मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

लीडर Leader

 *🌳💐"लिडर" (नेतृत्व) कसा असावा...??🌳🌻💐🌹🙏*


🏆💐 *"लीडर(नेतृत्व) जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात."* 


 *💐"लीडर"(नेतृत्व) मध्ये हे खालील  गुण असणे आवश्यक आहेत.*🙏


 *💐१) दूरदृष्टी (Vision) :--* 

*लीडरने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते. त्या वातावरणातूनच तो कार्यकर्त्यांच्या हातून कार्य घडवून घेत असतो.*


*💐२) ध्येयनिश्चिती (Goals):* 

*लीडरने आपल्या पुढे काही ध्येय निश्चित केली पाहिजेत. त्या ध्येय निश्चितीनुसारच प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे.*


*💐३) आत्मविश्वास*

 *(Self Confidence) :--*

*संघटनेच्या ध्येयावर असलेला जबरदस्त विश्वास आणि निष्ठा ही नेतृत्वाची खरी शक्ती असते. आणि त्यातच खरा विजय असतो.*


*💐४) अनुशासन (Discipline):--*

*एक चांगला लीडर, एक चांगली अनुशासीत व्यक्ती असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट मीच एकटा करतो अशी भावना नसावी. स्वतः नियमांचे पालन करणे गरजेचे असते.*


*💐५) चिकाटी (Persistance):--*

*कोणत्याही कामामध्ये विजय मिळविण्यासाठी लीडरच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक असते. खचून न जाता एकाग्रतेने प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते. आणि यावरूनच लिडरची कार्यक्षमता लक्षात येते.*


*💐६) नियोजन (Planning):--*

*नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या लागतात. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्व तयारी करण्याची जबाबदारी लीडरलाच पार पाडावी लागते. तसेच सर्वांना बरोबर घेऊन जबाबदारी पार पाडावी.*


*💐७) योग्य निर्णय* 

*(Proper Judgement):--*

*लीडरला सर्वांची बाजू ऐकून , सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेतला पाहिजे. मी करतो तेच बरोबर  असा विचार असू नये.*


*💐८) धैर्य (Patience):--*

*नेतृत्व करताना लीडरला चौकटी बाहेरच्या काही गोष्टी अमलात आणाव्या लागतात. त्यासाठी नेत्याकडे धैर्य असावे लागते. घेतलेओअ निर्णय बरोबरच असल्याचे कार्यकर्त्यांना पटवून देणे आवश्यक असते.*


*💐९) जबाबदारी * *(Accept Responsibilities):--*

*नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे असले की टीमची कार्यक्षमता वाढते व कामाचे समाधान मिळते. नेतृत्व स्वीकारणे म्हणजे यश-अपयश दोन्ही स्वीकारणे.*


*💐१०) बदलाचा स्वीकार* *(Accept  changes):--*

*बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असतांना , आपल्या बदलाचा वेग मंदावला असेल तर... नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असे समजावे.*


*💐११) मार्गदर्शक व प्रशिक्षक व्हा*

*(Be A Coach & Guide):--*

*प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेच काम वाटून दिल पाहिजे. प्रसंगी मार्गदर्शन आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे. लिडरला सर्व प्रकारचे ज्ञान असणे आवश्यक आहे.*


*💐१२) आकर्षक व्यक्तिमत्व* *(Pleasing Personality):--*

*एक लीडर म्हणून तुमच्यावर , तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येय धोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी सहकाऱ्यांशी सतत संवाद राखायला पाहिजे.*


*💐१३) प्रशासनिक कौशल्य* *(Administrative skills):--*

*एक लीडर म्हणून त्याच्या जवळ प्रशासनिक कौशल्य असणे गरजेचे आहे. सर्व प्रशासकीय बाब म्हणजे पत्रव्यवहार आणि त्यातील मजकुरावर लिडरची पत समजते. प्रशासनाचे ज्ञान आत्यावश्यक आहे.*


*💐१४) संभाषण कौशल्य* *(Communication skills):*

 *एक चांगला लीडर बनण्यासाठी सर्वात मोठी कला हवी असते ती म्हणजे ध्यैर्य, भाषा, संभाषण, विचार प्रभाव, आवाज कौशल्याची क्षमता. सहका-यांना काही गोष्टी पटवून देणे महत्त्वाचे असते.*


