21 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
* १९६२: भारत चीन सीमावाद – भारत-चीन युद्ध.
* १९७६: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या;
* १९८३: अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
* २००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्या 'वर्ल्ड कॉम' या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
* २००७: प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.
* २०१८: भारतामधील सॅनिटरी उत्पादनावरील टॅक्स सरकारने होत असलेल्या विरोधानंतर मागे घेतला.
जन्म:
* १८९९: अर्नेस्ट हेमिंग्वे – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक.
* १९१०: वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक.
* १९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म.
* १९२०: आनंद बक्षी – गीतकार.
* १९३०: डॉ. रा. चिं. ढेरे – भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक;
* १९३४: चंदू बोर्डे – भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष – पद्म भूषण.
* १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.
* १९४७: चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य.
मृत्यू:
* १९७१: सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
* १९९४: राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