१६ फेब्रुवारी दिनविशेष
जन्म:
* १७४५: थोरले माधवराव पेशवे - मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे.
* १८१४: तात्या टोपे - १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी.
* १८९६: सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' - हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी.
* १९५४: मायकेल होल्डिंग - वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू.
* १९५९: जॉन मॅकन्रो - अमेरिकन टेनिसपटू.
* १९७८: वसीम जाफर - भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
* १९४४: दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. त्यांच्या नावाने चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.
* १९५६: मेघनाद साहा - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. (साहा समीकरण)
* १९८०: अद्वैतसिद्धीचे प्रकांड पंडित, शिक्षणतज्ञ, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, व्याकरणकार, कोशकार, सिद्धहस्त लेखक वक्ते, प्रा. ल. रा. पांगारकर.
* २०१५: आर. आर. पाटील - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.
* २०२३: तुलसीदास बलराम - भारतीय फुटबॉलपटू.
* २०२३: जटू लाहिरी - भारतीय राजकारणी.
महत्त्वाच्या घटना:
* १६५९: जगातील पहिला धनादेश (चेक) ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला.
* १९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
* १९२३: प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.
* १९३१: उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध जाहीरनामा प्रसिद्ध केला.
* १९३७: अमेरिकन शास्त्रज्ञ वॉलेस कॅरोथर्स यांना नायलॉनचे पेटंट मिळाले.
* १९५९: फिदेल कॅस्ट्रो क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले.
* १९६०: अमेरिकन अणुऊर्जा पाणबुडी ट्रायटन पाण्याखाली जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली.
* १९६९: प्रसिद्ध उर्दू कवी मिर्झा गालिब यांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी करण्यात आले.
* १९७८: पहिली संगणक बुलेटिन बोर्ड प्रणाली (BBS) तयार करण्यात आली.
* १९८७: भारतीय नौदलाने पाणबुडीवरून पाणबुडीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आपल्या ताफ्यात समाविष्ट केले.
* १९९८: इंडोनेशियातील बालीहून निघालेले चायना एअरलाइन्सचे विमान तैवानच्या च्यांग-काइ-शेक विमानतळाजवळ कोसळले. या अपघातात विमानातील सर्व १९७ जणांसह जमिनीवरील किमान ७ जणांना आपला जीव गमवावा लागला.
* २००५: क्योटो करार लागू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