*💐१५) निर्णय घेण्याची कला*

*(Decision making ability):--*

 *एक लीडर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता आला पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार निर्णय घेणार नाही व वरिष्ठांच्या मर्जीसाठी चापूलुसी करून निर्णय घेणारा नसावा.*


*💐१६) जोखीम घेण्याची क्षमता* 

*(Risk Taking Ability):*

*नेतृत्व करताना धैर्याबरोबरच महत्वाचा जोखीम घ्यायची तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पाहिजे.*


*💐१७) क्रिएटिव्हिटी, संशोधन आणि प्रेरक* 

*(Creativity and Innovation):*

 *हि कौशल्य लीडर मध्ये असली पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते.*


*💐१८) समस्या सोडविण्याचे कौशल्य* 

*(Problem solving skills):--*

*खऱ्या लीडरची ओळख तेव्हाच होते जेंव्हा तो आपल्या समस्यांचा सामना कसा करतो यावरूनच त्याची बुद्धिचातुर्य लक्षात येते.*


*💐१९) लवचिक आणि अनुकूल क्षमता* 

*(Flexibility And Adaptability):*

*लीडर म्हणून नेहमी लवचिक व अनुकूल राहता आले पाहिजे. शक्यतो शांत राहणे. साधी राहणी आणि उच्च विचारसारणी असावी.*


*💐२०) वेळेच्या व्यवस्थापणाचे कौशल्य* 

*(Time Management Skills):--*

*लीडरला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन केलेच पाहिजे. स्वतः वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे.*


*💐२१) लोकांना प्रोत्साहित करा* 

*( Motivate People):--*

*लीडर ने आपल्या लोकांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी विविध योजना आखाव्यात. कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासाठी अधूनमधून कार्यक्रम ठेवावे.*


*💐२२) आपण स्वतः आधी कार्यप्रवण होणे.* 

*(Lead By Example):--*

*कोणत्याही लीडर ने फक्त सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन कामाची दिशा आणि आखणी तयार करावी.*


*💐२३) टीम प्लेयर्स व्हा*

*( Be Team Players):--*

*लीडर ची प्रमुख जबाबदारी आहे की एक चांगली टीम तयार करणं आणि त्या टीमचा एक भाग बनणे.*


*💐२४) त्यागशील* *(Sacrificial) :--*

*लीडर हा त्यागशील असावा.स्वतः त्यागाची भावना ठेवून कार्यकर्त्या समोर आदर्श ठेवावा.नेहमी इतरांना संधी देणारा खरा लीडर असतो. इतरांची संधी हिसकावून घेणारा कधीच खरा स्वार्थी लीडर होऊ शकत नाही.*


*💐२५) अपयशाचा स्वीकार* *(Acceptance of failure) :--*

*यश सर्वांचे तर अपयश फक्त माझे अशा विचाराचा लीडर असावा.*


*💐२६) सामूहिक हीत* *(Collective interest) :--* *लीडरने स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष करून संघटनेचे हीत लक्षात घेऊन ध्येय, धोरण निश्चित केले पाहिजे.*


*💐२७) निःस्वार्थी (Selfless) :--* *लीडर स्वार्थी आपमतलबी व कौतुकाचा भोक्ता नसावा.*


*२८) इतरांना सन्मान देणारा* *(Respectful of others) :--* *लीडरने नेहमीच सर्व स्तरातील कार्यकर्त्यांचा व लोकांचा सन्मान केला पाहिजे. स्वतः उच्च पदावर काम करताना इतरांना आदरपूर्वक वागणूक दिली पाहिजे.*


*💐२९) लोकसंग्रह, समभाव, सत्कार्य :----* 

*लिडरने लोकांचा संग्रह करून त्यांच्यामध्ये समानतेची भावना निर्माण करून आणि मग त्यांच्या हातून सत्कार्य घडविले पाहिजे. धन्यवाद...!!*


*💐आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा  आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 


*दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व  समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.*                 


*आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा.*


*एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, लबाड, लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.*


🌹🪔🌻🌹🪔🙏🌻🌹🪔🌻🌹

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

SET EXAM 2024

 




#SET EXAM 2024* 

         *सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याची संधी ; जाणून घ्या सेट परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व संदर्भ पुस्तके*

