केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने २१ प्रकारच्या दिव्यांगत्त्व प्रकारांवरील दिव्यांगत्त्व प्रमाणपत्रे उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्त्वे, कार्यपद्धती व अपिल पद्धती याबाबतच्या सविस्तर सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
२. केंद्र शासन, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिनांक ३ मार्च, २०२३ च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये, शासनाकडून दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यात आलेले आहे.
३. तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक ८ मार्च, २०२३ च्या परिपत्रकान्वये, दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र वितरण करण्याच्या प्रक्रीयेस गतिमानता येण्यास व केंद्र शासनामार्फत ठरवून दिलेले १००% ध्येय गाठण्यास तसेच महाराष्ट्र राज्याची कामगिरी उंचावण्यासाठी दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्याच्या विशेष मोहिमेस दिनांक ३० जून, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
४. सबब केंद्र / राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यासंदर्भात सविस्तर सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in