16 मार्च हा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांनी परिपूर्ण आहे. या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* 1521: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
* 1528: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
* 1649: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
* 1919: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
* 1937: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
* 1943: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
* 1945: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा 20 मिनिटांत विनाश केला.
* 1966: अमल कुमार सरकार यांनी भारताचे 8 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
* 1976: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
* 2000: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.
* 2001: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
* 1995: राष्ट्रीय लसीकरण दिवस.
* 1997: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
* 1969: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
* 1957: व्हॅनगार्ड-1 या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
जन्म:
* 1693: इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म.
* 1750: जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्षेल यांचा जन्म.
* 1751: अमेरिकेचे 4थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म.
* 1789: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म.
* 1901: भारताचे 7वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म.
* 1910: 8वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म.
* 1921: सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म.
* 1936: संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.
* 1936: चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.
* 1936: एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म.
* 1864: जोसेफ बाप्टीस्ता - भारतीय अभियंता.
* 1834: गॉटलीब डेमलर - इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक.
मृत्यू:
* 1953: मार्गारेट बॉन्डफिल्ड - युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in