blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्पर्धा परीक्षा टेस्ट 70 लहान गट गटात न बसणारी आकृती ओळखणे

केंद्रप्रमुख पदोन्नती बाबत शासन निर्णय 2024

 केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत






संदर्भ: १. शासन निर्णय क्र संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटी-१/दि.२७/९/२०२३


२. शासनाचे पत्र क्र. संकीर्ण २०२२/ प्र.क्र.८१/टिएनटी-१/दि.२४/५/२०२४


उपरोक्त विषयी संदर्भिय शासन निर्णय दि.२७/९/२०२३ नुसार आपणांस कळविण्यात येते की, केंद्रप्रमुख या

पदावरील पदोन्नतीकरिता, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्ष

अखंडित सेवा पूर्ण करणा-या उमेदवारांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी संदर्भीय शासन निर्णय दि.२७/९/२०२३ अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे. यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता सेवाजेष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. पंरतु याअनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी याबाबत शासन निर्णय दि.२७/९/२०२३ मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

🙏🙏🙏

स्पर्धा परीक्षा टेस्ट 69 लहान गट समसबंध

आंतरराष्ट्रीय योग दिन.. 2024 साजरा करणेबाबत.

 २१ जून २०२४ हा दिवस दहावा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणे बाबत.


संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. संकीर्ण ३०२६/प्र.क्र.९६/क्रीयुसे१/ दि.८ जून, २०१६


शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक २१ जून रोजी साजरा करण्यात येतो. सयुंक्त राष्ट्रसंघाने "२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी २१ जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.


आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती www.ayush.gov.in या


संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानुसार योग विषयक दिलेल्या सुचनाचे पालन करुन जिल्हयामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा च्या संयुक्त विद्यामाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात यावा.


आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी खालील सुचनाचे पालन करण्यात यावे. १. जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने योग दिनाचे आयोजन करण्यात यावे.


२. शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन सी सी नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यामध्ये सदर योग दिन साजरा करण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.


३. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाळामध्ये सदर दि नाचे आयोजन करण्यात यावे.


४. योग विषयक प्रचार व प्रसाराचे कार्य करणा-या विविध संस्था यांचे सहकार्य घेण्यात यावे. त्यांची बैठक आयोजित करुन त्यांचे नार्गदर्शक यांचे सहकार्य घेण्यात यावे.


५. मुख्य कार्यक्रमामध्ये भा. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नामांकित खेळाडू, नागरीक यांना आंमत्रित करण्यात यावे.


६. योग विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर दिनाचे महत्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात यावे,


७. दिनांक २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यशस्वीरित्या आयोजन संपन्न झालेनंतर त्याचा सविस्तर अहवाल क्रीडा संचालनालयास सादर करण्यात यावा. पेपर कात्रणे, योगा कार्यक्रमांचे करण्यात आलेले नियोजन, निश्चित केलेली स्थळे, फोटो, सहभागी युवक, युवती, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक इत्यांदी संख्या आंतरराष्ट्रीय योग दिनांचे आयोजन पुर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी दु. ३.०० वाजेपर्यंत कार्यासन १० च्या ईमेल dsysdesk१०@gmail.com वर पाठविण्यात यावी. 


 Gr download करण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा...https://drive.google.com/file/d/1Gseju_dQhlY6fehKmFxVRJZAhEZgmseS/view?usp=drivesdk




स्पर्धा परीक्षा टेस्ट 68 लहान गट शुद्ध शब्द अशुद्ध शब्द

महान विज्ञान वादी संत......नक्की वाचा

 एकदा एका ठिकानी दशक्रिया विधी चालु असतो. लोक अजुबाजुला बसलेली असतात. घरचे लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगल बोलत असतात. शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो. एका पत्रावली वर चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात. 

आणी तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथं येतो आणी भटजी कडे विनवणी करतो की 

मला खुप भुक लागली आहे. दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही 

माझ्यावर दया करा आणी समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातिल एक गोळा मला द्या . हे ऐकुन भटजी संतापतो. भटजीच बोलण ऐकुन लोक ही त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकट लेला आणी भिकारी दिसतोय म्हणुन त्याला हाकलून देतात. 

तरी पण तो माणुस परत विनवणी करतो. 

अहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणी एक गोळा द्या या गरिबाला. 