           *★ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे आयोजित ३९ व्या सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.*

*★ सेट परीक्षेची तारीख: रविवार, दि. ०७ एप्रिल, २०२४* 

*★ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत १२ जानेवारी, २०२४ ते ३१ जानेवारी, २०२४*

*★ विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची मुदत ०१ फेब्रुवारी, २०२४ ते ०७ फेब्रुवारी, २०२४*

*★ सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन अर्ज, परीक्षेचा अभ्यासक्रम याची संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) दि. १२-०१-२०२४ पासून उपलब्ध होईल.*

*★ ऑफलाईन होणारी शेवटची सेट  परीक्षा, 2025 पासून सेट परीक्षा ऑनलाइन होणार आहे.*

       *NET/SET/PET संदर्भ पुस्तके*

     *सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ*   

          सेट परीक्षेतील पेपर पहिला हा सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान असून या पेपरच्या अधिकाधिक गुणांवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे.नेट/सेट परीक्षेच्या पॅटर्ननुसार पेपर एकसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.  

*(1)नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.शशिकांत अन्नदाते - नववी आवृत्ती (मुद्देसूद, परीक्षाभिमुख व Mind Map द्वारे मांडणी व घटकनिहाय महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न )*

(2)नेट अध्यापन एवं शोध अभियोग्यता - के.वी.एस मदान (हिंदी व इंग्रजी माध्यम)

(3)पर्यावरण - एरीक भरुचा

(4)सामाजिक संशोधन पद्धती- डॉ.प्रदीप आगलावे

(5)PET संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(चौथी आवृत्ती) (पीएच.डी प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)

(6)बुद्धिमत्ता चाचणी - के'सागर/सचिन ढवळे/अनिल अंकलगी/फिरोज पठाण

       *सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ*

     नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो.

        *सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ*

(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham

(2) A history of english literature -  e Albert

(3) English literature  - R j Rees

(4) a background to the english literature - B Prasad

(5) English literature -  Elizabeth drabble

(6) History of indian english literature - m k naik 

(7) beginning theory - Peter Berry        

(8)A critical history of english literature - David daiches  


        *सेट परीक्षा मराठी पेपर 2  संदर्भ*   

(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर

(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे

(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद

(4)अनिवार्य मराठी - के सागर

(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग

(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे

(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक

           *सेट परीक्षा हिंदी पेपर 2  संदर्भ*

(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल

(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा

(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ

(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा

(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह

(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह

(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के

(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख

(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह

(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन

         *सेट परीक्षा इतिहास पेपर 2   संदर्भ*

(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा

(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र

(3)आधुनिक  भारत- बिपीन चंद्र

(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र

(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र

(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर

(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.

(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड

(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक

(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर

(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे

(12)महाराष्ट्राचा इतिहास- 

डॉ गाठाळ


         *सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ*

(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ

(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ

(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन

(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध

(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते

(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब

(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित

(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन

(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी

(10)मानवी भूगोल -  मजीद हुसेन

(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे

(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

राजमाता जिजाऊ विशेष राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा

बाळशास्त्री जांभेकर

                 

        बाळशास्त्री जांभेकर

     दर्पणकार.

        

       जन्म : ६ जानेवारी १८१२

            (पोंभुर्ले, देवगड सिंधुदुर्ग महाराष्ट्र)

       मृत्यू : १८ मे १८४६


पेशा : पत्रकारिता, साहित्य

प्रसिद्ध कामे : दर्पण

मूळ गाव : पोंभुर्ले (देवगड तालुका, सिंधुदुर्ग)

वडील : गंगाधरशास्त्री बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.                                                                          

💁‍♂️ *जीवन*

जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.

बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता.

जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली.


त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता. गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते. अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांची तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक केली. या काळामध्ये बाळशास्त्रींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे 'दर्पण दिन' अथवा 'वृत्तपत्र दिन' म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे सुरुवातीच्या अवस्थेत निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे काम या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केलं इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतिशास्त्र या विविध विषयावरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली बाळशास्त्री वांग्मय व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये निष्णात होते गणित व ज्योतिष शास्त्र या विषयातही त्यांचा अधिकार मोठा होता त्यांनी मराठी भाषेत शून्यलदी हे पहिले पुस्तक लिहिले प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट याचे संशोधन करून त्यावर त्यांनी विद्वत्तापूर्ण लेखन केले यासंबंधीचे त्यांचे शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते


🗞️📰 *पत्रकारिता*

मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना व समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्ऱ्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंता करीत. केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. ते करायचे असेल तर समाजाचेच प्रबोधन करावे लागेल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.


