अभिनंदन 💐💐🌹🌹🌹
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये गुलवीर सिंगने पुरुषांच्या १०,००० मीटर स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
चंद (१९७५) आणि जी लक्ष्मणन (२०१७) यांच्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर हा तिसरा भारतीय ठरला. या स्पर्धेत अविनाश साबळे, सर्वेश कुशारे, संजीवनी जाधव, प्रणव गुरव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही सहभाग घेतला आहे.
भारताचा राष्ट्रीय विक्रमधारक गुलवीरने सुरुवात चांगली केली आणि बहुतेक शर्यतीत तो पाच जणांच्या आघाडीच्या गटात राहिला. शेवटच्या फेरीत त्याने बहरीनच्या अल्बर्ट किबिची रोपला मागे टाकले आणि २८:३८.६३ वेळ नोंदवत सुवर्णपदक नावाव केले. २०२३ मधील आशियाई स्पर्धेत त्याने ५००० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. आजच्या शर्यतीत भारताचा सावन बारवाल २८:५०.५३ वेळेसह चौथे स्थान पटकावले. गुलवीरने २०२२च्या आशियाई स्पर्धेत १० हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. त्याशिवाय भारताच्या राष्ट्रीय फेडरेशन सीनियर स्पर्धेतही त्याच्या नावावर सुवर्णपदक आहे.
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