त्यावर भटजी म्हणतो यातील एक ही गोळा तुला देता येणार नाही .कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापुर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे. 

म्हातारा तरी ऐकेना !

म्हातारा म्हणतो तो माणुस आता कुठे आहे. त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोक ही तेच बोलतात. 

मग म्हातारा म्हणतो 

स्वर्ग कुठ आहे. 

भटजी म्हणतो खुप लांब आहे आणी हे बोलुन सगळे जण त्या म्हातार्याला हाकलून देतात. 


दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावर करतात मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणी नदीतील पाणी बाहेरच्या जमीनीवर हाताने फेकतो. 

सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटजी सह सगळे जण विचारतात 

ये म्हातार्या आरे काय काय वेड लागलय का काय तुला ?

हे काय करतोय? 

त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो

"बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला

पाणी नाही म्हणून पाणी देतोय. ..

लोक म्हणतात कुठ आहे शेती तुझी ?

म्हातारा म्हणतो 

अमरावतीला....

लोक म्हणतात कुठं आहे

अमरावती? 

म्हातारा म्हणतो 

खुप लांब आहे अमरावती....

लोक आणी भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात

"आरे वेड्या इथुन टाकलेले पाणी तर इथेच तर पडतय... आणी कस तुझ्या शेताला पाणी मिळेल .

यावर म्हातारा म्हणतो 

इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा

भटजी पोचवत असेल तर 

मी टाकलेल पाणी माझ्या 

शेताला का मिळणार नाही? 


हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य करुन त्या म्हातार्याच्या

पायावर डोकं ठेवतात. 


हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी झिगंराजी जानोरकर...!

एकही दिवस शाळेत न

गेलेला महान विज्ञान वादी संत गाडगेबाबा हा होता...


वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच अस नाही तर आपल्या डोक्यातील 

मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो. 

म्हणुनच म्हणतो दैववादी होण्या पेक्षा विज्ञान वादी 

व्हा नाहीतर पुढच्या पिढ्या या कायमच गुलाम आणी दरिद्री राहतील..... 


धन्यवाद .... शेअर......

विद्युत प्रवाह

 काचेची कांडी रेशमी वस्त्रावर पासली असता काचेच्या कांडीवर धन विद्युतप्रभार आणि रेशमी वस्त्रावर ऋण विद्युतप्रभार निर्माण होतात. हे प्रभार पदार्थांवर स्थिर राहतात. म्हणून स्थिर प्रभार म्हणतात.


- या स्थिर प्रभारांना बल लावून गती दिली तर प्रभारांचा प्रवाह निर्माण होईल. विद्युतप्रभारांच्या प्रवाहाला विद्युतप्रवाह म्हणतात.


कोरड्या विद्युतघटाला धन आणि ऋण टोके असतात. लहान तांब्याच्या तारांची टोके घन आणि ऋण टोकांना जोडून दुसरी टोके एका बल्बला जोडा. बल्ब प्रकाशीत होतो. कारण विद्युतघट तांब्याच्या तारांतील स्थिर ऋण प्रभारांना बल लावून गती देतो. हा विद्युतचा प्रवाह बल्बच्या फिलामेंट मधून गेल्याने ते तापून बल्ब प्रकाश देतो.

घटाने लावलेल्या बलाला विद्युतचल बल म्हणतात.


- ऋण प्रभारांना गतिमान करण्यासाठी लागणारे विद्युतचल बल विद्युतघटांच्या सहाय्याने मिळते. - साध्या विद्युतघटात विद्युतप्रवाह धन ध्रुवापासून (तांबे) ऋण ध्रुवाकडे (जस्त) वाहत जातो.


- विद्युतप्रवाह हवा तेव्हा सुरू किंवा बंद करता येतो. अशा घटास व्होल्टा घट म्हणतात. - साध्या विद्युतघटानंतर 1866 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ जॉर्ज लेकलँशे यांनी लेक्लॅशे घट बनवला.


- लेकलँशे विद्युतघटात मंगनिज डायऑक्साइड आणि कार्बन यांचे मिश्रण धन ध्रुव आणि जस्ताची कांडी ऋण ध्रुव असते.


अमोनिअम क्लोराइडच्या अल्कलीस धन आणि ऋण ध्रुव यांमध्ये ठेवतात. मँगनीज डायऑक्साइड आणि अमोनिअम क्लोराइडचा संयोग होऊन विद्युतप्रवाह मिळतो.


