मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शनिवार, १४ जून, २०२५

विश्वकरंडक नेमबाजीत सुवर्णपदक.. सुरूची सिंग 2025

भारताची १९ वर्षीय हरहुन्नरी नेमबाज सुरुची सिंग हिने मोठा पराक्रम केला. सलग तिसऱ्या विश्वकरंडक नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. भारताची गोल्डन गर्ल म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुरुचीने येथे सुरू असलेल्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये आपला सुवर्ण ठसा उमटवला. 
आज झालेल्या अंतिम सामन्यात सुरुचीने सर्वाधिक २४१.९ गुणांची कामगिरी करताना पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या फ्रान्सच्या कॅमिली जेद्रजेवस्कीवर मात केली. रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या कॅमिलीने २४१.७ अशी झुंज दिली. चीनच्या याओ क्विनझुआन हिला (२२१.७) ब्राँझपदक मिळाले.

ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या मनू भाकरला हरवून राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या सुरुचीने या अगोदर ब्युनोस आर्यस आणि लिमा येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धांतही सुवर्णपदक जिंकले होते. ब्युनोस आयर्स येथील स्पर्धेत तर तिने पदार्पण केले होते.

राष्ट्रीय स्पर्धेतील फॉर्म आणि आत्मविश्वास कायम ठेवणाऱ्या सुरुचीने पात्रता फेरीत ५८८ गुण मिळवून मनू भाकरच्या राष्ट्रीय स्पर्धेतील विक्रमाशी बरोबरी केली. आजच्या स्पर्धेत ५७४ गुणच मिळवू शकलेल्या मनू भाकरला २१व्या तर पलक हिला ५७० गुणांसह ३०व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पात्रता फेरीतच बाद झालेली मनू लगेचच अंतिम फेरीसाठी समालोचक झाली आणि तिने सुरुची सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिचे गोड कौतुक केले. अंतिम सामन्यात सुरुची नर्व्हस दिसून येत होती. सुदैवाने मी सुवर्णपदक जिंकू शकले, असे मत सुरुचीने व्यक्त केले. गेल्या दोन विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या तुलनेत ही लढत संघर्षपूर्ण होती, असेही ती म्हणाली. म्युनिक येथे सुरू असलेल्या या विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट