५ जून दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
- १९४७: मार्शल योजना: अमेरिकेच्या राज्य सचिवांनी युद्धग्रस्त युरोपला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
- १९४९: ओरापिन चैयाकन यांची थायलंड देशामध्ये संसदेच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवड झाली.
- १९६७: इस्रायलच्या सीमेवर इजिप्शियन सैन्याच्या जमावाला प्रतिसाद म्हणून इस्रायलने इजिप्शियन हवाई क्षेत्रांवर अचानक हल्ले केले.
- १९६८: अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील दिवशी केनेडी मरण पावले.
- १९७२: स्वीडनमधील स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी पर्यावरणविषयक परिषद झाली.
- १९७३: पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला.
- १९७४: जागतिक पर्यावरण दिन.
- १९७५: सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
- १९७७: सेशेल्समधे उठाव झाला.
- १९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
- १९८१:
पहिल्यांदा एड्सची लक्षणे असणारे रुग्ण अमेरिकेत सापडले. - १९८४: ऑपरेशन ब्लू स्टार - सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला.
- १९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
- १९९५: बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट - पहिल्यांदा तयार केले गेले.
- १९९७: काँगो - देशात दुसरे प्रजासत्ताक राष्ट्रीय युद्ध सुरू झाले.
- २००१: उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison) - अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान
झाले. - २००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
- २००४: फ्रान्समध्ये प्रथमच दोन पुरुषांचा समलिंगी विवाह साजरा झाला.
- २०१५: मलेशिया देशात झालेल्या ६.० रेक्टर तीव्रतेच्या भूकंपाने रानौ, सबा, मलेशियात मोठ्या प्रमाणात भूस्खलनानंतर माउंट किनाबालूवर हायकर्स आणि माउंटन गाइड्ससह १८ लोकांचे निधन.
- २०२२:
चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळल्याने १५ लोकांचे निधन तर ६ जखमी. - २०२२: राफेल नदाल यांनी १४वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले.
महत्त्वाचे दिवस:
- जागतिक पर्यावरण दिन.
अधिक माहिती:
- हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in