- कोरडा विद्युतघट आकाराने लहान असतो. त्याचा उपयोग विद्युत खेळणी, विजेरी, ट्रान्झिस्टर इत्यादींमध्ये वापरतात.


कोरड्या विद्युतघटाचे बाह्य आवरण जस्ताचे (Zn) असते, यास घटाचा ऋण ध्रुव म्हणतात. तसेच कार्बनची कांडी घटाचा धनष्ध्रुव असते. यात मैगनीज डायऑक्साइड (MnO₂) आणि ग्रॅफाइट यांचे मित्रश्रण तसेच झिंक क्लोराइड (ZnCl) आणि अमोनिअम क्लोराइड (NH,CI) यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा भरलेला असतो.


- कोरड्या घटाचे आयुष्य इतर घटांपेक्षा अधिक असते.


- ड्रिल मशीन, बगिच्यात वापरावी लागणारी यंत्रे इत्यादींमध्ये निकेल कॅडमिअम विद्युतघट वापरतात.


- निकेल कॅडमिअम घटात ऋणध्रुव कॅडमिअम असून धन ध्रुव निकेल असतो. दोघांच्या मध्ये पोटॅशिअम


हैड्रॉक्साइड (KOH) अल्कली असते.


- निकेल कॅडमिअम घट पुनः प्रभारित करता येतो.


- बटन सेल म्हणजे गुंडीच्या आकाराचा घट. घड्याळे, विद्युत खेळणी, कॅमेरा, कॅलक्युलेटर यांत बटन सेल वापरतात. बटन सेलला लिथिअम सेल असेही म्हणतात. लिथिअम सेल पुनः प्रभारित करता येत नाही. एखाद्या वाहकातून विद्युतप्रवाह वाहू लागताच तो चुंबकाप्रमाणे कार्य करतो. त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन सुईचे विचलन होते.


- चुंबकीय क्षेत्रात बदल झाला की, वेटोळ्यातून विद्युतप्रवाह वाहू लागतो. त्यास प्रवर्तित विद्युतप्रवाह म्हणतात. - चुंबकीय क्षेत्रातील बदल आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या विद्युतप्रवाहाच्या या क्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असे म्हणतात.


- (1) चुंबकाची हालचाल होत असेपर्यंतच वेटोळ्यातून विद्युतप्रवाह वाहतो.


(2) चुंबकाच्या हालचालींच्या दिशेवर विद्युतप्रवाहाची दिशा अवलंबून असते; म्हणजे चुंबक जवळ येत असतानाची दिशा, चुंबक दूर जाताना निर्माण होणाऱ्या प्रवाहाच्या दिशेच्या उलट असते.


- चुंबक आणि वाहक यांतील परस्पर हालचालींमुळे विद्युत चुंबकीय प्रवर्तन होऊन वाहकातून विद्युत प्रवाह वाहू लागतो.


- मायकेल फॅरेडेने प्रथम विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा प्रयोग केला.


- एका नालाकृती चुंबकाच्या दोन ध्रुवांच्या मधोमध गोल फिरू शकेल असे वेष्टित तारेच वेटोळे टांगा. - वेटोळ्याच्या दोन टोकांत उत्तर आणि दक्षिण ध्रुव निर्माण झाल्यामुळे वेटोळ्याचे विचलन होते. जर वेटोळ्याचा उत्तर ध्रुव नालाकार चुंबकाच्या उत्तर ध्रुवासमोर असेल, तर प्रतिकर्षण होऊन टांगलेले वेटोळे विचलित होऊन गोल फिरेल. मोटारीतील आर्मेचर म्हणजे हेच वेटोळे होय. वेटोळ्यात दर अर्ध्या फेरीनंतर वेटोळ्यातून


म्हणजेच आर्मेचरमधून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहाची दिशा बदलावी लागते. दर अर्ध्या फेरीनंतर फिरणाऱ्या वेटोळ्याला प्रवाहाची दिशा बदलण्यासाठी कळ (कॉम्युटेटर) बसवलेली असते.


विद्युत चुंबकाचे चुंबकत्व त्यांतून प्रवाह वाहत असेपर्यंतच टिकते, म्हणून विद्युत चुंबक कायम स्वरूपी चुंबक नसते.


