3 जून दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
- 1947: भारताच्या फाळणीची माउंटबॅटन योजना जाहीर झाली.
- 1973: शिकागो येथील 1451 फूट उंच आणि 108 मजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्यावेळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
- 2015: घानामधील आक्रा येथील पेट्रोल स्टेशनवर झालेल्या स्फोटात किमान 200 लोकांचे निधन झाले.
- 2017: लंडन ब्रिज हल्ला - इस्लामिक दहशतवाद्यांनी आठ लोकांची हत्या केली.
- 2019: खार्तूम हत्याकांड - सुदानमध्ये सुरक्षा दल आणि जंजावीद मिलिशिया यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला, त्यात किमान 100 लोकांचे निधन झाले.
जन्म:
- 1924: एम. करुणानिधी, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री.
मृत्यू:
- 1657: विल्यम हार्वे, मानवी शरीरातील रक्ताभिसरण क्रियेचा शोध लावणारे शास्त्रज्ञ.
- 1932: दोराबजी टाटा, भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष.
- 1956: वामनराव जोशी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार.
- 1989: अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी, इराणचे सर्वोच्च नेते.
- 1990: रॉबर्ट नॉईस, इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक.
- 1997: मीनाक्षी शिरोडकर, मराठी अभिनेत्री.
- 2014: गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकारणी.
- 2016: मुहम्मद अली, अमेरिकन बॉक्सर.
इतर:
- जागतिक सायकल दिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in