१२ जानेवारी: दिनविशेष
राष्ट्रीय युवा दिन: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी हा दिवस भारतात 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
* १५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म.
* १७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
* १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
* १९३१: सोलापूरचे क्रांतिकारक किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापुरात 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो.
* १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची त्रिवार घोषणा केली.
* १९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन मोरारजी देसाई यांच्या हस्ते झाले.
* १९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे पहिला 'बाया कर्वे पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
* २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली.
* २०१०: हैतीमध्ये झालेल्या भीषण भूकंपात ३,००,००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.
जन्म:
* १५९८: राजमाता जिजाऊ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री.
* १८५४: व्यंकटेश बापूजी केतकर - विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद.
* १८६३: स्वामी विवेकानंद - भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे महान विचारवंत. (यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो.)
* १८९३: हर्मन गोअरिंग - जर्मन नाझी नेता.
* १९४९: पारसनाथ यादव - भारतीय राजकारणी.
* १९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका.
* १९६४: जेफ बेझोस - ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक.
* १९७३: राहुल द्रविड – भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
* १९३४: सूर्य सेन - भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे प्रसिद्ध क्रांतिकारक.
* १९७६: अगाथा क्रिस्टी - जगातील प्रसिद्ध रहस्यमय कादंबऱ्यांच्या लेखिका.
* १९९२: कुमार गंधर्व - भारतीय शास्त्रीय गायक.
* १९९७: ओ. पी. रल्हन - हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते.
* २००५: अमरीश पुरी - भारतीय सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते आणि खलनायक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