विद्युत चुंबकात त्यातून वाहणारा प्रवाह वाढवत नेल्यास त्यातील चुंबकत्व वाढत जाते. याच गुणधर्मांमुळे मोठमोठ्या वाऱ्यांमध्ये सामान हालवण्यासाठी विद्युत चुंबकांचाच वापर करतात. उदा. विद्युत घटांवर चालणारी खेळणी.


एखादे विद्युत उपकरण विद्युत घटाला जोडतात तेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होतो. त्यासाठी घटक -


(1) विद्युतघट 


(2) विद्युत बल्ब विद्युत उपकरण


(3) वाहक तारा


(4) उघड-बंद होणारी कळ




- एकापेक्षा जास्त विद्युतघट जोडले, तर त्या जोडणीस बॅटरी म्हणतात.


- तांबे, लोखंड, अॅल्यूमिनिअम हे धातू उत्तम विद्युतवाहक आहेत.


रबर, लाकूड, कापड, प्लॅस्टिक हे विद्युतरोधक आहेत.

वातावरणीय दाब

 स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी किंवा तिची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते.

वस्तूची चाल वाढवण्यासाठी किंवा वस्तूचा आकार बदलण्यासाठी बल लावावे लागते. एखाद्या वस्तूवर जेव्हा बल लावले जाते, तेव्हा तिच्यावर होणारा बलाचा परिणाम हा बल लावलेल्या

पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जेवढे अधिक असते तेवढा बलाचा परिणाम कमी असतो.

एकक क्षेत्रफळावर लावलेल्या बलाला दाब म्हणतात.


दाब = बल/ क्षेत्रफळ


बल = दाब ×क्षेत्रफळ


. क्षेत्रफळ = बल\ दाब

बलाचे एकक न्यूटन आहे.


पृष्ठभागाचे (क्षेत्रफळाचे) एकक चौरस ...... मीटर किंवा मी आहे.


दाबाचे एकक न्यूटन प्रती मी आहे.


क्षेत्रफळ वाढवले की दाब कमी होतो. क्षेत्रफळ कमी असेल तर दाब जास्त असतो.


अणकुचीदार खिळा, शिवणकामाच्या सुया, चाकू, सुऱ्या थोड्या क्षेत्रफळावर जास्त दाब देऊन विशिष्ट


क्रिया करता येतात.


वायू किंवा द्रव हे प्रवाही पदार्थ आहेत. ते भांड्यांच्या भिंतीवर दाब देतात.


हवेचा दाब सर्व बाजूंनी सारखा असतो.


प्रवाही पदार्थ नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात.


वातावरणाला वस्तुमान असते. वातावरण पृथ्वीभोवती शेकडो किमीपर्यंत आहे.


वातावरणामुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.


वातावरणाच्या 10 से.मी. × 10 से.मी. क्षेत्रफळावर वातावरणाचे 1000 किग्रॅ एवढे प्रचंड वस्तुमान असते.


म्हणजेच 1 (एक) चौसेमीवर 10 किग्रॅ वस्तुमान असते 

हवेचा दाब सर्व बाजूंनी सारखा असतो.


हवेचा दाब वरून खाली असतो. तसेच हवेचा दाब खालून वर असतो.


सतराव्या शतकात जर्मन शास्त्रज्ञ ऑटोव्हॉनगेरिकने भांड्यातील हवा काढण्याच्या पंपाचा (1 शोध लावला.


ड्रॉपर, पिचकारी आणि सिरिंज हे एक प्रकारचे पंपच आहेत.


5 मार्च 1872 मध्ये वेस्टिंग हाउस या संशोधकाने रेल्वेसाठी प्रथमच एअर-ब्रेक वापरले.


ट्रक, बस, ट्रेलर, रेल्वे, छोटी वाहने, विमाने इत्यादींमध्ये एअर-ब्रेकचा उपयोग करतात.


आपल्या शरीरावर भोवतालच्या वातावरणाचा दाब कार्य करतो.


दाबांतील फरकामुळे द्रवपदार्थ एका भांड्यातून दुसरीकडे नेता येते

ऊर्जा स्रोत

 विद्युत ऊर्जेचे प्रकाशीय ऊर्जेत रूपांतर विजेचा दिवा लावून करता येते.


- विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर ध्वनीक्षेपकामध्ये दिसून येते.


