अभिनंदन...
साडेपाच तासांच्या रोलर कोस्टर लढतीत यशापयशाचे पारडे दोन्ही बाजूंनी झुकत असताना मॅरेथॉन लढतीत स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझने अव्वल मानांकित इटलीच्या जॅनिक सिनरला निर्णायक पाचव्या सेटमधील टायब्रेकरमध्ये पराभवाचा धक्का दिला आणि फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचे ग्रँडस्लॅमवर अगदी थाटात आपले नाव कोरले.
निमित्ताने टेनिस विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत एका ऐतिहासिक आणि अविश्वसनीय फायनल्सचे क्रीडा विश्व साक्षीदार ठरले. श्वास रोखून धरणार्या लढतीत अल्काराझने दोन सेटस्ची पिछाडी भरून काढत, तसेच तीन चॅम्पियनशिप पॉईंटस् वाचवत 4-6, 6-7 (4), 6-4, 7-6 (3), 7-6 (10-2) असा सनसनाटी विजय मिळवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