१५ फेब्रुवारी दिनविशेष
जन्म:
* १५६४: गॅलेलिओ गॅलिली - इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ.
* १७१०: लुई (पंधरावा) - फ्रान्सचा राजा.
* १७३९: संत सेवालाल महाराज - बंजारा समाजाचे गुरु, समाजसुधारक.
* १९३४: निकलॉस विर्थ - स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते.
* १९४७: रणधीर कपूर - हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.
* १९४९: नामदेव लक्ष्मण ढसाळ - दलित साहित्यिक, कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नेते.
मृत्यू:
* १८६९: मिर्झा गालिब - उर्दू शायर.
* १९४८: सुभद्राकुमारी चौहान - हिंदी कवयित्री.
* १९५३: सुरेशबाबू माने - किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक.
* १९८०: मनोहर दिवाण - कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय.
* १९८०: कॉंम्रेड एस. एस. मिरजकर - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष.
* १९८८: रिचर्ड फाइनमन - क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्समधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक.
* २००९: महाराजा तेज सिंह प्रभाकर बहादुर - अलवरचे अंतिम शासक.
* २०२२: बप्पी लाहिरी - प्रसिद्ध संगीतकार आणि गायक.
महत्त्वाच्या घटना:
* ३९९: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
* १९३९: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर पंडित नेहरूंसह कार्यकारिणीच्या १२ सभासदांनी राजीनामे दिले.
* १९४२: दुसरे महायुद्ध - सिंगापूरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी झाले.
* १९६५: कॅनडाने आपला नवीन ध्वज स्वीकारला.
* १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.
जागतिक दिनविशेष:
* विश्व हिप्पो दिवस (World Hippo Day): जलहस्ती (Hippopotamus) या विलक्षण प्राण्याबद्दल जनजागृती निर्माण करणे व त्यांचे संरक्षण करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
ही माहिती विविध स्रोतांवर आधारित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