११ जानेवारी: दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
* १७८७: विल्यम हर्शेलने युरेनसचे चंद्र टायटानिया आणि ओबेरॉन शोधले.
* १९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
* १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने क्वालालंपूर ताब्यात घेतले.
* १९६६: गुलझारीलाल नंदा यांनी भारताचे अंतरिम पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
* १९७२: पूर्व पाकिस्तानचे नामकरण बांगलादेश करण्यात आले.
* १९९९: केंद्र सरकारने कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम जारी केला.
* २०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
* २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
जन्म:
* १८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड - कॅनडाचे पहिले पंतप्रधान.
* १८५८: श्रीधर पाठक – हिंदी साहित्यिक.
* १८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचा व्हॉइसरॉय.
* १८९८: वि. स. खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक.
* १९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री.
* १९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका.
* १९७३: राहुल द्रविड – भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
* १८७४: गेल बोर्डन – आटवलेल्या दुधाचे शोधक.
* १९२८: थॉमस हार्डी – इंग्रजी कादंबरीकार.
* १९५४: सर जॉन सायमन – सायमन कमिशनचे अध्यक्ष.
* १९६६: लाल बहादूर शास्त्री – भारताचे दुसरे पंतप्रधान. (ताश्कंद येथे निधन)
* २००८: यशवंत दिनकर फडके – मराठी लेखक आणि इतिहास संशोधक.
* २००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गिर्यारोहक (शेर्पा तेन्झिंग नॉर्गे यांच्यासोबत).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