१४ एप्रिल दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १६२९: क्रिस्टियन हायगेन्स - डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म.
* १६७५: महाराणी ताराबाई भोसले - मराठा साम्राज्याच्या महाराणी यांचा जन्म.
* १८७२: अब्दुल्ला युसूफ अली - भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक यांचा जन्म.
* १८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचा जन्म.
* १९१४: शांता हुबळीकर - अभिनेत्री यांचा जन्म.
* १९१९: शमशाद बेगम - पार्श्वगायिका यांचा जन्म.
* १९१९: के. सरस्वती अम्मा - भारतीय लेखक आणि नाटककार यांचा जन्म.
* १९२२: उस्ताद अली अकबर खान - मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक यांचा जन्म.
* १९२७: द. मा. मिरासदार - विनोदी लेखक यांचा जन्म.
* १९२९: चाडली बेंडजेडीड - अल्जेरिया देशाचे ३रे अध्यक्ष यांचा जन्म.
* १९४२: मार्गारेट अल्वा - केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल यांचा जन्म.
* १९४३: रामदास फुटाणे - वात्रटिकाकार यांचा जन्म.
मृत्यू:
* १९५०: रमण महर्षी - भारतीय तत्त्वज्ञ यांचे निधन.
* १९६२: सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया - भारतीय अभियंता यांचे निधन.
* १९६३: राहुल सांकृत्यायन - इतिहासकार व बौद्ध धर्म अभ्यासक यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
* १६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यात दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
* १७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करून जंजिऱ्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
* १९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
* १९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.
* १९९५: टेबल टेनिसमध्ये सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in