६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली, तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड षेत प्रकाशित होणारे या वृत्तपत्रात अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, इ.स. १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.


दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषयांवर्चे लेखन नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्‍न केला.


🔮 *समाजकार्य*

सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बॉंबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची स्थापना जांभेकरांनी केली. 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्तानी भाषेचे अध्यापन करत. त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतीत बाळशास्त्री यांची वृत्ती ही पुरोगामी विचारांची राहिलेली आहे भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात किमान त्यांना आळा बसावा अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे विधवा पुनर्विवाह स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. त्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहून घेतला. अशा प्रकारे जांभेकरांनी जीवनवादाचा, सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तन वादाचा पाया घातला.


त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली.


बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले. बाळशास्त्रींचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत निधन झाले.


📜 *सन्मान*

‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’ ही करण्यात आले होते (१८४०).


६ जानेवारी, इ.स. १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.                                                                                                  

     

         

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

सिंधुताई सपकाळ


              *सिंधुताई सपकाळ*

               (अनाथांची माई)

     *जन्म : १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७*

     *मृत्यू : ४ जानेवारी, २०२२ (वय ७४)*

                   (पुणे, महाराष्ट्र)

मृत्यूचे कारण : हृदयाघात

राष्ट्रीयत्व : भारतीय

टोपणनावे : चिंधी

नागरिकत्व : भारतीय

पेशा : सामाजिक कार्यकर्त्या

धर्म : हिंदू

जोडीदार : श्रीहरी सपकाळ

अपत्ये : १

वडील : अभिमन्यू साठे

पुरस्कार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२), पद्मश्री पुरस्कार (२०२१)

🧕🏻 *जन्म आणि सुरुवातीचे जीवन*

सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात आणि ब्रिटीश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला. एक अवांछित मूल असल्याने, त्यांचे नाव चिंधी ("फाटलेल्या कापडाचा तुकडा") ठेवले.पण हीच चिंधी अनेक फाटक्या ठिगळांना जोडते याचा त्यावेळी कोणी विचार ही केला नसेल.अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली.


सपकाळ यांचे वयाच्या १२व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले, जे त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि वयाच्या २० व्या वर्षी, त्यांना त्यांच्या मुलीसोबत नवऱ्याने सोडून दिले.

🎺 *विवाह*

विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.


अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.

🔥 *जीवनातील संघर्ष*

दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.

🏩 *ममता बाल सदन*

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.


सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे-


बाल निकेतन हडपसर, पुणे

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा

अभिमान बाल भवन, वर्धा

गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)

ममता बाल सदन, सासवड

सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

🌐 *आंतरराष्ट्रीय पातळीवर*

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.


🪔 *मृत्यू*

दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला.


दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला.


२५ नोव्हेंबर २०२१ रोजी हॉस्पिटलमध्ये डायफ्रामॅटिक हर्निया शस्त्रक्रियेनंतर सपकाळ यांच्यावर शस्त्रक्रियेउत्तर काळजी घेण्यात येत होती.


पाच वर्षांहून अधिक काळ ग्रस्त असलेल्या डायफ्रामॅटिक हर्नियामुळे त्यांचे डाव्या बाजुचे फुफ्फुस व्यवस्थितरित्या कार्य करीत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती.


तथापि, पाच दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ८ वाजून १० मिनीटांना त्यांचे निधन झाले. पुणे येथील गॅलक्सी केर या दवाखान्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

🎖️ *पुरस्कार व गौरव*

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही :-


पद्मश्री पुरस्कार (२०२१)

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)

पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)

महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)

मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)

सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार

राजाई पुरस्कार

शिवलीला महिला गौरव पुरस्कार.

श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)

सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).

२००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)[

पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' 

पद्मश्री पुरस्कार (२०२१)

🎞️ *प्रसारमाध्यमांतील चित्रण*

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.

सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.

       



लोकप्रिय पोस्ट