३ एप्रिल दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
- १६८०: छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले.
- १९२७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले.
- १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- १९७३: मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी भ्रमणध्वनीद्वारे पहिले दूरभाषण केले.
- १९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.
- २०००: आयएनएस आदित्य ही भारतीय बनावटीची तेलपूरक नौका भारतीय आरमारात रुजू झाली.
- २०१०: पहिला आयपॅड विकायवास काढला गेला.
जन्म:
- १७८१: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म.
- १८८२: सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म.
- १८९८: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म.
- १९०३: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म.
- १९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा - ७वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ मिलटरी स्टाफ).
- १९३०: हेल्मुट कोल्ह - जर्मन चॅन्सेलर.
- १९३४: जेन गुडॉल - इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ.
मृत्यू:
- १६८०: छत्रपती शिवाजी महाराज.
- २०२४: इंदू जैन - भारतीय माध्यम उद्योजक आणि परोपकारी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in