दूध, पाणी इत्यादी गरम करण्यासाठी उष्णता ऊर्जा लागते.


ऊर्जेची रूपे भिन्न भिन्न आहेत, तरी तिचे रूपांतर एका रूपातून दुसऱ्या रूपात करता येते.


ज्या पदार्थांच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते त्यांना इंधने म्हणतात.


खूप वर्षांपूर्वी प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. त्यांचे इंधनामध्ये रूपांतर झाले. त्या


इंधनास जीवाश्म इंधन म्हणतात. लक्षावधी वर्षांच्या काळानंतर जीवाश्म इंधन निर्माण होते. म्हणून जीवाश्म


इंधनाचे साठे मर्यादित आहेत.


पृथ्वीच्या गर्भात स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांत जीवाश्म इंधन सापडते. उदा. कोळसा (स्थायू), खनिज तेल (द्रव) आणि नैसर्गिक वायू (वायूरूपात)


कोळसा हा वनस्पतींच्या अवशेषापासून, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे समुद्रातील प्राणी आणि वनस्पती यांपासून तयार झाले असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.


जीवाश्म इंधानात हायड्रोकार्बनची संयुगे सापडतात, असतात. ज्यूल हे उष्णता ऊर्जेचे एकक आहे. एक किलोग्रॅम लाकडापासून सुमारे 1700 किलो ज्यूल एवढी उष्णता मिळते.


चारकोल म्हणजे लोणारी कोळसा किंवा लाकडी कोळसा होय, लाकडाच्या अपुऱ्या हवेतील ज्वलनापासून (विना धूर) चारकोल तयार होतो.


खनिजतेल हे पृथ्वीच्या पोटात अंदाजे 25000 मीटर खोलीवर सापडते. त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि इंधन तेल मिळतात.


मुख्य स्रोतापाससून नैसर्गिक वायूचे स्थलांतर नळाद्वारे करणे आता सहज शक्य झाले आहे.


नैसर्गिक वायूचे प्रकार (1) मिथेन CH₁ (2) इथेन C₂H₄ (3) प्रोपेन C₂H₂ इ. आहेत. आपल्यासाठी सूर्य हा एकमेव ऊर्जास्रोत आहे. ही ऊर्जा प्राणी व वनस्पती शोषून घेतात. ती ऊर्जा रासायनिक


ऊर्जेच्या स्वरूपात साठवली जाते. त्यांच्या मृत्यूनंतर ती जीवाश्म इंधन स्वरूपात पुन्हा मिळते, असे हे ऊर्जाचक्र आहे.


पृथ्वीला दरवर्षी सुमारे 7×10¹² किलोवॅट एवढी सौरऊर्जा मिळते.


आपणाला आवश्यक असणारी ऊर्जा ही केवळ 40 मिनिटात सूर्य देतो.


सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा (सौर ऊर्जा) वापर सौरभट्टी, सौरतापक, अन्न शिजवणे, पाणी तापवणे किंवा गरम करणे यांसाठी करण्यात येत आहे.


सौरविद्युत घटात (सोलार सेल) सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात. उदाहरणार्थ सौरकंदील. कोळसा, तेल यांना पारंपरिक किंवा अनवीकरणीय ऊर्जास्रोत म्हणतात.


सौरऊर्जेला अपारंपरिक किंवा नवीकरण ऊर्जास्रोत म्हणतात. उदा. पवनऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, बायोगॅस, बायोडिझेल नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत,


पारंपरिक इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे.


वातावरणात सोडलेल्या वायूंमुळे आम्ल पर्जन्य (अॅसिड रेन) सारखे धोके वाढले आहेत. 

वातावरणातील ओझोन थराला छिद्रे पडून त्यांतून हानिकारक किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू लागली आहेत. - शासनाने सौरऊर्जा, पवनऊर्जा, गोबर गॅस संयंत्रासाठी आर्थिक सवलत आणि तंत्रज्ञानाच्या सोई उपलब्ध


करून दिल्या आहेत. वाढत्या ऊर्जेच्या मागणीमुळे ऊर्जा संकट भेडसावत आहे. त्यासाठी अपारंपरिक किंवा नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा


वापर करणे गरजेचे आहे.


युरेनिअमच्या अणूंवर न्यूट्रान्सचा मारा केल्यास त्यांतून अणुऊर्जा मिळते.


