मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शनिवार, २ मार्च, २०२४

खरं जीवन

 *ताटात थोड राहिल तर ठेवत जा लेकरा. . . .*


रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.

तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. 


साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.

थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.

एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.


एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय तुझं...?"

मी नाव बोललो

कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?

मी पुन्हा बोललो

त्या हसत हसत बोलल्या "अच्छा . छान आहे नाव"

त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? 


नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, "डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही ओ आजी". का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा"

हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. 


कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.


घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील"


मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.

दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली  


एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.

संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.

मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. 


मी विचारलं, "आजी काय करताय हे ?"

त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.


कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.

त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.

कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.

जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या "आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. 


माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. 


पण कोण कुठला तू... मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू "

मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो.


 तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.


पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.

मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.


मी जवळच्या टपरीवर गेलो

आणि विचारलं, "इथल्या आजी कुठे आहेत ?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.

मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून.                                                                           सहज माग वळून पाहिल तर अनेक चिमण्या गोळा झाल्या होत्या. पाणी पीत होत्या. मी आजीच्या झोपडीकडे पाहिल. आजी मात्र दिसत नव्हत्या . आजीन मला जीवनातल फार मोठ्ठ वास्तव देऊन गेल्या .दिल्यान वाढत. मग ते प्रेम असो वा दान .


*आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*.......



शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

अशोक कामटे



              *अशोक कामटे*
     (अतिरिक्त पोलीस कमीश्नर, मुंबई)
   *जन्म: २३ फेब्रुवारी १९६५*
           (चांबळी, महाराष्ट्र)
   *मृत्यू : २७ नोव्हेंबर २००८*
          (चौपाटी , मुंबई)

पुरस्कार : अशोक चक्र(२००९)
धर्म : हिंदू
वडील : मारुतीराव

      मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर पैलवान अशोक कामटे यांची आज जयंती . त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1965 रोजी झाला . ते एक कर्तव्य कठोर पोलीस अधिकारी होते आणि त्यांना मुंबईचे रक्षण करताना वीरगती मिळाली . पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की ते उत्कृष्ट पैलवानही होते . जेथे मुरारबाजीसारखा वाघ छत्रपती शिवरायांना पुरंदरावर मिळाला त्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या चांबळी गावचे हे सुपुत्र.

            या गावात कुस्तीची परंपरा आहे. कामटे याचे वडील कर्नत होते व ते कुस्तीच्या खेळातूनच लष्करात भरती झाले होते. तर आजोबा पोलीस अधिकारी होते . अशोक कामटे यानी अनेक नामाकित पैलवानांना अस्मान दाखविले होते . कोडाईकनातव्या इंटरनेशनल स्कूलमधून कामटे याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले , तर पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात झाते . त्याना आतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती , मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यानी पदवी प्राप्त केली , तर दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात एमए पूर्ण केले . त्याना कॅम्प रायझिंग सन मधून आतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते 1992 मध्ये उत्तीर्ण झाले . पेरू येथे झालेल्या ज्युनिअर पॉवर लिफ्टींग स्पर्धेत 1978 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते .
              अशोक कामटे हे पोलीस दलामध्ये बॉडी बिल्डर म्हणून प्रसिद्ध होते . त्यांनी बंधकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण घेतले होते . मुंबई हल्ल्याच्या वेळी ते मुंबईच्या पूर्व विभागात ड्युटीवर होते . त्यामुळे त्यांना कामा हॉस्पिटल कारवाईसाठी इमारतींमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. कामटे हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते . त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून भंडारा , सातारा , ठाणे ग्रामीण येथे काम केले . वर्ष 1999 ते 2000 या कालावधीत युएनमिशन बोस्निया येथे प्रतिनियुक्तीवर होते . वर्ष 2000 मधे डेपुटी कमिशनर पोलीस मुंबई म्हणून नेमणूक झाली . त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर येथे जिल्हा पोलीस प्रमुख पदावर नेमणूक झाली . त्यांनी वर्ष 2008 मधे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून मुंबई येथे कार्यभार स्वीकारला आणि पाचच महिन्यात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले .

त्यांच्या पत्नी विनिता कामटे ( सहलेखिका विनिता देशमुख ) यांनी " टु द लास्ट बुलेट ' या पुस्तकात त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत , अखेरचा प्रवास या प्रकरणात अशोक कामटे यांच्या अंतिम यात्रेचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन केले आहे . विनीता कामटे लिहितात - माझे सासरे तर दुःखाने पूर्ण कोलमडले होते . पण तेही एक लष्करी अधिकारी होते अखेरच्या क्षणी त्यांच्या मनातला सैनिक जागा झाला आणि अखेरची मानवंदना चालू असताना त्यांनीही खाडकन सॅल्यूट ठोकत वीरमरण प्राप्त केलेल्या आपल्या पुत्राला अखेरची सलामी दिली . तो जसा जगला तसच त्याला बघणं मला आवडेल . अशा कर्तव्य दक्ष अशोकास 2009 मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

         

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

expiry date....

 *पाण्याची expiry date काय असते...*


जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे

expiry date 1 दिवसाची


जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते


जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते आठ दिवसांनी expire होते


लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली की हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली expiry होते आणि फेकून दिली जाते.


वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही तोपर्यंत जवळचे पाणी चालते..


धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते


जर दुष्काळ परिस्थिती आली तर दोन तीन वर्षे चालते...


जिथे 50 फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते - expiry date शेकडो वर्षे


जिथे पाणी 400 ते 500 फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात तिथे ते हजारो वर्षा पूर्वी भूगर्भात साठलेले असते तरीही ते चालते..


एकूणच पाण्याची expiry ही आपल्या कमकुवत बुद्धीमतेवर ठरवली जाते...😢


_पाणी जपून वापरा, नाहीतर आपले विचारच आपला घात करतील..._

*जल है तो कल है*.  कृपया फक्त वाचून डिलिट करून नका. तर संपर्कातील नातेवाईक, मित्रपरिवार  सर्वांना पाठवावे. हि  आग्रहाची विनंती 🙏

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाअभियान.. घोषवाक्य व सेल्फी अपलोड....

 




मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत घोषवाक्य व सेल्फी अपलोड वाचन प्रतिज्ञा घेण्याबाबत खालील लिंकचा वापर करावा

खालील फ्लोचार्ट वापर करूनवापर करून सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे धन्यवाद 🙏🙏🙏



https://mahacmletter.in/registration

लोकप्रिय पोस्ट