मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

मानस जोडा connect people

 *माणसं जोडणं म्हणजे काय ?*


*माणसं जोडणं म्हणजे*,

समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं.

आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...

*माणसं जोडणं म्हणजे*,

ऐकण्याची कला शिकणं. 

फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...

*माणसं जोडणं म्हणजे*,

माणसांवर "शिक्के" न मारणं. 

समोरचा अधिक महत्त्वाचा - 

हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...

*माणसं जोडणं म्हणजे*, 

कौतुकाची एकही संधी न सोडणं, 

तक्रार मात्र जपून करणं...

*माणसं जोडणं म्हणजे*, 

प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं.

रागाचंही रुपांतर प्रेमात करता येणं...

*माणसं जोडणं म्हणजे*,

इतरांना माफ करता करता 

स्वतःच मन साफ करणं..


आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे,


*माणसं जोडणं म्हणजे*,

इतरांमधला *विठ्ठल* पाहत पाहत

स्वतःमधल्या *विठ्ठलाला* प्रकट करणं..!!

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


*डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जन्मदिन*


जन्म - १५ ऑक्टोबर १९३१ (रामेश्वरम)

स्मृती - २७ जुलै २०१५ (शिलॉंग,मेघालय)


भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती होते. मुलांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते आणि देशातील युवकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शास्त्रज्ञ, प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून त्यांनी या दोन गोष्टींसाठी त्यांनी आपले जीवन वेचले. २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपतीपदाची धुरा अत्यंत यशस्वीरीत्या संभाळून डॉ.कलाम यांनी त्या पदावर आपल्या चमकदार कामगिरीची मोहर उमटविली. साधी राहणी आणि ऋजू स्वभावामुळे ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ते लोकप्रिय ठरले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. 


अब्दुल कलाम यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात डाव्यांचा अपवाद वगळता, डॉ.कलाम यांची राष्ट्रपतिपदासाठी एकमताने शिफारस करण्यात आली होती. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉरलॉजीमधून हवाई अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असलेले डॉ.कलाम भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ठरले. वाजपेयी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आणि त्यांच्याच कारकिर्दीत १९९८ मध्ये पोखरणची अणुचाचणी झाली. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ.कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ.कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत. राष्ट्रपति पदावर विराजमान झाल्यावर डॉ.कलाम यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम केले. मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी भरपूर कष्ट करा, असे ते सांगत. ते उत्तम वीणावादक होते. डॉ.कलाम यांना कर्नाटक संगीतात रुची होती. ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया २०२०’ आणि ‘इग्निटेड माइंड्‌स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. राष्ट्रपति पदावरून निवृत्त झाल्यावर डॉ.कलाम विविध संस्थांमध्ये व्याख्याने देत असत.




🙏🙏

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

वाई मॅरेथॉन 2023

 *बहुप्रतिक्षित वाई मॅरेथॉन २६ नोव्हेंबर २०२३ ला, रजिस्ट्रेशनला उदंड प्रतिसाद*


 ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या वाई शहरात टिम वाई स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या मार्फत वाई हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे.

   दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वाई  हाफ मॅरेथॉनची सुरवात द्रविड हायस्कुल वाई येथुन होईल. दरम्यान महागणपती वाई , मराठी विश्वकोष कार्यालय, नाना फडणवीस वाडा , कृष्णा घाट मेणवली, धोम धरण जलाशय, पांडवगड, कमळगड  अशा ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंचे दर्शन घडवित हिरव्यागार निसर्गरम्य परीसरात सकाळचे कोवळे ऊन अंगावर स्पर्शित धावण्याचा आनंद अविस्मरणीय असेल.

   विविध गटात विभागलेल्या या मॅरेथॉन कडे केवळ स्पर्धा म्हणून न बघता उदयाच्या तंदुरूस्तीसाठी आजची सुरवात समजा. 

  मग वाट कसली पाहता खाली दिलेल्या लिंकवर आजच आपली नोंदणी करा आणी गरवारे वाई हाफ मॅरेथॉनचे भाग बना.


https://www.townscript.com/v2/e/wai-half-marathon-2023-222130/booking/tickets


 👍👍👍👍👍👍👍👍

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

पालकमंत्री 2023 महाराष्ट्र

 महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे. 2023...


पुणे- अजित पवार


अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील


सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील


अमरावती- चंद्रकांत दादा पाटील


भंडारा- विजयकुमार गावित


बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील


कोल्हापूर- हसन मुश्रीफ


गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम


बीड- धनंजय मुंडे


परभणी- संजय बनसोडे


नंदूरबार- अनिल भा. पाटील


वर्धा - सुधीर मुनगंटीवार

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

संयम आणि प्रतिसाद

 💐उत्कृष्ट बोधकथा💐


अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले.

सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं.

त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य,जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती उठून उभे राहिले आणि लिंकन ला उद्देशून म्हणाले,

" मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका कि तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते " 

सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं कि याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे आणि त्यांची लायकी दाखवली आहे.

मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक?

ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठे पणा सिद्ध करतात,

ते हि अगदी शांतपणे !! लिंकन हि असेच !! 

सभागृह काय होणार याकडे जीव कान आणि डोळ्यात आणून पहात होतं.

प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली ,आणि त्याला म्हणाले ,

"सर , मला माहित आहे हे , कि माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत कि ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट आणि पादत्राणे बनवत होते कारण त्यांच्या सारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं " 

" ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते , त्यांच्या हातात जादू आणि कला होती , त्यांनी बनवलेल्या चप्पल -बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते , आपलं संपूर्ण मन आणि कसब ते त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते,

मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे,तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय?

कारण हे कसब मलाही अवगत आहे कि हे बूट कसे बनवायचे.आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन.

पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही.

ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!"


सर्व सभागृह बधिर झाल होतं ,कोणाला काय बोलाव हे सुचत नव्हतं,

अब्राहम लिंकन हि काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती.आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.

मित्रानो,

यातून एकच गोष्ट लक्षात घ्या प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका,

कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या

" आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका 

" काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते!!!

🙏🙏🙏

लोकप्रिय पोस्ट