महाराष्ट्रात विद्युत उत्पादन तारापूरच्या अणुप्रकल्पातून सुरू झाले आहे.


सुरत जिल्ह्यात काकरापूर येथे अणुऊर्जा विद्युत प्रकल्प आहे.


इ.स. 2020 या सालापर्यंत भारत जगातली एक प्रमुख शक्ती म्हणून ओळखला जाईल.


नव्या तंत्रज्ञानावर आधारित सुधारित चुली, बर्नर्स, दिवे यांना शासन प्रोत्साहन देत आहे.

मोजमापाची प्रमाण - एकके (S.I.)

 मोजमापाची प्रमाणे 


प्रमाण - एकके (S.I.)


●लांबी - मीटर

●वेळ - सेकंद

वस्तुमान - किलोग्रॅम

●क्षेत्र - चौरस मीटर

●आवाज - क्यूबिक मीटर

●वेग - मीटर/सेकंद

●प्रवेग - मीटर/सेकंद चौरस

●घनता - किलोग्राम/मीटर घन

●कार्य - जौल

●ऊर्जा - जौल

●फोर्स - न्यूटन

●दाब - पास्कल 

●वारंवारता - हर्ट्झ

●पॉवर - वॅट

●वजन - न्यूटन किंवा किलोग्रॅम

●इम्पल्स - न्यूटन-सेकंद

●कोणीय वेग - रेडियन/सेकंद

● स्निग्धता - शांतता

●पृष्ठभागाचा ताण - न्यूटन/चौरस मीटर

● उष्णता - जौल

●तापमान - केल्विन

● पूर्ण तापमान - केल्विन

● प्रतिकार - ओम

●विद्युत प्रवाह - अँपिअर

●इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स - व्होल्ट

●विद्युत चालकता - ओहम/मीटर

●विद्युत ऊर्जा - किलो वॅट तास

●विद्युत शक्ती - किलो वॅट किंवा वॅट

●चुंबकीय तीव्रता - ओरस्टेड

●कुलॉम्ब - इलेक्ट्रिक चार्ज

●चुंबकीय प्रेरण - गॉस

● ल्युमिनस फ्लक्स - कॅंडेला

●ध्वनी तीव्रता - डेसिबल

● लेन्सची शक्ती - डायऑप्टर

●समुद्राची खोली - फॅदम

            


एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत.... मोफत गणवेश योजना 2024.

 


केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत दि.०८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील

देण्याबाबतचा शासन निर्णय दि.०६ जुलै, २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.


समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक

समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय दि.१८ ऑक्टोबर, २०२३ अन्वये देण्यात आल्या आहे. प्रस्तुत शासन निर्णयातील गणवेशाच्या रचनेच्या अनुषंगाने दि.२४ जानेवारी, २०२४ रोजी शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. स्काऊट व गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना भारत स्काऊट व गाईड, नवी दिल्ली या संस्थेने निश्चित केल्याप्रमाणे करण्याची विनंती शासनास केली होती. त्यास मान्यता मिळाल्यानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी कापड खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. तद्‌नुषंगाने मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना व योजनेच्या अंमलबजावणीबाबत नव्याने सुचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.



१. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच, स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेशाची रचना खालीलप्रमाणे राहिल.





२. मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित व स्काऊट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णय दि.८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील. तसेच, स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा. स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी (मंगळवार, गुरुवार, शनिवार) स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात याव्यात,


३. मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील शाळा दि. १५ जून, २०२४ पासून सुरू होत आहेत. महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या (स्काऊट गाईड) गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावे. सदर स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी रु.१०० प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च रु.१० असे एका गणवेशासाठी एकूण रु.११० प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वर्ग करावी. सदर निधीतून विद्यार्थ्यांना दुसरा (स्काऊट गाईड) गणवेश स्थानिक स्तरावर शिलाई करून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करुन द्यावा.


४. उपरोक्त निर्णयाप्रमाणे आवश्यक ती सर्व कार्यवाही राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या कार्यालयामार्फत करण्यात यावी.


५. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०६१०१५१३११८५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. 

 Gr डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

https://drive.google.com/file/d/1FkAtOOtwaQV9feBhCCWSSGfQOxkSqGV0/view?usp=drivesdk 

धन्यवाद..

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.