती हे ज्युरी सदस्य होते.

मिस वर्ल्ड २०२५ च्या टॉप ४ मध्ये पोलंडची माजा क्लाज्दा, मार्टिनिकची ओरेली जो, एथियोपियाची हासेट डेरजे आणि थायलंडच्या ओपल सुचाता यांनी स्थान मिळवलं होतं. यात एथियोपियाची हासेट डेरेजे ही उपविजेती ठरली. तर तिसऱ्या क्रमांकावर मार्टिनिकची ओरेली राहिली. गेल्या वर्षीची मिसवर्ल्ड झेक प्रजासत्ताकची क्रिस्टीना हिने ओपलला मुकूट घातला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

लोकप्रिय पोस्ट